13/05/2025
वैजापूर हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
अपघातात महिला जागीच ठार
तिघा चिमुकल्याण सह पाच जण गंभीर जखमी
Anch :समृद्धी महामार्गावर आज सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूनम चव्हाण (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला असून, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत
नाशिकहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा हा अपघात झाला.
या अपघातात अजयकुमार चव्हाण (वय ३८), आनंद चव्हाण (वय ३५), नॅन्सी चव्हाण (वय ८), अनन्या चव्हाण (वय ५) आणि पियानसी (वय ६) हे गंभीर जखमी झाले असून, जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे, ही बाब अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.