19/06/2023
महाकवी कालिदास दिनानिमित्त 💐... अजरामर काव्य मेघदूतातील दोन श्लोक :
कामातील चुकीमुळे शाप मिळालेला यक्ष. जो आपल्या प्रेयसीपासून बरेच अंतर लांब आहे असा विरहव्याकूळ यक्ष. आपल्या कांतेच्या आठवणीने हतबल झालेला यक्ष हा कविकुलगुरू कालिदासाच्या मेघदूताचा केंद्रबिंदू.
त्याच्या अवस्थेचे हुबेहुब वर्णन कालिदास करत आहे. या मेघदूतात मानशास्त्रीय वर्णन, भौगोलिक मेघाचे शास्त्रीय वर्णन, रामटेक ते अलकानगरी याचा भौगोलिक आणि रंजक प्रवास मांडणारा कालिदास आणि हळव्या - कोमल भावना सहज आपल्या नवरसात गुंफणारा आणि "उपमा कलिदासस्य" उपमेचा हातखंडा असलेला कालिदास. एकाच कवीची किती वैविध्यपूर्ण रूपे या एकाच अजरामर काव्यात पहायला मिळतात.
अशा त्यांच्या ॠतुसंहार,रघुवंश कुमारसंभव ही महाकाव्य तर विक्रमोर्वशीय, शाकुन्तल, मालविकाग्निमित्र ही काव्यत्वाच्या उंच शिखरावर पोहोचलेली नाटके ह्या कालिदासांच्या सात "न भुतो न भविष्यति" वाटणाऱ्या कलाकृती. या सर्वांनी कलिदासाला "कविकुलगुरू" हे बिरुद चपखल बसते!! 🙏🏻
सौ.प्राची सम्राट पेठे......
कलिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🏻🙏🏻
नमो कलिदासाय !!!
आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वतावर थोडासा रेंगाळणारा मेघ जणू टेकडीला तिरक्या ढुशा देण्यात रंगून गेलेल्या हत्तीप्रमाणे भासतो आहे.
विरहव्याकूळ झालेला असल्याने तो मेघ धूर-तेज- पाणी - वायु याने बनलेला असूनही म्हणजे मेघाचे वास्तविक रूप माहित असूनही त्याला हाडामासाच्या चेतन माणसाप्रमाणे समजून त्याच्यापुढे अगतिक होऊन आपल्या प्रियेला संदेश पोहचव अशी विनवणी करत आहे.
कालिदासाने अशा प्रेमात पडलेल्या हतबल व विरहव्याकूळ जनांचे चित्र हुबेहुब रंगवले आहे. आणि अशा सत्य आणि भ्रम यात कशी ते गफलत करतात याचे मानशास्त्रीय वर्णनही खूप सुंदर वर्णिलेले आहे.