
12/04/2025
अभिनेता प्रसाद ओक यांनी सचिन मोटे, सचिन गोस्वामी या लेखक-दिग्दर्शक जोडीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली .
गुलकंद सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने या लेखक - दिग्दर्शक द्वयीबद्दल आपले मत व्यक्त केले . गुलकंद सिनेमा करण्यामागे एकच कारण पुरेसं होतं, ते म्हणजे सचिन मोटे, सचिन गोस्वामी ही माणसं. "कधी कधी काही प्रोजेक्ट्सचा विचार करायचा नसतो. जेव्हा सचिन मोटे - सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात, तेव्हा फक्त होच म्हणायचं असतं. गेली सात वर्ष माझं घर ज्या दोन माणसांमुळे चाललंय किंवा ज्या दोन वर्षात अवघं जग थांबलं होतं, तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं, त्यांना मी काहीतरी देणं लागतो, आणि तो हा चित्रपट आहे."
गुलकंद महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ ला प्रदर्शित होतोय.