19/05/2020
यावेळी दुकानदाराला समजून घ्या
हो मी दुकानदार , आपल्याच शहरातला, खेड्यातला म्हणजेच आपल्या गावातला नेहमीप्रमाणे माझी विक्री करायचो. उधार, रोख आणि बुडीत सर्व प्रकारच्या ग्राहकांना माल द्यायचो. सार्वजनिक उत्सव, जयंत्या सर्वांना यथाशक्य वर्गणी द्यायचो. स्थानिक प्रशासनाचे वार्षिक कर भरायचो. पण गेली दोन महीने लॉकडाउनमुळे सर्व बंद आहे. सध्या सरकार, प्रशासन सर्वजण आपआपल्या परीने मदत करत आहेत.
*दुकानदाराला काही ठिकाणी दुकान सुरू करण्यास मुभा दिली आहे. पण सुरक्षेच्या नियमावलीचे पालन करून. लोकांनी ओळीत यावे सोशल डिस्टनसिंग पाळावे.*
1. प्रत्येकाने आल्यावर प्रथम हात सानीटायझर ने स्वच्छ धुणे.
2. आधीच्या कस्टमर पासून 3 फुट अंतर ठेवून रांगेत उभे राहणे.
3. दोरीच्या बाहेरून माल मागणे व घेणे.
4. आधीच्या कस्टमरचे झाल्यावरच आपण वस्तु मागणे.
5. लवकर वस्तु निवडून खरेदी संपवणे.
*या सर्व बाबी या पुर्णपणे ग्राहकावर अवलंबून आहेत. पण त्याचे पालन न झाल्यास दंड दुकानदाराला होणार आहे. त्याचा परवाना सुद्धा रद्द केला जावू शकतो.एवढी कठोर कारवाई होऊ शकते *
*दुसरीकडे जुन्या सवयीप्रमाणे ग्राहकाच्या मनात वेगळेच सुरू असते.*
1. मी कायमचा ग्राहक आहे यांनी सर्वात आधी मलाच माल दिला पाहिजे.
2. एवढ्या ओळखीचा असल्यामुळे स्वच्छतेचे नियम मला सांगू नये.
3. या काळात वस्तूची किमंत कमी लावावी. [जी गोष्ट पुर्णपणे उत्पादक आणि मोठे व्यापारी यावर अवलंबून आहे.]
4. रांगेत उभे राहायला काय आम्ही फुकट माल मागतोय काय ?
5. या असल्या काळात माझ्या गरजेच्या वस्तूचा स्टॉक असलाच पाहिजे.
इथेही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष दुकानदारच दोषी ठरत आहे. ग्राहकाच्या मनात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. मग यात दुकानदाराची अवस्था फार बिकट झाली आहे.
रोग नियंत्रणात येत नाही तोवर प्रशासन कडक नियम करणार ते केलेच पाहिजेत नाहीतर परिस्थिती गंभीर होईल.
*दुकाने उघडली तर नियम पाळावेच लागतील. पण नाही पाळले गेले तर दंड भरावा लागेल या भीतीने बरेच दुकानदार दुकान उघडत नाहीत त्यामुळे काही वाईट प्रवृत्तीचे लोक किंमत वाढवून वस्तु विकत आहेत.*
त्यामुळे ग्राहकांनी कृपया आपल्या दुकानदाराला मदत म्हणून काही दिवस मान अपमान बाजूला ठेवून हे नियम पाळून खरेदी करावी. हीच मनापासून विनंती.
सर्व काही पूर्ववत झाल्यावर निवांत बसून एक कप चहा पाजूनच आम्ही तुम्हाला सोडू पण आता तेवढ अॅडजस्ट करा.
दुकानदाराला समजून घ्या तुम्हीच त्याची मदत करू शकता.