Voice Up Digital

Voice Up Digital Voice Up Digital..! Marathi Digital Infotment

14/04/2021

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्त जाणून घेऊयात त्याच्यांबद्दल काही खास गोष्टी..!

१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे साहित्य : Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कारकिर्दित सुरू केलेली दैनिके :
मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).

४.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आंदोलने : महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

५. समाजकल्याणासाठी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वाच्या संस्था : बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).

06/04/2021

पुनश्च लॉकडाऊन ..? जबाबदार कोण..?

लॉकडाऊन म्हणलं की प्रथम आपल्या अंगावर काटा येतो. कारण जवळ जवळ ४ महिन्यांहून अधिक मोठ्या काळाचा लॉकडाऊन आपण अनुभवला हा कारण देखील तितकेच गंभीर होते. कोव्हिड १९ विषाणू केवळ भारतातच नव्हे तर जगभरात थैमान घालतं होता. कुठेतरी या सर्वातून बाहेर पडून सरकारी नियम पाळून पुनश्च हरीओम म्हणजेच पुन्हा सर्व सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा कोव्हिड १९ ची दुसरी लाट भारतात आली आहे. आणि सरकार लॉकडाऊन लावण्यावर विचार करत आहे. आणि जनता, विरोधक नेते, आणि सर्वच व्यापार व्यावसायिक याला कडाडून विरोध करीत आहेत. मात्र या पुन्हा लागणार्या लॉकडाऊन ला जबाबदार कोण हा विचार मात्र कोणीच करत नाहीये..?
याला जबाबदार आपणच आहोत. ट्रेन बस तुडुंब भरून प्रवास होत आहे. फँशन म्हणून मास्क चा वापर होत आहे की जो नाकावर कमी आणि गळ्यावर च बहूतेक जणांच्या असतो. आणि २ फूट तर सोडाच २० सेंटीमीटर च पण सोशल डिस्टंसिंग आपण पाळत नाही.
चूका आपल्याच आहेत फळंही आपणचं भोगतोय.!

- विक्रम पाटील.
फिल्म प्रोड्युसर, लेखक.

CMOMaharashtra World Health Organization World Health Organization (WHO)World Health Organization (WHO)World Health Organization (WHO) Adar Poonawalla Vikram Patil

05/04/2021

सॅमसंग 'हा' बहुप्रतिक्षित स्मार्टफोन उद्या होणार लाँच..!

VoiceUp | Tech

सॅमसंग कंपनीचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy F12 उद्या म्हणजेच 5 एप्रिलला भारतात लाँच करण्यात येणार आहे.

फोनमध्ये विशेष काय?

▪️ या स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेंसर मिळणार आहे.

▪️ या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा असू शकतो. तसेच 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

▪️ कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये USB Type-C पोर्ट दिला असून 3.5mm ऑडिओ जॅक दिला आहे. तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असू शकतो.

▪️ दरम्यान, सॅमसंगच्या सॅमसंग गॅलेक्सी एफ12 मध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ऑटोमोबाईलपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच व्हॉईसअप लाईक करा आणि शेअर करा.
Samsung Vikram Vikram Patil.Vikram Patil.

04/04/2021

उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांची खास मुलाखत..!

जगधिशा.., स्वराज्यमालक..,हिंदवी स्वराज्य संस्थापक..राजाधिराज जिजाऊपुत्र..छत्रपती शिवराया..वंदन आज तुम्हांसी करतो..नतमस्त...
03/04/2021

जगधिशा.., स्वराज्यमालक..,
हिंदवी स्वराज्य संस्थापक..
राजाधिराज जिजाऊपुत्र..
छत्रपती शिवराया..
वंदन आज तुम्हांसी करतो..
नतमस्तक होऊनी तुमच्या पाया..
न्यायमूर्ती शिवराया..
मूठभर मावळ्यांसी घेऊनी..
स्वराज्य निर्मिले..
संपूर्ण आयुष्य मायभवानी चरणी अर्पिले..
प्रजाहितक शिवराया..
मुजरा आज स्विकारावा,
अखंड सुखी हिदुंस्थान हा आशिर्वाद द्यावा..!

लेखक : विक्रम पाटील

'हे' शेअर्स देतील कमाईची मोठी संधी...!Voice Up | Finance आज कोणकोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी कमाईची स...
03/04/2021

'हे' शेअर्स देतील कमाईची मोठी संधी...!

