MNS Maharashtra

MNS Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MNS Maharashtra, Media/News Company, Mumbai, Mumbai.

Permanently closed.
31/12/2025
मराठा बांधवांनो मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेल्या मार्गानेच आरक्षण भेटेल, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून बसची जाळपोळ ...
31/10/2023

मराठा बांधवांनो मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेल्या मार्गानेच आरक्षण भेटेल, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून बसची जाळपोळ करून हे आंदोलन काही मंडळीकडून जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो , तो प्रयत्न जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनीच हाणून पाडूया.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांची 'स...
12/11/2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी भेट घेतली. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटावा आणि कामगारांच्या वेतनविषयक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी ही भेट होती. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे होते.

याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री. कीर्तिकुमार शिंदे, सचिव श्री. हर्षल देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री. विलास अकलेकर, सरचिटणीस श्री. मोहन चावरे उपस्थित होते.

#मनसे_एसटी_कामगारांसोबत

योग्य व्यक्ती सार्थ निवड! 💐💐महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी सौ. आदिती ताई सोनार ह्यांची मनसे महिला सेनेच्या 'रायग...
11/11/2021

योग्य व्यक्ती सार्थ निवड! 💐💐

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी सौ. आदिती ताई सोनार ह्यांची मनसे महिला सेनेच्या 'रायगड जिल्हाध्यक्ष' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा!

#रायगडमनसे

11/11/2021

एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मनसेच्या वकिलांची फौज तय्यार!

"एसटी संपाबाबत सरकारमध्ये कोणाशी बोलायचं, हे राजसाहेबांना चांगलं ठाऊक!" - श्री. बाळा नांदगावकर

मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर साहेब ह्यांचे राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकांना 'एस. टी' कर्मचाऱ्यांच्या आंद...
08/11/2021

मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर साहेब ह्यांचे राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकांना 'एस. टी' कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन!

दिनांक ८ नोव्हेंबर २०२१

प्रति,
महाष्ट्र नवनिर्मान सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक…

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

महाष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपणा सर्वांना या पत्राद्वारे सुचित करण्यात येते कि, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज एसटी कर्मचारी- कामगार जगला, तरच एसटी जगेल' हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या पत्राद्वारे महाष्ट्र नवनिर्मान सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करण्यात येते कि, मा.राजसाहेबांच्या आदेशानुसार आपणा सर्वांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.

आपला नम्र,

बाळा नांदगांवकर,
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Raj Thackeray Bala Nandgaonkar Raju Patil - Pramod Ratan Patil

04/11/2021

शिवाजी पार्क दीपोत्सव …..
प्रचंड प्रतिसाद ….
मनसे धमाका …..🚩🚩

"एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती...
04/11/2021

"एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल."

मा. मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित 'दीपोत्सव' अनुभवण्यासाठी दररोज हजारो मुंबईकर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथ...
04/11/2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित 'दीपोत्सव' अनुभवण्यासाठी दररोज हजारो मुंबईकर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हजेरी लावत आहेत. स्वतःच्या मोबाइल कॅमेऱ्यात रोषणाईचे उजळ क्षण टिपत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत आज सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्रीम. प्रार्थना बेहेरे, श्री. संकर्षण कऱ्हाडे, श्रीम. काजल काटे, श्री. शाल्व किंजवडेकर, श्रीम. अन्विता फलटणकर यांनी शिवतीर्थावर हजेरी तर लावलीच, पण फुलबाज्यांसह दिवाळीचा मनमुराद आनंदही लुटला. पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई, विभाग अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, महिला विभाग अध्यक्षा सौ. सुनेत्रा जाधव आणि अन्य पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

#मनसे_दीपोत्सव #मनसेवृत्तांत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण..  news network
23/10/2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण..
news network

Address

Mumbai
Mumbai
4000039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share