
21/06/2025
आता हा नवीन धंदा चालू केला आहे का? चौकशीअंती सत्य समोर यायला हवे?
गाडी कोणाची होती, उत्पन्न किती, पगार किती, ऑन ड्युटी होते का, कुठे आणि का निघाले होते, हे चौकशीत पुढं आणावे!
मुर्दाडांची मुर्दुमकी
आयुष्य शांतपणे आपापल्या पद्धतीने जगत कुणालाही आपला त्रास होवू न देत
जे येईल ते प्राक्तन भोगून संपवत जगन हे माणुसपणाच लक्षण .
आपण बहुतेक सामान्य माणस… इथे आपला जन्म झाला आणि इथल्या असल्या नसल्या विविध परंपरांचा पाईक होवून जगण्यात धन्यता माननांरे आपण सगळी सामान्य माणसे.
इथे सरकारी यंत्रणा पोसते आपल्या जीवावर. आपण प्रामाणिकपणे भरत असलेल्या आयकरावर.. सामान्य माणूस पापभीरू आणि सरळ असतो.
पण इथे काही अपवाद असे आहेत की आपण काहीतरी असामान्य आहोत असं भासवत अगदी तृतीय श्रेणी कर्मचारी असले तरी सरकारी आहोत म्हणून मुर्दाडपणाची मर्दुमकी दाखवून सामान्याना पिळणारे नडणारे पोलीस यंत्रणेतील कर्मचारी किती अरेरावी आणि दादागिरी करतात याचा एक अनुभव आज आला. मला असा अनुभव आजपर्यंत कधी आला नाही. त्यामुळे मी असा अनुभव सांगणाऱ्या लोकांकडे पूर्वी शंकेने बघायचो. कदाचित मी माझ्या पूर्वायुष्यात पत्रकारिता केली , एका वर्तमानपत्रासाठी क्राइम रिपोर्टिंग केलं त्यावेळी कदाचित पोलीस कर्मचारी जरा बरे असावेत !
वेळ साधारण दुआपरची एक वाजण्याच्या आसपास. मी एका कामनिमित्त मनगाव वरून अहिल्यानगरला चाललो होतो.
सावेडी नाक्यावर माझ्या डाव्या बाजून एक काळी काच असणारी काळी क्रेटा गाडी भरकन मला पुढच्या बाजूला घासून गेली. माझ्या डाव्या बाजूच्या आरशाखाली चांगलेच घासले गेले. मी या अचानक प्रसंगाने भांबावून गेलो.
इतक्यात ती काळ्या रंगांची कार पुढे जावून थांबली. त्यातून फिल्मी स्टाईल रेबन चा गॉगल लावलेला अडदंड माणूस आणि त्याचा सहकारी उतरले. तो फिल्मी स्टाईलने माझ्या बाजूला आला अस्सल शिवी हासडून खाली उतर म्हणाला. आता ऐन रस्त्यावर कसे उतरणार मी गाडी बाजूला घेवू लागलो तर आमच्या अंगावर गाडी घालतो काय म्हणत तो धावून आला.
अतिशय उर्मट पणे बोलणारा हा कुणी तरी लोकल गुंड असावा असे वाटत होते. काय करावे हे सुचत नव्हते.
आमच्या गाडीच नुकसान भरून दे नाहीतर बघतो तुझ्याकडे म्हणत त्याने आक्रमक पवित्रा घेतला. वास्तविक गाडीला फार काही झाले नव्हते. पण त्याचा आविर्भाव भयंकर होता.
हा लोकल गुंड असावा असे वाटल्याने त्या परिसरातील मोठे नाव असणाऱ्या आमच्या एका मित्राला फोन लावला. तो ही गडबडीने यायला निघाला तर हा रेबन गॉगल वाला म्हणाला मी पोलीस आहे. चल पोलिस स्टेशनला तुझ्यावर गुन्हाच दाखल करतो. आत्ता इतक्या किरकोळ गोष्टीसाठी गुन्हा ?
मग म्हणला चल शो रुमाल आमच्या गाडीच झालेल नुकसान भरून तितकी रक्कम दे. .त्याची नियत आत्ता लक्षात आली होती.
मी माझी बहीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे तिला फोन लावला. तिनेही याला समजावलं पण हा म्हणजे श्रीरामपूरचा डीबी चा पोलीस शिपाई तो ऐकतोय होय ? कसं तरी बराच वेळान आईकलं पण फोन ठेवल्यावर परत गुणावर आला.
मला चूक मान्य कर सांगू लागला. शेवटी गाढवापुढे शहाणपण दाखवायचे नसते असे म्हणतात. त्याप्रमाणे मी हो मी रस्त्यावर गाडी घेवून आलो ही माझीच चूक समजून पुन्हा मार्गस्थ झालो.
यानिमित्त काही प्रश्न निर्माण झाले.
पोलीस खात्यात साधा डीबी कर्मचारी असणार व्यक्ती काळ्या काचा , काळी गाडी आणि महागडा रेबन आणि आयफोन १६ प्रो बाळगू शकतो म्हणजे पोलीस खाते किती अफाट काम करते ?
पोलीस गुंडगिरी करतात की सामन्याच्या भल्यासाठी काम करतात ?
रस्त्यावर कुणाचाही मुल्हीजा न बाळगता कुणालाही दादागिरी करण्याचे यांना अधिकार कुणी दिले ?
त्या त्या पोलिसस्टेशन प्रभारींचे या कडे लक्ष असते की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ?
माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला हे असं भोगावं लागत असेल तर सामान्य माणूस काय डेंजर घाबरत असेल आणि ते जे म्हणतील मागतील ते करत असतील ?
शेवटी तो एक वाक्य मात्र म्हणाला तुझी” भहीन “ पोलीस खात्यात आहे म्हणून सोडल नाहीतर बघितल असतं ….
मी तर फार घाबरलो बाबा ….!
हेच पोलीस रात्री बेरात्री त्यांना कुणी बेवारस सापडले म्हणजे कुणा कार्यकर्त्याने आग्रह धरला तर त्यांना मिळून आलेल्या महिलेला रात्री पोलिस स्टेशन मध्ये ठेवता येत नाही तेव्हा रात्र रात्र आमची झोप हराम करतात. अर्थात रस्त्यावरच्या माय माऊलीना सांभाळण त्यांना कायमच घर देण, त्यांची रस्त्यावरच्या अत्याचारातून झालेली बाळंतपण करण हे आम्ही स्वीकारलेलं काम आम्ही कधी कोणतीच सबब सांगून टाळत नाहीत.
आज ४७७ माता भगिनी आणि ४२ मुलं मनगावी सुखेनैव राहतात. पण हे असे पोलिसांच्या मुर्दुमकीचे अनुभव आले की अस्वस्थता येते.
या सन्माननीय पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे
पो. कॉ. शरद (भाई ) अहिरे
श्रीरामपूर पोलीस स्टेशन गुन्हे शाखा.
डॉ. राजेंद्र धामणे
CMOMaharashtra
SP Ahilyanagar