15/06/2025
#लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करा
पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला विश्वास आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाचा विचार आपल्या भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली असल्याचे सांगून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करुन स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूकीची तयारी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी करुन सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. लातूर शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आज शुक्रवार दि. ६ जून २५ रोजी प्रभाग आणि ग्रामअध्यक्षांच्या नियुक्ती पत्रवितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, डॉ. दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे आदी उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केलेल्या या संघटनात्मक फेरबदलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, हे बदल भविष्याचा वेध घेऊन केले. असून, काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, तर काही जुने चेहरे कार्यमुक्त झाले आहेत आणि काही सदाबहार चेहऱ्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. देशमुख यांनी महाराष्ट्रात असे संघटनात्मक फेरबदल करणारा लातूर हा कदाचित पहिला जिल्हा असेल असे नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती
आमदार देशमुख यांनी लोकसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा बारकाईने अभ्यास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठीची तयारी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरू करावी, असे आवाहनही याप्रसंगी केले. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे संदर्भ वेगळे असले तरी काही गोष्टी एकसारख्याच असतात. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि विरोधी पक्षांना गेलेली मते याचा बारकाईने अभ्यास केला तर निवडणूक जिंकण्याचे तंत्र आत्मसात करता येईल असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील, मतभेद बाजूला सारून सर्वांना एकत्र आणण्यासाठी काय करावे लागेल, उमेदवाराची निवड कोणत्या पद्धतीने करावी लागेल या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट स्थापन करून लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही प्रमुख पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
"नव्या ऊर्जेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू!"- खासदार डॉ. शिवाजी काळगे
काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ.शिवाजी काळगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्या ऊर्जेने आणि उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात विजय मिळवता आला असला तरी, विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश त्यांनी मान्य केले.
खासदार काळगे म्हणाले की, "सत्ता नसल्यामुळे आपणाला काम करायला अडचणी येत
असतात, त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सत्ता खेचून आणू." यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेतील नियुक्त्यांवर बोलताना ते म्हणाले की, "सर्व नियुक्ती झालेल्या गुणवान कार्यकर्त्यांना आता काम करण्याची संधी मिळाली आहे." यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लातूर काँग्रेसच्या कार्यक्रमाला प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती
लातूर येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात विजयकुमार साबदे, गोरोबा लोखंडे, फारुख शेख, प्राध्यापक प्रवीण कांबळे, अहमदखान पठाण, व्यंकटेश पुरी, सुलेखा कारेपूरकर, रविशंकर जाधव, प्रवीण सूर्यवंशी, रामराजे काळे, एकनाथ पाटील, सचिन बंडापले आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, सर्व प्रभाग अध्यक्ष, सर्व गाव अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर व ग्रामीण भागासाठी प्रभाग आणि ग्रामअध्यक्षांची नियुक्ती माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते नियुकती पत्र प्रदान आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने लातूर शहर आणि ग्रामीण भागासाठी काँग्रेस पक्षाने नवे प्रभाग अध्यक्ष आणि ग्रामअध्यक्ष नियुक्त केले आहेत. संबंधित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करत त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी काळात संघटनात्मक कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लातूर शहरातील प्रभाग अध्यक्ष पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र. 1: श्री. गोरोबा लोखंडे,प्रभाग क्र. 2: श्री. सत्यवान कांबळे, प्रभाग क्र. 3: श्री. जी.ए. गायकवाड, प्रभाग क्र. 4: श्री. आसिफ बागवान, प्रभाग क्र. 5: श्री. यशपाल कांबळे, प्रभाग क्र. 6: श्री. गिरीष ब्याळे, प्रभाग क्र. 7: श्री. तबरेज तांबोळी, प्रभाग क्र. 8: श्री. सुरज राजे, प्रभाग क्र. 9: श्री. हारूण बासले, प्रभाग क्र. 10: श्री. डॉ. बालाजी साळूंके, प्रभाग क्र. 11: श्री. महादेव बरूरे, प्रभाग क्र. 12: श्री. धोंडिराम यादव, प्रभाग क्र. 13: श्री. ॲड. विजय गायकवाड, प्रभाग क्र. 14: श्री. सिद्राम कटारे (सर), प्रभाग क्र. 15: श्री. राजकुमार कत्ते, प्रभाग क्र. 16: श्री. बालाजी गवळी, प्रभाग क्र. 17: श्री. प्रा. संजय जगताप, प्रभाग क्र. 18: श्री. सुंदर पाटील कव्हेकर, ग्रामीण भागातील ग्रामअध्यक्ष यामध्ये बाभळगाव: श्री. अविनाश देशमुख, महापूर: श्री. संतोष भोसले, महाराणाप्रताप नगर: श्री. मुजाहिद इनामदार, शामनगर/१२ नं. पाटी: श्री. शिवलिंग धुमाळ, कव्हा: श्री. गोविंद इर्ले, सिरशी: श्री. रामराजे जाधव, कातपूर: श्री. दिनेश देशमुख, गंगापूर: श्री. भास्कर शिंदे, चांडेश्वर: श्री. महेश नलावडे, नांदगाव: श्री. सतिष कुलकर्णी, पेठ: श्री. दासराव सुर्यवंशी, बोरवटी: श्री. ज्योतीराम लकडे, पाखरसांगवी: श्री. अण्णासाहेब देशमुख, बसवंतपूर: श्री. बिरू सरवदे, हरंगुळ बु.: श्री. भिमाशंकर झुंझारे, हरंगुळ खु.: श्री. श्रीकांत भुजबळ, हणमंतवाडी: श्री. लक्ष्मण सपाटे, खंडापूर: श्री. नारायणराव ढोरमारे, खोपेगांव: श्री. विलास मोरे, खाडगांव: श्री. दौलत देशमुख, साई: श्री. ज्ञानेश्वर पवार, सिकंदरपूर: श्री. पुष्पराज सुरवसे या नियुक्त्यांमुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली असून, आगामी काळात संघटनात्मक कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
या बैठकीत ॲड. किरण जाधव, ॲड.दिपक सुळ, श्रीशैल उटगे यांनी भाषण केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोळे यांनी केले, तर शेवटी फारुख शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.