
08/08/2025
विद्ध्याप्रवेश बालवाटिका शाळेत रक्षाबंधनाचा उत्साह
पुणे – विद्ध्याप्रवेश बालवाटिका शाळेमध्ये रक्षाबंधनाचा सण चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात साजरा केला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापसांत राख्या बांधून प्रेम, आपुलकी आणि बंधुत्वाचे नाते अधिक दृढ केले. नाजूक हातांनी तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्यांनी वातावरणात उत्साह संचारला होता.
शिक्षिका शितल योगेश घोगरे यांनी मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व, बहीण-भावाच्या नात्याचे मूल्य, आणि परंपरेचे स्थान समजावून सांगितले. त्यामुळे लहान वयातच सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची बीजे पेरली गेली.
कुमारी पायल पोळ या शिक्षिकेने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. ज्योती अतुल घोगरे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये नैतिक आणि सामाजिक जाणीवा वाढीस लागतात, असे सांगितले.