Voice Up | Finance

आज कोणकोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी कमाईची संधी आहे? यावर एक नजर टाकुयात...

● IndiaMART InterMESH Ltd
● Srei Group
● Adani Green
● Welspun India Ltd
● MTAR Tech
● AU Small Finance Bank
● Max Healthcare
● Allcargo Logistics
● Tata Communications
● Sw****ka Investmart Ltd

टीप : बाजारातील काही सकारात्मक निर्णयांमुळे वरील शेअरचा भाव वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुंतवणूक, आर्थिक माहिती आणि सल्ला हा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीवर आधारित आहेत. आपण गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यावे व्हॉईसअप कोणत्याही माहितीस जबाबदार राहणार नाही.

शेअरबाजार ते उद्योग क्षेत्रातील सर्व आर्थिक घडामोडीं जाणून घेण्यासाठी आजच फॉलो करा , लाईक करा व्हॉईसअप डिजिटल..!

💁‍♂️ आजचे राशिभविष्य; 03 एप्रिलVoice Up | Astrology1. मेष : धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेव...
03/04/2021

💁‍♂️ आजचे राशिभविष्य; 03 एप्रिल

Voice Up | Astrology

1. मेष : धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखनी जपून चालवावी.

2. वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील. उधळ पट्टीला आवार घालावी. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील.

3. मिथुन : जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळते जुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका.

4. कर्क : कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या.

5. सिंह : कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये.

6. कन्या : सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका.

7. तूळ : मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा.

8. वृश्चिक : विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल.

9. धनु : जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामांत मन रमवावे.

10. मकर : सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी.

11. कुंभ : अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल.

12. मीन : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका.

काय शुभ? काय अशुभ...? आपल्या राशीनुसार जाणून घ्या आपले भविष्य त्यासाठी आजच फॉलो करा व्हॉईस अप डिजिटल..!

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर🎥Voice Up | Entertainment ● दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टी...
02/04/2021

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

🎥Voice Up | Entertainment

● दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

● केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली असून येत्या 3 मे रोजी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

● चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार आत्तापर्यंत 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे.

● दरम्यान आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे.

बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच फॉलो करा आणि लाईक करा Voice Up Digital..!

जाणून घेऊयात चांगल्या झोपेसाठी खास टिप्स..Voice Up| Specialझोप हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे यात शंका नाही. परंत...
02/04/2021

जाणून घेऊयात चांगल्या झोपेसाठी खास टिप्स..

Voice Up| Special

झोप हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे यात शंका नाही. परंतु आपल्या चांगल्या आरोग्यासाठी देखील पुरेशी झोप आवश्यक आहे. आज झोपेविषयी काही खास टिप्स जाणून घेऊयात...

● झोपण्यापूर्वी किमान 1 तास अगोदर मोबाईलचा वापर बंद करा.

● झोपण्यापूर्वी जास्त मसालेदार जेवणाचे सेवन करू नये.

● रात्री वादविवाद किंवा नकारात्मक विचार करू नये.

● झोपण्याचे आसन आणि उशी आरामदायी असावी.

● झोपण्यापूर्वी डोळ्यासमोर आनंदी, चांगली दृशे आणा.

✔️ झोपेचे असेही फायदे : जर आपली झोप पूर्ण झाली तर कार्यक्षमता वाढते, आरोग्य सुधारते. त्यामुळे किमान 8 तासांची झोप घ्यावी असा सल्ला दिला जातो.

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच फॉलो करा आणि लाईक करा Voice Up Digital..!

प्रभू येशूच्या त्यागाचा आणि बलिदानाचा दिवसVoice Up | Special 'गुड फ्रायडे' हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ...
02/04/2021

प्रभू येशूच्या त्यागाचा आणि बलिदानाचा दिवस

Voice Up | Special

'गुड फ्रायडे' हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे.

'गुड फ्रायडे' च्या दिवशी प्रभू येशू यांना वधस्तंभावर खिळण्यात आले. या दिवसाची आठवण म्हणून ख्रिस्ती बांधव हा दिवस 'शोकदिवस' म्हणून पाळतात.

या दिवसाला ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे अशा नावांनी ही संबोधले जाते. यावर्षी हा सण 2 एप्रिल रोजी आहे व 4 एप्रिल रोजी 'ईस्टर संडे' आहे.

