09/09/2024
*रयत प्रतिष्ठान च्या रयतरत्न पूरस्कारासाठी 22 सप्टेबंर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन...*
रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एक सामाजिक उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. 2 ऑक्टोबर 2015 पासून आजपर्यंत रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड व संवर्धन, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अवयवदान प्रचार प्रसिद्धी, गरजूंना गरम व उबदार कपडे वाटप, गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, शेतकरी मेळावे, गणेशोत्सव व शिवजयंतीनिमित्त व्याख्याने तसेच विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा रयतरत्न पूरस्काराने सन्मान केला जातो.
2 ऑक्टोबर 2024 रोजी रयत प्रतिष्ठान लातूरचा नववा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. रक्तदान शिबीर, व्याख्यान व पूरस्कार वितरण अशा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरावर दोन व जिल्हा स्तरावर दहा पूरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात रयत महाराष्ट्र भूषण , रयत मराठवाडा भूषण, रयत विद्यार्थी रत्न, कृषीरत्न, वृक्ष रत्न , समाजरत्न, उद्योगरत्न, पञकाररत्न, दिव्यांग रत्न , शिक्षकरत्न, डॉक्टरत्न, ग्रामरत्न अशा पूरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन रयत प्रतिष्ठानच्या वतीने कृषी पर्यवेक्षक तथा संस्थापक मार्गदर्शक सूर्यकांत लोखंडे , सुनिलकुमार डोपे तसेच वैशालीताई लोंढे यादव यांनी केले आहे. मान्यवरांच्या हस्ते पूरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2024 राहील. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता - श्री. आर. डी. काळे, अध्यक्ष, रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कार्यालय, चिरायू सदन, शनि मंदिराजवळ, देसाई नगर, रिंग रोड लातूर. संपर्क क्रमांक- 9422023917 / 9404681955.