Frame Me Media

Frame Me Media Frame Me Media Pvt Ltd is a digital production company for film and entertainment.

पहाट झाली दिवस उगवला,आला आला सण दसऱ्याचा आलाअंगणी रांगोळ्या, दारात तोरणं उत्सव, उत्सव हा प्रेमाचा सोन घ्या सोन !दसरा निम...
04/10/2022

पहाट झाली दिवस उगवला,
आला आला सण दसऱ्याचा आला
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं उत्सव, उत्सव हा प्रेमाचा सोन घ्या सोन !
दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा...


आजपासून सुरू होणा-या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असलेली अंबे माता ...
25/09/2022

आजपासून सुरू होणा-या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
||अंबे माता की जय||


अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोळ्यांची ग...गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा
31/08/2022

अशी चिक्क मोत्याची माळ होती ग
तीस तोळ्यांची ग...

गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा

ऐसा देश है मेरा...स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा...
14/08/2022

ऐसा देश है मेरा...
स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा...

बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत ...
11/08/2022

बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा..


गुरू पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा...       #गुरुपौर्णिमा
12/07/2022

गुरू पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा...

#गुरुपौर्णिमा

चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,तो पहा विटेवरी...माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी...
09/07/2022

चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी...
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...
#वारी

#वारकरी #विठूमाऊली

02/07/2022

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा ब्रॅण्ड महाराष्ट्राचा ने सन्मान...

आपल्या महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांचा वेध घेणारा कार्यक्रम आपला महाराष्ट्र मध्ये घेतलेला आढवा.

▪️ ममता सिंधुताई सपकाळ
▪️ तुषार प्रीती देशमुख
प्रसारण : शनिवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 10:30 सायंकाळी 4 वाजता आणि रात्री 8 वाजता...

दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर...

नक्की पहा 🙏
#ब्रॅण्ड_महाराष्ट्राचा #दूरदर्शन #आपला_महाराष्ट्र

🏆 प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा 'ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ ने सन्मान..."छत्रपती शिवाजी महाराज, घटनाका...
27/06/2022

🏆 प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा 'ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ ने सन्मान...

"छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे खरे ब्रँड- माजी केंद्रीयमंत्री अरविंद सावंत

💫 ममता सिंधुताई सपकाळ आणि शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा विशेष सन्मान

मुंबई : "महाराष्ट्राचे खरे ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या या ब्रँड त्रिशूळाला विसरता येणार नाही. असं असताना काही जण महाराष्ट्राचं नाव बदनाम करत आहेत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पिछाडीवर आहे अशा वल्गना केल्या जात आहेत. त्यांच्यासाठी 'ब्रँड महाराष्ट्राचा' पुरस्कार सोहळा आणि इथे जमलेले यशस्वी उद्योजक हे एकप्रकारचं उत्तर आहे. कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या इथे जमलेल्या 'महाराष्ट्राच्या ब्रँड'ने अशीच यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत, " असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी काढले. पुढचं पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ आणि शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना ममता सिंधुताई सकपाळ म्हणाल्या, "खरं तर हा सन्मान माझा नाही तर माझी आई माई सिंधुताई सकपाळ यांचा आहे. खरं तर आईच्या कार्याला सीमा नव्हती. त्या वाटेवरून चालणं एक प्रकारचं आव्हान आहे. ते मी स्वीकारतेय.अजून खूप मोठी मजल मारायची आहे.."
याप्रसंगी प्रसाद पाटील आणि निलेश पाटील (निवारा ग्रुप ऑफ कंपनीज), विक्रांत उर्वल (आयआयटीसी ग्लोबल करियर्स), करणजीत सिंग (विथ यू फाउंडेशन ), मयूर देशमुख (ऍग्रोवन फाउंडेशन), अवधूत साठे (अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी), डॉ. ओमप्रसाद पडते (मुक्ता रीअॅलिटी), कौशिक भाई मधुभाई कोटिया (योगेश्वर ग्रूप ), अभिजीत घोरपडे (ग्रीनफिल्ड अॅग्रिकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड), संकेत आवटे (संकेत आवटे फाईनटेक प्रायव्हेट लिमिटेड), डॉ. पांडुरंग कदम (संकल्पा एचआरडी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे), सुनील राठोड (फिनिक्स लँडमार्क), गजानन दळवी (लोकत्रयाश्रय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड), अमित दळवी (समिरा इन्नोव्हेशन), कन्हैया कदम (सर्वज्ञ हॉस्पिटल अँड के.के. इंडस्ट्रीज, नांदेड), ॲड सुयोग पगाडे (स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चर) या सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.
शून्यातून उद्योगविश्व तयार करणारे आणि कोरोनाकाळात शेकडो कुटुंबांचा आधार बनलेल्या या उद्योजकांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात देखील अशा होतकरु ब्रॅण्ड्सना सन्मानित करत राहू, असा मानस *पुढचं पाऊल ट्रस्टचे संचालक भरत शिंदे* यांनी व्यक्त केला.

'फ्रेम मी मीडिया' आणि 'मीडिया माइंड ॲड्स'' यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या यशोगाथा ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ या पुरस्कार सोहळ्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ समन्वयक समितीचे महासचिव अभिजीत राणे, व्यवस्थापकीय संचालक भरत शिंदे, समन्वयक सचिन नारकर, कार्यवाहक विजय तिवारी यावेळी उपस्थित होते.
धन्यवाद!

पुढचं पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ब्रॅण्ड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात महाराष्ट्रा...
20/06/2022

पुढचं पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ब्रॅण्ड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १७ उद्योजकांचा सन्मान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आला. दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधू सपकाळ आणि शेफ तुषार प्रिती देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
#ब्रॅण्ड_महाराष्ट्राचा Abhijeet Rane Pudhach Paaul

पुढचं पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ब्रॅण्ड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात महाराष्ट्रा...
18/06/2022

पुढचं पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ब्रॅण्ड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १७ उद्योजकांचा सन्मान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आला. दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधू सपकाळ आणि शेफ तुषार प्रिती देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
#ब्रॅण्ड_महाराष्ट्राचा Abhijeet Rane Pudhach Paaul

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या 17 उद्योजकांना "ब्रॅण्ड महाराष्ट्राचा" पुरस्काराने सन्मान... #ब्रॅण्ड_महाराष्ट्राचा...
17/06/2022

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या 17 उद्योजकांना "ब्रॅण्ड महाराष्ट्राचा" पुरस्काराने सन्मान...
#ब्रॅण्ड_महाराष्ट्राचा Abhijeet Rane Shivsena

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Frame Me Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Frame Me Media:

Share