24/04/2025
रानोमाळ भटकंती करणाऱ्या कुटुंबातील IPS बिरदेव डोणे !
UPSC चा निकाल लागला, IPS झालेला कोल्हापूरचा बिरदेव मात्र मेंढ्या घेऊन कर्नाटकला गेला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार. पोटासाठी रानोमाळ भटकंती करणा-या मेंढपाळाचा मुलगा IPS झाला आहे. निकाल लागला तेव्हा तो मेंढ्या चारत होता. जिद्द , चिकटी आणि मेहनतीच्या जिवावर मोठी गरूड झेप घेता येते हे बिरुदेव यांनी दाखवून दिलं आहे.