15/09/2024
"इमर्जन्सी अलर्ट आलं की कोकणी मालवणी माणस कशी कामाला येतात त्याच प्रात्यशिकच काल झाले,"
काल आमचे एक ग्राहक स्मिता ताई गायकवाड मडगांव वरून कोकण कन्या एक्सप्रेस ने मुंबई ला येणार होते आणि त्याच्या बरोबर लहान मुले आणि 4-5 माणसे होती प्रवास दरम्यान लहान मुले असल्यामुळे त्यांना काही तरी घरगुती जेवण पाहिजे होते तर त्यांनी मला काॅल करून सांगितले, दादा आम्हाला सावंतवाडी ते कणकवली दरम्यान ट्रेनमध्ये काही तरी घरगुती जेवण पाहिजे तर आम्हाला कोणी प्लॅटफाॅर्मला देईल का. मी म्हणालो 20 मि थांबा मी काही तरी करतो.
मी लगेच दिव्याताई ना काॅल केला त्यांनी त्यांच्या बहिणीला काॅल करून सांगितले, तर ताई लगेच तयार झाल्या. ताई कणवलीला राहतात आणि त्यांचे कणवलीला हाॅटेल सुध्दा आहे.
स्मिता ताईनी ताईना काॅल करून खालील ऑर्डर केली.
2 प्लेट आंबोळी चटणी
4 प्लेट घावणे चटणी
4 प्लेट भाकरी
4 प्लेट सुका बारीक गोलमा भाजी
वडे 2 प्लेट
1 प्लेट हिरवा वाटाणा उसळ
3 ग्लास सोलकडी
खोबरेची काप चार पाकीट
ताईनी ऑर्डर रेडी करून संध्याकाळी कणवलीला प्लॅटफाॅर्मला जाऊन बसल्या, ट्रेन येताच ताईनी S1 कोचच्या येथे दिले, स्मिता ताईनी सर्व टेस्ट करून मला फोन करून सांगितले, जेवण खूप छान होते पुढच्या वेळी पण आम्हाला जेवण लागले तर आम्ही यांच्याकडूनच मागवणार. तरी कणकवली मधील सांची कुडाळकर ताई आपण जर कोकणातून मुंबईत प्रवास करताय आणि आपण कणकवली रेल्वे स्टेशन मधे आहात आणि आपल्यास गाडीत घरी बनवलेले पदार्थ खायची ईच्छा असेल तर ह्या ताई जर आपण त्यांना पहिले सांगून ऑर्डर दिली तर ह्या ताई जेव्हा तुमची ट्रेन कणकवली मधे येईल तेव्हा त्या स्टेशन ला येऊन तुमची ऑर्डर डिलिवरी करणार
मेन्यू 👇👇
आंबोळी चटणी,आंबोळी उसळ,आंबोळी चिकन,घावणे चटणी,घावणे उसळ,घावणे चिकन,कांदा भजी,
चिकन भजी,चिकन वडापाव,चिकन उलटा वडापाव,
गावठी गाईचे तूप आणि जर कोणाला प्रवासा दरम्यान कणकवली स्टेशन ला जेवण पाहिजे असल्यास अवश्य ताईना कॉल करा.
मो नं 9823889612
पत्ता - सांची किशोर कुडाळकर
Via - kanchan palkar