17/08/2021
युवासेना प्रमुख, मंत्री श्री.आदित्य साहेब ठाकरे यांचा आधार !!!
अफगाणिस्थान देशातील सध्याची असणारी अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती पाहता, शिवसेना नेते - सन्माननीय मंत्री, युवासेना प्रमुख श्री.आदित्य साहेब ठाकरे यांची अफगाणिस्थानातून पुणे विद्यापीठ, मॉर्डन कॉलेज - पुणे तसेच बृहन महाराष्ट्र कॉलेज - पुणे या महाविद्यालयांतून शिक्षण घेणाऱ्या अफगाणिस्थानातील विद्यार्थ्यांनी, आज सहयाद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन आपली व्यथा आणि चिंता त्यांच्यासमोर व्यक्त केली.
सध्याच्या अफगाणिस्थानामध्ये असलेली अराजकतेची परिस्थिती पाहता तसेच संवादाची सर्वच संसाधने बंद असल्यामुळे हे विद्यार्थी आपल्या कुटुंबापासून विभक्त झालेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाचा प्रश्न, व्हिसा अश्या भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर शक्य तितक्या शाश्वत मदतीचे आणि आधाराचे आश्वासन आदित्यसाहेबांनी त्यांना दिले आहे.
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ji
Aaditya Thackeray FC ji
Varun Satish Sardesai ji