Prajwal Digital Services

Prajwal Digital Services B.Sc.agri. , Online Service, Ph.D. thesis, Bsc.Agriculture Project, Blogging, digital Advertisin

23/09/2025

NLM योजना ऑनलाईन फॉर्म - प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस

🐐 NLM योजना ऑनलाईन फॉर्म 🐔

शेळीपालन व पोल्ट्री व्यवसायासाठी संपूर्ण मार्गदर्शन

📋 आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी

शेळीपालन व पोल्ट्री व्यवसायासाठी लागणारे सर्व अनिवार्य दस्तऐवज

📄 आवश्यक कागदपत्रे

1
अर्जदाराचे आधार कार्ड व पॅनकार्ड

2
अर्जदाराचा पासपोर्ट कलर फोटो

3
बँक पासबुक

4
बँक स्टेटमेंट (सहा महिन्याचे खाते विवरण)

5
व्यवसायाचे नावे शॉप ॲक्ट परवाना

6
उद्यम आधार

7
लोन/कर्ज मंजुरी संबंधी बँकेचे संमतीपत्र

8
आयकर लागू असल्यास तीन वर्षांचे

9
GST लागू असल्यास

10
प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) प्रकल्पाच्या किंमतीनुसार

11
जमिनीचा सातबारा व 8-अ प्रत

12
जमीन नसल्यास जमीन भाडेपट्टा/भाडेकरार (कमीत कमी १० वर्ष)

13
लाईट बील

14
शेळीपालन किंवा पोल्ट्री व्यवसायाचे फोटो

15
जो व्यवसाय निवडल्यास त्याचे अनुभव प्रमाणपत्र

16
व्यवसायानुसार शैक्षणिक कागदपत्रे/पदवी/डिप्लोमा

17
रहिवासी प्रमाणपत्र (तहसीलदार)

18
इतर अनुषंगिक ऑनलाईन माहिती

📞 संपर्क करा

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस

📍 लातूर

📱

9689644390

📞 आता कॉल करा

🐐

शेळीपालन व्यवसाय

संपूर्ण मार्गदर्शन व ऑनलाईन फॉर्म सेवा

🐔

पोल्ट्री व्यवसाय

संपूर्ण मार्गदर्शन व ऑनलाईन फॉर्म सेवा

© 2024 प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस - सर्व हक्क राखीव

NLM योजना ऑनलाईन फॉर्म सेवा - लातूर

http://www.pdslatur.in/2025/09/NLM-Yojana-Documents-List.html

17/07/2025

📢 मोठी संधी! दक्षिण-पश्चिम रेल्वेत तब्बल ९०४ जागांसाठी भरती! आजच अर्ज करा! 🚂💰

भारतीय रेल्वेच्या दक्षिण- पश्चिम विभागात शिकाऊ पदांच्या एकूण ९०४ जागांसाठी भरती होत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आयटीआय पास व प्रशिक्षणार्थी यांना खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

या भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना 'rrchubli.in' या दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर १६ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महत्वाचे तपशील:

* पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (आयटीआय अप्रेंटिस)

* पदांची संख्या: ९०४

* अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

* अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२५

* विभागांनुसार रिक्त जागा:

* हुबळी विभाग: २३७

* कॅरेज रिपेअर वर्कशॉप, हुबळी: २१७

* बेंगळूरु विभाग: २३०

* मैसूर विभाग: १७७

* सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर: ४३

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट (https://rrchubli.in/) वरील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा. तिथे तुम्हाला प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती मिळेल.

अर्ज शुल्क:

* सामान्य/ओबीसी उमेदवार: रु. १००/-

अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कृपया दक्षिण- पश्चिम रेल्वेची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

ऑनलाइन अर्ज भरण्यास संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर

http://www.pdslatur.in/2025/07/Railway-Apprentices-Recruitment-2025.html

16/07/2025

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी येथे विविध पदांच्या मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. विद्यापीठाच्या आस्थापनेवरील तब्बल ३६९ रिक्त जागांसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती विशेष सरळसेवा भरती मोहिमेअंतर्गत होणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

कोणकोणत्या पदांसाठी संधी?

या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने पहारेकरी आणि इतर पदांचा समावेश आहे.

