23/10/2025
*भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता मसलग्याचे रमेश पाटील*!
निटूर गटातून जिल्हा परिषदेसाठी जनतेचा प्रबळ आवाज**
प्रतिनिधी / निलंगा
निलंगा तालुक्यातील मसलगा हे गाव गेल्या काही वर्षांत राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष वेधून घेत आहे. या परिवर्तनामागे ज्या काही नावे पुढे आली, त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे रमेश पाटील (मसलगा) — भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, प्रामाणिक नेते आणि जनतेचा माणूस.
भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रमेश पाटील यांनी अनेक वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेतली आहे. माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे ते विश्वासू सहकारी असून, पक्ष संघटन बळकट करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. कार्यकर्त्यांशी आपुलकीचा संवाद, प्रामाणिक भूमिका आणि संघटनशीलतेमुळे त्यांनी सर्वसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अरविंद पाटील निलंगेकर यांच्याशी त्यांचा घट्ट आणि विश्वासाचा संबंध आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पाटील यांनी मसलगा गावाच्या विकासाला नवे आयाम दिले. गावातील मूलभूत सुविधा, तरुणांसाठी संधी, आणि समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची सर्वत्र चर्चा आहे.
रमेश पाटील हे स्वभावाने अत्यंत नम्र, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारे नेते आहेत. गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहतो. अधिकारी वर्गात त्यांचा उत्तम जनसंपर्क असून, समस्यांचे निराकरण शांततेत आणि योजनाबद्ध पद्धतीने करण्याची त्यांची कार्यपद्धती जनतेला भावते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत निटूर गटातून कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या इच्छेने ते उमेदवारीच्या तयारीत आहेत. “जनतेचा विश्वास आणि पक्षाची निष्ठा” हे सूत्र बाळगून रमेश पाटील यांचा प्रचार सुरू झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
मसलगा गावाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली वेगळी ओळख, पक्षासाठीची निष्ठा आणि प्रामाणिक कामगिरी पाहता, निटूर गटातील सामान्य जनतेचा विश्वास त्यांच्याकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
गावोगावी, चौकाचौकात आज एकच चर्चा —
👉 “रमेश पाटील म्हणजे पक्षनिष्ठा, जनसेवा आणि विकास यांचं प्रतीक!”
भाजपच्या विजयाच्या मोहिमेत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे, आणि म्हणूनच अनेक कार्यकर्ते, युवक व नागरिक यांच्यात विश्वासाने उच्चारले जाते —
“या वेळेस निटूर गटातून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणारे नाव असेल — रमेश पाटील!”
---
*रमेश शिंदे न्यूज लोकनायक*