07/02/2024
रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे समाधी स्मारक तुम्ही पाहिले आहे का?
रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे
समाधीस्थळ, किंजळोली, ता. महाड, जि. रायगड
रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म १६१६ साली झाला असून, त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील किंजळोली जावळीच्या चंद्रराव मोन्यांशी घडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजाला मोर्याच्या सैन्याकडून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी याना मराठा सैन्यात दाखल करून घेतले.
१६६५ माये औरंगजेवाले मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांना दीड लाख या फौजेनिशी स्वराज्यावर सोडलं. स्वराज्यावर याच्या रूपाने नवीन संकट घोंगावत होते. मिर्जाराजाने ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केते. त्यापुढे मराठी सैन्यात्ता टिकाव लागणे फारच अवघड होते. मोगल सरदार दिलेरखानाले ४०००० सैन्यासह पुरंदर गडाला वेढा दिला व गड घेण्याचा प्रयत्न केला मुरारबाजींनी गडावरील सैन्यास येऊन गड झुंजवायची शर्थ केली. स्वराज्याने नुकसान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना ११ जून १६६५ रोजी भेटण्याचे ठरविले. नेमके याच दिवशी दिलेरखानाने पठाणांच्या फौजेनिशी पुरंदर माचीवरून बालेकिल्ल्यावर आक्रगणाला सुरवात केली गड राखण्यासाठी मुराबाजीनी सातशे निवडक मावळ्यांसह बालेकिल्ल्यावरून उतरून पठाणांवर झडप घातली. या झडपेत अर्ध्याहून अधिक मावळे ठार झाले तरी हल्ला चालूत होता. हा पराक्रम पाहून दिलेरखानाने लढाई थांबवली व मुरारबाजींना तो म्हणाला, "अरे तू मोगलांना सामील हो, तुला मोठी जहागिरी ठेऊन शौर्याचे आम्ही चिज करू" हे ऐकून मुरारबाजी म्हणाले. मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल येतो की काय ?" असे बोलूल मुरारबाजी दिलेरखानावर चालून गेले मात्र दिलेरखानाले सोडलेला बाण मुरारबाजीच्या वर्मी लागून ते जमिनीवर कोसळले अवघ्या सातशे मावळ्यानिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणा-या मुरारबाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
तब्बल दीड महिने पुरंदर लढता ठेवून १९ जून १६६५ या दिवशी हा महान तेजस्वी तारा सुर्यतेजात मिसळला दिलेरखानाचा बाण लागून मुरारबाजी धारातीर्थी पडते. पुरंदर गडाच्या माचीवर मुरारबाजीचा पुतळा आहे. या मागे एक छोटेखानी घुमटीत वीराचे स्मारक आहे. हे बहुधा मुरारबाजीच्या बलिदानाचे स्थान आहे. महाडजवळच्या किंजळोली (बुद्रुक) या गावी मुरारबाजीच्या राहत्या वाड्याची जागा आहे. किंजळोली (खुर्द) गावाशेजारच्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात काही प्राचीन वीरगळ व इतर अवशेष आहेत. सोमेश्वर महादेव मंदिराच्या अगदी समोर असलेली समाधी ही मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे.
---------------------------
Business Enquiry-
[email protected]
Follow Us
Twitter-https://x.com/bhau_06_?t=csidEwDniqPYDylptrnRzw&s=09
Facebook-https://www.facebook.com/jagdish.mahadik.528?mibextid=ZbWKwL
Instagram-https://www.instagram.com/jsm_backpacker?igsh=MW1yaHB6MjloMW1sZQ==