14/04/2020
एकीकडे जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे याच पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन लागू केलेला आहे तर दुसरीकडे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे विद्यार्थी व शिक्षक यांचा विचार करून मेआर एसोसिएशन तर्फे घरी बसून आनलाईन प्रतियोगिततेचे (E-Competiton) आयोजन करण्यात आले होते त्यात मुंबई,ठाणे व भिवंडी या भागातील उर्दू,हिंदी,मराठी व इंग्रजी माध्यमातील अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला व आपल्या घरी राहूनच अनेक शैक्षणिक व्हिडीओ तयार करून मेयार एसोसिएशन यांना पाठविले त्यात १०० विद्यार्थी व ३५ शिक्षक यांनी आपले विविध पद्धतीने व्हिडीओ तयार केले आहे या सर्वांमधून सुपर सिक्स विद्यार्थी व शिक्षक तसेच बेस्ट व्हिडीओ वीव्स यांची निवड करून त्यांना लॉकडाऊन संपल्यानंतर सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सहभागी झालेल्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभाग आनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले आहेत यांची निव्वड करण्याकरिता मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सुद्धा आपले मूल्यवान वेळ दिले त्यात श्री अजय वाणी (उपशिक्षणाधिकारी तथा शिष्यवृत्ती तज्ञ) , श्रीम आरिफ शेख ( निरीक्षक शाळा तथा बालभारती सदस्य) श्रीम ललिता गुलाटी (मुख्याध्यापिका तथा राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त) यांचा समावेश आहे. या प्रतीयोगीतेचे आयोजन मेयार एसोसिएशन तर्फे करण्यात आले होते याचे संपूर्ण नियोजन व आयोजन शेख इक्बाल आर यांनी मोहसीन साहिल तसेच मोहम्मद जिशान यांच्या मदतीने पूर्ण केले त्याचबरोबर इब्राहीम अन्वर, अन्सारी उबेदुर्रहमान,मोहम्मद मुजाहिद,अन्स्राई वासीफ,शेख जरीफ महिला सदस्य रेहना सुर्वे,उजमा फिरदोस,शाहीन शेख व मेयार टीम यांचे सहकार्य लाभले सदर प्रतीयोगितेची संपूर्ण माहिती httsp://meyaar.blogspot.com या संकेतस्थळावर E-Competiton या मध्ये टॅब उपलब्ध आहे.