13/12/2025
माजी केंद्रीय गृहमंत्री मा.शिवराज पाटील चाकुरकर यांच्या अंत्ययात्रेनिमीत्त दि.१३/१२/२०२५ रोजी सकाळी ०६.०० ते १३.०० वाजेपर्यंत लातुर शहरातील वाहतुक मार्गात बदल.
लातूर जिल्ह्राचे सुपुत्र दिवंगत माजी केंद्रीय गृहमंत्री मा.शिवराज पाटील चाकुरकर यांचे आज दि.१२/१२/२०२५ रोजी निधन झाले आहे.त्यांच्या अंत्यविधीस देशभरातून अनेक माजी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री,ईतर व्हीआयपी,नातेवाईक,लातुर जिल्हा परिसरातील नागरिक हजर राहणार आहेत.
चाकूरकर यांची अंत्ययात्रा लातुर शहरातुन देवघर - आर.जे.कॉम्पलेक्स -आदर्श कॉलनी - छत्रपती शिवाजी महाराज चौक - दयानंद गेट - संविधान चौक - पीव्हीआर चौक - किर्ती ऑईल मिल चौक - वरंवटी शिवार अंत्यविधी ठिकाण मुख्य मार्गाने जाणार आहे. अंत्ययात्रेत सहभागी होणारे सर्व व्हीआयपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने व अंत्यदर्शन घेणेसाठी बहुसंख्य लोकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे लातुर शहरातील अंत्ययात्रा मार्गावरील वाहतुक बंद करुन इतर भागातून वळविण्यात आली आहे.
दिनांक १३/१२/२०२५ रोजी सकाळी ०६.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद असणारे मार्ग.
अ) राजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पीव्हीआर चौक,व पीव्हीआर चौक ते वरवंटी शिवार अंत्यविधी ठिकाण मार्गकडे जाणारा मुख्य रस्ता हा सर्व वाहनांना (एस.टी. बसेस,ट्रक,टेम्पो,टॅक्सी,ट्रॅव्हल्स व मिनिडोर,कार,अॅटो,मोटरसायकल इत्यादी) वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
दिनांक १३/१२/२०२५ रोजी सकाळी ०६.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत पर्यायी मार्ग:
ब) तरी जनतेने खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
१) औसा रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारे सर्व प्रकारची वाहने हे राजीव गांधी चौक येथून वळुन रिंग रोड मार्गे नाईक चौक - कन्हेरी चौक - जिल्हा शासकीय रुग्णालय समोरील रोडने - मिनी मार्केट येथुन शहरात प्रवेश करतील.
२) महात्मा गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारे सर्व वाहने अशोक हॉटेल येथून वळून खोरी गल्ली मार्गे अंबाजोगाई रोडकडे जातील.
३) नवीन रेणापूर नाका येथून छत्रपती शिवाजी चौकाकडे येणारी सर्व वाहने जूना रेणापूर नाका येथून वळून पापविनाश रोड व खोरीगल्ली रोड मार्गे शहरात जातील.
४) बार्शी रोडने पीव्हीआर चौकातुन छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणारी सर्व वाहने निकी हॉटेल पासुन वळून पॅरलल रोडने औसा रिंग रोड चौक - खाडगाव चौक - छत्रपती चौक - राजीव गांधी चौक - नाईक चौक - कन्हेरी चौक मिनी मार्केट येथून शहरात प्रवेश करतील.
५) बार्शी रोडने पीव्हीआर चौकातुन अंबेजोगाई रोडकडे जाणारी सर्व वाहने हे हरंगुळ चौक मार्गे हरंगुळ खू.- रायवाडी - नांदगाव मार्गे अंबाजोगाई रोडला येतील.
६) नवीन रेणापूर नाका येथून पीव्हीआर चौकाकडे न जाता सर्व अवजड वाहने नवीन रेणापूर नाका - गरुड चौक - बाभळगाव नाका - बसवेश्वर चौक - राजीव गांधी चौक- छत्रपती चौक मार्गे पीव्हीआर चौक येथे जातील.तरी सर्व नागरीकांनी उक्त आदेशाप्रमाणे वाहतुकीसाठी बंद असल्याचे घोषित करण्यात आलेल्या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करुन महानगरपालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.