13/10/2025
मुंबई | प्रतिनिधी:
मानवतेचा आणि विश्वासाचा एक हृदयस्पर्शी किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका घरात १७ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या नोकराला त्याच्या मालकिणीने दिलं असं बक्षीस की ऐकून प्रत्येकाच्याच डोळ्यांत पाणी येईल.
या कर्मचाऱ्याने अनेक वर्षे आपल्या मालकिणीच्या कुटुंबाची अतिशय निष्ठेने सेवा केली. त्याच्या प्रामाणिकतेने आणि समर्पणाने प्रभावित होऊन मालकिणीने त्याला १ कोटी रुपयांचं फ्लॅट, रोख रक्कम आणि एक कार भेट दिली.
या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी मालकिणीच्या उदारतेचं आणि नोकराच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे. अनेकांनी म्हटलं, "ही केवळ भेट नाही, तर माणुसकी आणि विश्वासाचं जिवंत उदाहरण आहे."
या व्हिडिओने हजारो लोकांना प्रेरणा दिली असून, ‘ईमानदारीचं बक्षीस मिळतंच’ हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.