● 'गुड फ्राइडे' कसा साजरा केला जातो?

या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात. काही लोक येशूच्या स्मरणार्थ काळे कपडे परिधान करुन शोक व्यक्त करतात आणि पदयात्राही काढली जाते.

● या दिवशी काय करतात ?

'गुड फ्रायडे' ला चर्च व घरात सजावट करत नाही. या ‍दिवशी येशूच्या शेवटल्या सात वाक्यांचे पाठ केले जाते. या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात.

● ईस्टर संडे म्हणजे काय?

येशू यांना वधस्तंभावर खिळण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रभू येशू पुन्हा जिवंत झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 40 दिवस वेळ घालवला. प्रभू येशू पुनःजीवित झाल्याने या दिवसाला ईस्टर संडे म्हटले जाते.

👏 प्रभू येशू यांची महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवारला 'गुड फ्रायडे' म्हटले जाऊ लागले.

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच फॉलो करा आणि लाईक करा Voice Up Digital..!

‘त्याने’ समोसा विकण्यासाठी Google मधील नोकरी सोडली💯🍝देशातील अथवा जगातील मोठ्या कंपनीत काम करणे, हे आपल्या सर्वांचे स्वप्...
02/04/2021

‘त्याने’ समोसा विकण्यासाठी Google मधील नोकरी सोडली💯🍝

देशातील अथवा जगातील मोठ्या कंपनीत काम करणे, हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते. आणि हेच स्वप्न आपण ध्यानी ठेऊन आपण शिक्षण घेत असतो. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या ड्रीम जॉबच्या शोधात असतो. तुम्हा-आम्हासारखा मुंबईचा मुनाफ कपाडिया हा युवक आपल्या ड्रीम जॉबच्या शोधात होता. त्यासाठी त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आणि त्याला Google या जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अशी संधी बरे कोण सोडेल? मुनाफनेही या संधीचे सोने केले. चांगले वेतन आणि नोकरीतील स्थिरतेमुळे त्याचे जीवन सुरळीत होते. दरम्यान, हौशी माणूस कधीही स्वस्थ बसत नाही, या संकल्पनेमुळे मुनाफला गुगलमधील नोकरीत काहीतरी कमतरता जाणवत होती. फावल्या वेळेमध्ये आपण आपल्यासाठी काही करु शकतो का, याचा विचार तो करु लागला.

आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आल्यावर आपल्याला मार्ग सापडतोच...!
मुनाफनेही परिघापलिकडचा विचार केला. दरम्यान, आपल्या आईला निरनिराळे फूड शोज् पाहून नवनवीन पदार्थ करायला आवडतं, हे त्याने पाहिले होते. आपण या आधारित काही करु शकतो का, अशी कल्पना त्याच्या मनात आली.

आपल्या आईची मदत घेऊन मुनाफने फूड चेन सुरु करण्याचे ठरविले. त्यास ‘दी बोहरी किचन’ असे नाव दिले. बोहरी समाजात मिळणा-या चविष्ट आणि निरनिराळ्या डिशेसमुळे अल्पावधीतच या हॉटेलचे नाव सर्वदूर झाले. वेगवेगळे समोस्याचे प्रकार ही ‘दी बोहरी किचन’ची खासियत आहे. त्या जोडीला अनोखे कबाब आणि बिर्याणीवर तर खवय्ये आडवा हात मारतात.

काही वर्षातच ‘दी बोहरी किचन’ने फुड आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चांगलाच जम बसवला. सध्या मुनाफच्या हॉटेलचा टर्नओव्हर 50 लाख आहे. भविष्यात त्याला हा ३ कोटींपर्यंत न्यायचा असल्याचे मुनाफने सांगितले. तसेच मुंबईमध्ये थाटलेल्या या हॉटेलचा बिझनेस त्याला दिल्ली, बंगळुरू आणि अमेरिकेतील न्युयॉर्कपर्यंत न्यायचा आहे. मुनाफ कपाडिया आणि त्याच्या आईच्या ‘दी बोहरी किचन’ या व्हेंचरने मुनाफला Forbes Under 30 list मध्ये जागा मिळवून दिली. एक आयडिया आपले जीवन बदलू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुनाफ कपाडिया यांचे ‘दी बोहरी किचन’!
- Team Voice Up Digital
[ Vikram Patil. ]

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice Up Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category