05/07/2025
कव्हेकर परिवारातील सदस्य समजून समर्पितव सेवाभावी
वृत्तीने साथ देण्याचे काम लाला पाटील यांनी केले
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.05-07-2025
जेएसपीएम संचालित स्वामी विवेकानंद विद्यालयातील वरिष्ठ लिपीक म्हणून लालासाहेब पाटील हे 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. जेएसपीएम संस्थेच्या चाळीस युनिट दीड हजार कर्मचारी यांच्या माध्यमातून अठरा हजार विद्यार्थी अध्ययनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. यामध्ये लाला पाटील यांनी मोठे योगदान देऊन संस्थेचा नावलौकिक वाढविण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक सेवेमध्ये संस्थेचा कर्मचारी म्हणून नाही तर कव्हेकर परिवारातील सदस्य समजून समर्पित व सेवाभावी वृत्तीने साथ देण्याचे काम लाला पाटील यांनी केलेले आहे. असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते श्री स्वामी विवेकानंद विद्यालय एमआयडीसी लातूर येथील वरिष्ठ लिपीक लालासाहेब पाटील यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेच्या सचिवा तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेच्या संचालिका आदिती अजित पाटील कव्हेकर, विश्वजीत पाटील कव्हेकर, रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील रावणगावकर, जेएसपीएम संस्थेचे फायनांन्स डायरेक्टर बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, पुष्पराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, जेएसपीएम संचालित श्री स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ही औपचारिकता आहे. परंतु या पुढील कालावधीतही आपण संस्थेच्या कामामध्ये सक्रीय राहून योगदान द्यावे आणि संस्थेचे नावलौकिक वाढविण्याचे काम आपण एकजूटीने करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवराचां सन्मान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अलका अंकुशे यांनी केले तर आभार सुचिता घाडगे यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेच्या नर्सिंग कॉलेजचे सहसमन्वयक व फार्मसीचे समन्वयक अनिरूध्द पाटील, विष्णू शिंदे, लालासाहेब देशमुख, दिलीप पाटील, नाना पाटील, अण्णासाहेब कदम, बाळासाहेब पाटील, प्राचार्य आर.एस.अवस्थी, माजी प्राचार्य दिगंबर शेटे, माजी प्राचार्य बी.एम.शिंदे, शिवाजी सूर्यवंशी,निशिकांत मजगे, आशिष कामदार, एमएनएस बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन सराफ, गणेश कदम, कमलाकर कदम, रोहन कदम, ललीत तोष्णीवाल,रघूराज बाहेती, प्रा.जयद्रथ जाधव, प्रा.सतीश यादव, रागिणी यादव, विकास लबडे, सूर्यकांत चव्हाण, बाळासाहेब मोहिते, अप्पासाहेब पाटील, बाळू पाटील,उपप्राचार्य मनोज गायकवाड, चंद्रकांत काटे, अमर पाटील यांच्यासह जेएसपीएमच्या सर्व युनिट प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हेाते.
राजकीय जडणघडणीमध्ये लालामामांचे योगदान महत्त्वाचे - अजित पाटील कव्हेकर
जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लिपीक पदावर कार्यरत असणारे लाला पाटील यांनी संस्थेच्या कार्यासह कव्हेकर परिवारासाठी खूप योगदान दिलेले आहे. मी शिक्षणासाठी पुणे येथे असताना पहिली ते दहावी पर्यंत तब्बल दहा वर्ष मला सांभाळण्याचे काम त्यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासह के.एन.कदम, संभाजीराव पाटील, बी.एम.शिंदे यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी चांगले योगदान दिलेले आहे. त्यांच्या सेवेची चौतीस वर्ष चांगल्या पध्दतीने पार पडले असले तरी सेवापूर्वीचा कार्यक्रम ही औपचारिकता आहे. त्यामुळे त्यांनी यापुढील कालावधीतही कव्हेकर परिवाराच्या सहवासात राहून कार्य करावे. त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत संस्थेच्या कार्याबरोबर माझ्या राजकीय वाटचालीतही वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने माझ्या राजकीय वाटचालीतही लाला मामांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.