18/07/2025
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने भारतीय साहित्यात क्रांती घडवली. त्यांनी लिहिलेलं साहित्य केवळ कला, अभिव्यक्ती नव्हती. ते एक आंदोलन होतं, बंड होतं! अण्णा भाऊंनी सुमारे ३५ हून अधिक कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, शेकडो लेख, पोवाडे, लोकनाट्यं आणि शाहिरी गीतं लिहिली.
अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या माणसाची कहाणी त्यांनी काल्पनिकतेच्या साहाय्याने नव्हे, तर वास्तवाच्या जळत्या भट्टीतून साकारली. त्यांनी लोककलेतून परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांचं साहित्य सामाजिक वास्तवाचं आरसपानी दर्शन घडवतं. झोपडपट्टीतील वेदना, अन्याय, भूक, बेरोजगारी, आणि सामाजिक विषमता यांचं त्यांनी प्रखर आणि थेट भाष्य केलं. अशा या साहित्य सम्राटाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#अण्णा_भाऊ_साठे