09/07/2021
बार्देश वार्ता…
उत्तर गोवा भाजपतर्फे म्हापसा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती साजरी
उत्तर गोवा भाजपतर्फे म्हापसा येथील कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली. म्हापसा मंडल समितीच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार ज्योशुआ डिसोझा, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, नगरसेवक साईनाथ राऊळ, तारक आरोलकर, स्वप्नील शिरोडकर, प्रिया मिशाळ, आशीर्वाद खोर्जुवेकर, माजी नगरसेवक तथा उत्तर गोवा सरचिटणीस राजसिंह राणे, म्हापसा मंडल अध्यक्ष सुशांत हरमलकर, सरचिटणीस यशवंत गवंडळकर व योगेश खेडेकर, म्हापसा भाजयुमोचे अध्यक्ष तन्वेश केणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महानंद अस्नोडकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी संदीप फळारी व ज्योशुआ डिसोझा यांनी डॉ. श्यामाप्रसाद यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. अखेरीस राजसिंह राणे यांनी आभारप्रकटन केले.