* पहारेकरी: एकूण ६२ जागांसाठी भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इय्यता ७ वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, त्यांची प्रकृती सुदृढ असणे आवश्यक आहे. माजी सैनिकांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल.

* मजूर व तत्सम पदे: यामध्ये मजूर, गुराखी, परिचर, दोग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फराश, सफाई कामगार आणि इतर तत्सम ३०७ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवारांनी इयत्ता ४ थी उत्तीर्ण केलेली असावी. ज्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता काय असेल?

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. पहारेकरी पदासाठी ७ वी उत्तीर्ण आणि इतर पदांसाठी ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या कार्यालयात संपर्क साधू शकता.

किती असेल परीक्षा शुल्क?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागेल. खुल्या (अराखीव) प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. १०००/- आहे. तर, मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. ९००/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज विद्यापीठाच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज कुठे पाठवायचा?

उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वतः विद्यापीठाच्या कार्यालयात जमा करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता खालीलप्रमाणे आहे:

कुलसचिव कार्यालय,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,

प्रशासकीय इमारत, परभणी

उमेदवारांनी अर्ज कार्यालयीन वेळेत आवक विभागात जमा करावेत.

मूळ जाहिरात पहा

http://www.pdslatur.in/2025/07/VNM-Krishi-Vidyapeeth-Parbhani-Requirement-2025.html

04/07/2025

Bank of Baroda recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये स्थानिक बँक अधिकाऱ्यांची (LBO) नियमित भरती - महाराष्ट्र करिता 485 जागांची मेगा भरती

बँक ऑफ बडोदा (BOB) ने २०२५ साठी स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत देशभरात एकूण २५०० जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट Bank of Baroda वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Bank of Baroda भरतीची महत्त्वाची माहिती:

* पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer - LBO)

* एकूण जागा: २५००

* अर्जाची प्रक्रिया: ऑनलाईन

* अर्ज सुरू होण्याची तारीख: ४ जुलै २०२५

* अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ जुलै २०२५

* अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २४ जुलै २०२५

* शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी (Integrated Dual Degree (IDD) देखील ग्राह्य).

* वयोमर्यादा: १ जुलै २०२५ रोजी २१ ते ३० वर्षे. (आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत.)

* नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

* निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया.

* अर्ज शुल्क:

* सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹ ८५०/-

* एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ माजी सैनिक/महिला: ₹ १७५/-

Bob महत्वाच्या तारखा:

* अधिसूचना जारी होण्याची तारीख: ३ जुलै २०२५

* ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: ४ जुलै २०२५

* ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ जुलै २०२५

* अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २४ जुलै २०२५

* ऑनलाईन परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल

ऑनलाइन अर्ज करा.

अधिसूचना जाहिरात पहा

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

http://www.pdslatur.in/2025/07/bank-of-baroda-recruitment-2025-lbo.html

29/06/2025

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अंतर्गत चंद्रपूर विभागात विविध पदांच्या एकूण १२८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

वीजतंत्री, तारतंत्री, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असून, त्याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

http://www.pdslatur.in/2025/06/Mahavitran-chandrapur-Bharti.html

27/05/2025

शैक्षणिक वर्ष 2025 26 करिता महाराष्ट्रामधील इयत्ता 11 वी च्या (First Year Junior College - FYJC) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज खालील माहिती आधारे अचूक ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावयाचा आहे. कोणतीही चूक ऑनलाईन फॉर्म मध्ये केल्यास अथवा चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज भरल्यास तो फॉर्म अपात्र ठरविण्यात येईल. होणाऱ्या परिणामास विद्यार्थी जबाबदार राहील. त्यामुळे इयत्ता अकरावी साठी (कला विज्ञान वाणिज्य) शाखेत प्रवेश घेण्यासाठी खात्रीशीर ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरून घ्यावा.

महत्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि भरण्याची अंतिम तारीख: 3 जून 2025.

उमेदवारांना विहित मुदतीत त्यांचा अर्ज भरून घ्यावा.

अर्ज भरण्यासाठी कोणतीही तारीख वाढणार नाही.

