News Katta

News Katta News Katta is the national news channel

जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
06/09/2023

जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२...
12/04/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असे बोलून कॉल कट करण्यात आला. सोमवारी रात्री ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. कॉल करणारा शास्त्री नगर, धारावी इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी राजेश आगवणे या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत आधी ॲम्बुलन्सला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने उड्डाण केलं आहे. वायुदल पायल...
08/04/2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने उड्डाण केलं आहे. वायुदल पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू लढाऊ विमानाने उड्डाण करत आहेत. राष्ट्रपती या तीनही दलाच्या प्रमुख असतात. याआधी 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी देशातील या अत्याधुनिक लढाऊ विमानाने उड्डाण केले होते.

अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढतच आहे. जगभर दरवर्षी अंदाजे...
08/04/2023

अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढतच आहे. जगभर दरवर्षी अंदाजे वीस कोटी लोक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होत आहेत. या आपत्तीमुळे बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी विकसनशील राष्ट्रांना १४० अब्ज डॉलरच्या आसपास खर्च करावा लागतो आहे.

अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. झुकेगा नही साला म्हणणारा पुष्पा लोकांना आवडलाच शिवाय पुष्पाने बॉ...
08/04/2023

अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. झुकेगा नही साला म्हणणारा पुष्पा लोकांना आवडलाच शिवाय पुष्पाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा सुपरहिट कामगिरी केली. आता अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अखेर निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चा दुसरा टीझर रिलीज केला आहे. 3 मिनिट 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये चाहत्यांना त्यांच्या अनेक प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

रोहित शेट्टी हे बॉलिवूड सिनेमातलं मोठं नाव. पैसा वसूल करणारे हटके कॉमेडी सिनेमे करण्याबाबत रोहित शेट्टीला ओळखले जाते. रो...
20/03/2023

रोहित शेट्टी हे बॉलिवूड सिनेमातलं मोठं नाव. पैसा वसूल करणारे हटके कॉमेडी सिनेमे करण्याबाबत रोहित शेट्टीला ओळखले जाते. रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांशी खास नातं आहे. आता रोहित शेट्टी मराठीत एक सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोहित शेट्टी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी सिनेमाशी संबंध जोडणार आहे. सिनेमाचं नाव स्कुल, कॉलेज आणि लाईफ.

सुबोधच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं येत्या काळात आपण कोणत्या भूमिकेत दिसणार आहोत, याविषयी सां...
17/03/2023

सुबोधच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं येत्या काळात आपण कोणत्या भूमिकेत दिसणार आहोत, याविषयी सांगितलं आहे. सुबोध हा जगद्गगुरु संत तुकाराम यांच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सुबोधनं तो फोटो शेयर करताच त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे. कित्येक चाहत्यांनी त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोधनं फेसबूकवरुन एक खास पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझ्या दिग्दर्शकांचे मी आभार मानतो.

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आजपासून (17 मार्च) कार्यान्वित...
17/03/2023

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आजपासून (17 मार्च) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला 'महिला सन्मान योजना' म्हणून ओळखले जाणार आहे.

होणाऱ्या नवरीला १२ वीच्या परिक्षेत कमी मार्क आले म्हणून नवरदेवाने थेट लग्न कॅन्सल केल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील ...
17/03/2023

होणाऱ्या नवरीला १२ वीच्या परिक्षेत कमी मार्क आले म्हणून नवरदेवाने थेट लग्न कॅन्सल केल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तिरवा कोतवाली भागात ही घटना घडली. या विचित्र घटनेमुळे सगळे चकित झाले आहेत. अधिक माहितीनुसार, ‘गोध भराई’ विधी करूनही हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने वराच्या कुटुंबीयांनी लग्न कॅन्सल केल्याचा आरोप वधूच्या कुटुंबीयांनी केला आहे. पण वधूला १२ वीच्या परिक्षेत मार्क कमी मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचं वराकडील मंडळींनी सांगितलं आहे.

रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तू झुठी मैं मक्कार बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या चित्र...
14/03/2023

रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तू झुठी मैं मक्कार बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली होती. याच आठवड्यात चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असं जाणकारांचं मत आहे.

भारतीय नौसेनेचे एक आडव्हांस लाइट हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी नियमीत उड्डाणादरम्यान सकाळी मुंबई किनार्‍याजवळ कोसळले. तात्काळ...
08/03/2023

भारतीय नौसेनेचे एक आडव्हांस लाइट हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी नियमीत उड्डाणादरम्यान सकाळी मुंबई किनार्‍याजवळ कोसळले. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती जहाजाने हेलिकॉप्टरमधील तीन क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Happy International Women's Day!
08/03/2023

Happy International Women's Day!

रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने भल्या भल्...
06/03/2023

रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने भल्या भल्या बॉलीवुड सेलेब्रिटींनाही मागे टाकले आहे. सध्या एमसी रस्त्यावर उतरला तरी हजारोंची गर्दी त्याला पाहायला मिळत आहे. अशातच त्याच्या लाखों चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या हटके बाजाने आणि भन्नाट गाण्याने प्रसिद्ध असलेला स्टॅन बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो एका चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात दोघांनी गैरव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास साडेसात लाख रुपयांच्या ग...
04/03/2023

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात दोघांनी गैरव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास साडेसात लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्य...
04/03/2023

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत.

शाहरुखच्या पठाणने 'बाहुबली 2' च्या हिंदी आवृत्तीचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. 'पठाण'ने भारतात आतापर्यंत एकूण 510.55 ...
04/03/2023

शाहरुखच्या पठाणने 'बाहुबली 2' च्या हिंदी आवृत्तीचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. 'पठाण'ने भारतात आतापर्यंत एकूण 510.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने बाहुबली 2 चित्रपटाचा 510.99 कोटींच्या कमाईला मागे टाकलंय.

वुमन्स प्रीमियर लीग च्या पहिल्या सीजनची सुरुवात ४ मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणा...
03/03/2023

वुमन्स प्रीमियर लीग च्या पहिल्या सीजनची सुरुवात ४ मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या महिला संघानेही आपल्या संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर मुंबई संघाची जबाबदारी असणार आहे. लिलावादरम्यान मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हरमनप्रीत कौरला 1 कोटी 80 लाख रुपये खर्चून संघात समाविष्ट करुन घेतले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. स...
03/03/2023

बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. सकाळी १० वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Katta:

Share