
23/09/2025
राजकारणाच्या रंगमंचावर पांढऱ्या शुभ्र कपड्यांचा चमकदार देखावा मिरवणारे कितीतरी नेते आपण रोज पाहतो. पण खरी लोकसेवा ती असते, जिथे नेते आपले कपडे, आपली प्रतिष्ठा यांचा विचार न करता थेट शेतकऱ्याच्या दुःखात उतरतात.
ओमराजे निंबाळकर यांनी दाखवून दिले की जनसेवा केवळ भाषणांत किंवा फोटोसेशनमध्ये नसते, तर ती शेतकऱ्याच्या शेतातल्या चिखलात, त्याच्या ओल्या डोळ्यांमध्ये, त्याच्या हताश उसासांमध्ये असते.आज अनेक नेते फक्त शेतकऱ्याच्या बांधावर उभे राहून औपचारिक पाहणी करत आहेत. पण ओमराजे मात्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या शेतात उतरले. त्यांनी पायाला लागलेल्या चिखलाची पर्वा केली नाही, कपडे खराब होतील याचा विचार केला नाही; त्यांनी फक्त आणि फक्त शेतकऱ्याचे दुःख वाटून घेतले.हा क्षण जनतेच्या मनातील खरी अपेक्षा प्रकट करणारा आहे. नेता तोच जो शेतकऱ्याच्या रानात उतरून त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात सोबत उभा राहतो. ओमराजेंचे हे कृत्य म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर "मातीशी नाळ जुळलेली खरी लोकनेतृत्त्वाची शिदोरी" आहे.