11 th admission process Online -अर्ज कसा करायचा:

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: या वेबसाइटला भेट द्या.

नवीन विद्यार्थी नोंदणी: होमपेजवर 'New Student Registration' या पर्यायावर क्लिक करा.

माहिती भरा: तुमचे नाव, जन्मतारीख, इयत्ता 10 वी ची माहिती आणि मोबाईल नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.

पासवर्ड तयार करा: तुमच्या खात्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा आणि फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

OTP सत्यापित करा: OTP टाकून तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण करा.

लॉगिन करा आणि अर्ज भरा: तुमच्या खात्यात लॉगिन करा आणि अचूक माहितीसह अर्ज भरा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: अर्जामध्ये मागितलेली आवश्यक खालील कागदपत्रे अपलोड करा.

10th दहावी पास गुणपत्रक/मार्कशीट

उमेदवारास आरक्षण प्रवर्गातून अर्ज करायचा असल्यास जात प्रमाणपत्र अनिवार्य

Undertaking हमीपत्र विद्यार्थी व पालकांच्या स्वाक्षरीसह.

शाळा सोडल्याचा दाखला टी.सी.

शुल्क 100 रुपये (ना परतावा).

ऑनलाइन अर्ज करा

Undertaking हमीपत्र डाउनलोड करा

संपर्क : प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर

9689644390

इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा!

http://www.pdslatur.in/2025/05/11-admission-2025-apply-form-11-2025.html

20/05/2025

ITI (Industrial Training Institute) हे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्र ITI Admission 2025 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ट्रेडमध्ये कुशल व्यावसायिक बनण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन 2025 करिता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फॉर्म /अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ITI Admission अभ्यासक्रमासाठी मुदतीत प्रवेश घेण्यात यावा.

माहिती तंत्रज्ञान संस्थेत (ITI) प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष खालीलप्रमाणे असू शकतात.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents):

शैक्षणिक पात्रतेचा दाखला (Educational Qualification Certificate): यामध्ये सामान्यतः 10वी किंवा 12वी उत्तीर्णतेचा दाखला आणि गुणपत्रिका (Marksheet) लागते.

जन्म दाखला (Birth Certificate): तुमच्या जन्मतारखेचा पुरावा.

आधार कार्ड (Aadhar Card): ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून.

शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate).

जातीचा दाखला (Caste Certificate) (जर लागू असेल तर): आरक्षित जागांसाठी.

उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) (जर लागू असेल तर): शिष्यवृत्ती किंवा फी मध्ये सवलतीसाठी.

पासपोर्ट आकाराचे फोटो (Passport Size Photographs).

इतर आवश्यक कागदपत्रे, जसे की अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (आवश्यक असल्यास).

पात्रता निकष (Eligibility Criteria):

शैक्षणिक पात्रता: बहुतेक आयटीआय अभ्यासक्रमांसाठी किमान पात्रता 10वी उत्तीर्ण आहे. काही विशिष्ट आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता आवश्यक असू शकते.

वयोमर्यादा: आयटीआय अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे किमान वयोमर्यादा 14 वर्षे असते. अभ्यासक्रमानुसार कमाल वयोमर्यादेत बदल असू शकतात.

अधिक माहितीसाठी:

महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या (Department of Skill Development, Employment and Entrepreneurship) अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

ITI प्रवेशासंबंधी माहिती पुस्तिका (ITI Admission Brochure)

ऑनलाइन फॉर्म संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर, मोबाईल नंबर 9689644390.

विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

http://www.pdslatur.in/2025/05/iti-admission-2025-26.html

14/05/2025

Breaking! Mega Recruitment
for 12 Posts at Chandrapur Govt. Medical College! चंद्रपूरच्या शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात विविध विभागांमध्ये एकूण १२ जागांसाठी भरती
प्रक्रिया सुरू आहे. तरी यासाठी योग्य आणि पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन
पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत आणि थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

पदांची संख्या-No of
Post : १२ जागा

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
(Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता-Education
: प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी
शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, चंद्रपूर
यांची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची शेवटची
तारीख: १४
मे २०२५
पर्यंत
तुमचा अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा
पत्ता: अधिष्ठाता
कार्यालय, आस्थापना
विभाग वर्ग १ व २, मा.सां.कन्नमवार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर, महाराष्ट्र

मुलाखतीची तारीख: २०
मे २०२५
रोजी
मुलाखतीसाठी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने हजर राहावे लागेल.

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, मा.सां.कन्नमवार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.

मूळ जाहिरात पाहा

http://www.pdslatur.in/2025/05/chandrapur-medical-college-recruitment-2025.html

05/05/2025

महाराष्ट्र
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठी संधी ! महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना
स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पशुधनात वाढ करण्याच्या
उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या पशुसंवर्धन नावीन्यपूर्ण योजनेसाठी सन 2025-25 करिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

गाय-म्हैस दुधाळ
गट वाटप, शेळी-मेंढी पालन गट वाटप व 1000 पोल्ट्री पक्षी
(कुक्कुटपालन) युनिट स्थापना इ. असून या योजनेचा लाभ अनुसूचित जाती
(अनु.जाती), अनुसूचित जमाती
(अनु.जमाती) तसेच इतर मागास प्रवर्ग (इतर प्रवर्गातील) आणि खुल्या प्रवर्गातील
इच्छूक लाभार्थी व शेतकरी कुटुंबातील व्यक्ती घेऊ शकतात.

अर्ज भरण्याची
प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन आहे. विहित मुदतीत अर्ज भरणे अनिवार्य आहे. अर्जदाराने योजनेचा
अर्ज भरण्याचा दि.03.05.2025
ते 02.06.2025 पर्यंत राहील, अंतिम तारीख 2 जून 2025 पर्यंत असणार आहे.

प्रमुख
नावीन्यपूर्ण योजना

1)
दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे. (संकरित गाय व देशी
गाय)

2)
अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड /
नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

3)
1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

4)
10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती /
जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

5)
दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.

6)
8 ते 10 आठवडे
वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

7)
एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करणे.

लाभार्थी निवडीचे
निकष - प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

वरील सर्व योजनेसाठी
लाभार्थी निवडीचे निकष हे खालील प्रमाणे राहतील.

·
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

·
अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)

·
अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )

·
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)

·
महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील)

अर्जासोबत आवश्यक जोडावयाची
कागदपत्रे –

·
* फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

·
* सातबारा (अनिवार्य)

·
* ८ अ उतारा (अनिवार्य)

·
* अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

·
* आधारकार्ड (अनिवार्य )

· * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

·
* अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास
अनिवार्य)

·
या व्यतिरिक्त इतर अनुषंगिक लागू असलेले कागदपत्रे असल्यास अर्जात नमूद
करावे.

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी
संपर्क :

प्रज्वल डिजीटल
सर्व्हिसेस, रोडे कॉम्पलेक्स, शॉप नं. 5, नेताजी नगर, लातूर

प्रो.प्रा. किशोर
ससाणे Mob. 9689644390 www.pdslatur.in

इच्छूक आणि पात्र
लाभार्थ्यांनी विहित मुदतीत म्हणजेच दिनांक ०२ जून २०२५ पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन
पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे. या संधीचा लाभ घेऊन पशुसंवर्धन व्यवसायात प्रगती
साधावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत
करण्यात आले आहे.

टीप: कृपया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन योजनेचे
सविस्तर नियम, अटी
आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्यावी.

http://www.pdslatur.in/2025/05/Animal-Husbandry-Innovative-Scheme.html

09/04/2025

टंकलेखन-लघुलेखन यश: 2025 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ₹6500 प्रोत्साहनपर अनुदान!

संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना ही एक महत्त्वाची योजना आहे, जी व्यक्तींना व्यावसायिक कौशल्ये शिकण्यास आणि रोजगार मिळवण्यास मदत करते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (मराठी/हिंदी/इंग्रजी ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील, त्यांना ₹ ६,५००/- प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

योजनेचे उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील (अमृतच्या लक्षित गटातील जाती) उमेदवारांना शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे आहे.

अमृतचा लक्षगट:

खुल्या प्रवर्गातील अशा जाती, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत अशाच प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही. या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी, युवक आणि युवती, जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते या योजनेसाठी पात्र असतील.

लाभार्थी पात्रता निकष:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

लाभार्थ्याचे वय १६ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र आणि संबंधित संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी भरलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती आवश्यक आहे.

उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) आणि रद्द केलेल्या चेकची प्रत जोडावी.

लाभाचे स्वरूप:

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे प्रोत्साहनपर अर्थसहाय्य प्रदान केले जाईल:

संगणक टंकलेखन (GCC-TBC) उत्तीर्ण: जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ३०, ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील, त्यांना एकरकमी रु. ६,५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळेल.

ऑनलाईन लघुलेखन उत्तीर्ण: जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील, त्यांना एकरकमी रु. ५,३००/- (अक्षरी रुपये पाच हजार तीनशे फक्त) प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळेल.

प्रोत्साहनपर अर्थसहाय्याची रक्कम अमृत संस्थेमार्फत थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.

याव्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.

अर्ज करा:

जर तुम्ही अमृतच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करत असाल आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संगणक टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असाल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा.

http://www.pdslatur.in/2025/04/Computer-Typing-Stenography-Training-Scheme.html

06/02/2025

मंडळाच्या आदेशानुसार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कामगार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून अर्ज भरू शकतील.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया:

बांधकाम कामगारांनी आपले नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावेत.

अर्ज भरल्यानंतर, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आपल्या सोयीची तारीख निवडावी.

६ फेब्रुवारी २०२५ पासून तारीख निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे.

ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील.

लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत:

ज्या कामगारांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आली आहे.

असे कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात.

रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी "Change Claim Appointment Date" ह्या बटनावर क्लिक करावे.

सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल.

नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाइलवर एक OTP येईल.

OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे, त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे.

त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता.

अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता.

अधिक माहितीसाठी:

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर

मो.9689644390

विशेष बाब बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यामुळे, आता त्यांना नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्यासाठी तालुका सुविधा केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचेल.

http://www.pdslatur.in/2025/02/2025-new-registration.html

15/01/2025

RTE Online Admission 2025-26 आरटीई अंतर्गत २५% प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत फक्त काही दिवस शिल्लक आहे. २७ जानेवारी २०२५ ही अंतिम तारीख आहे. आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आजच अर्ज करा.

काय आहे आरटीई?

आरटीई म्हणजे Right to Education (शिक्षणाचा अधिकार). या कायद्यानुसार प्रत्येक बालकाला निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षण घेण्याचा हक्क आहे. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५% जागांची राखीव जागा असते जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी असते

पालकांसाठी महत्वाची सूचना (आरटीई प्रवेश 2025-2026)

आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-2026 साठी अर्ज भरताना खालील गोष्टींची काळजी घ्या:

अर्ज भरताना काळजीपूर्वक: अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावा.

जन्म तारीख: आपल्या बालकाचा जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. ही माहिती एकदा भरल्यानंतर बदलता येणार नाही.

शाळा निवड: १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

आवश्यक कागदपत्रे: अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो.

एकच अर्ज: एका बालकासाठी एकच अर्ज भरावा. डुप्लिकेट अर्ज भरल्यास दोन्ही अर्ज रद्द होतील.

अर्ज क्रमांक जपून ठेवा: अर्ज भरून झाल्यावर अर्ज क्रमांक आणि मोबाइल नंबर जपून ठेवा.

सत्य माहिती: अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल.

पासवर्ड विसरलात तर: पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा.

अंतिम तारीख: अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27/01/2025 आहे.

दिव्यांग बालके: दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

निवासी पुरावा: सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक मान्य नाही. बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

लोकॅशन: अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

जन्मतारखेबाबत समस्या: दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास [email protected] OR [email protected] वर इमेल पाठवावा.

आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठी संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर

मो.9689644390

Online New Registration

अधिकृत वेबसाईट

अधिकृत मूळ जाहिरात

आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आरटीईचा लाभ घ्या!

http://www.pdslatur.in/2025/01/Rte-new-admission-2025-26.html

Address

Near Veterinary Hospital, Netaji Nagar Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+2382222290

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prajwal Digital Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prajwal Digital Services:

Share