Siddhi Chavan

Siddhi Chavan खाणं, जगणं आणि वाचणं!

कल्पना करा, तरुणांना फसवून पैसे छापणे किती सोपे आहे.हा आहे  #अभिजीत_दीपके, ज्याला  #झुरळ_जनता_पार्टीच्या बेरोजगार तरुणां...
09/06/2026

कल्पना करा, तरुणांना फसवून पैसे छापणे किती सोपे आहे.

हा आहे #अभिजीत_दीपके, ज्याला #झुरळ_जनता_पार्टीच्या बेरोजगार तरुणांचा नेता म्हटले जाते!

गेल्या २५ दिवसांत, त्याने इंस्टाग्रामवर २.२ कोटी आणि एक्स (X) वर २ लाख नवीन फॉलोअर्स जोडले आहेत.

बेरोजगार तरुणांनी त्याला तारणहार मानून मोठ्या संख्येने त्याला फॉलो करण्यास सुरुवात केली.

आणि तरुण हे विसरले की या डिजिटल जगात हा एक सापळा आहे, जिथे लोकांच्या भावनांशी खेळून डॉलर्स छापले जातात.

आज, त्याला केवळ १४ दिवसांत एक्स (X) कडून $११,२३९ (सुमारे ११ लाख रुपये) मिळाले.

या व्यतिरिक्त, त्याला इंस्टाग्रामवरून सुमारे १२ ते १५ लाख रुपये मिळाले असतील.

जे त्याला फॉलो करतात त्यांना २९९ रुपयांचा रिचार्जसुद्धा मिळणार नाही.

आणि जेव्हा तो घरी बसून केवळ १४ दिवसांत इतके डॉलर्स कमवू शकतो, तेव्हा त्यांना काम करण्याची गरजच काय? एक गोष्ट समजून घ्या. त्याला त्याच्या गुरूकडून जे काही मिळाले असेल ते वेगळे आहे.

"मी इतका का थकतो?"आणि आतून एक शांत उत्तर आलं —"कारण तू सगळं एकट्याने उचलायचा प्रयत्न करतोयस."स्वामी शिकवतात —आपण फक्त आप...
30/03/2026

"मी इतका का थकतो?"

आणि आतून एक शांत उत्तर आलं —
"कारण तू सगळं एकट्याने उचलायचा प्रयत्न करतोयस."

स्वामी शिकवतात —
आपण फक्त आपलं कर्म करायचं…
बाकीचं ओझं त्यांच्यावर सोडायचं.

जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते,
आणि तसं असणं गरजेचंही नाही.

कधी कधी थांबणं, शांत बसणं,
आणि मनाने म्हणणं —
"स्वामी, आता तुम्ही सांभाळा…"
हेच खरं समाधान देतं.

आज स्वतःला थोडं हलकं करा…
सगळं स्वतःवर घेऊ नका.

स्वामी आहेतच —
तुमच्यासाठी, तुमच्यासोबत. 🙏✨

॥ श्री स्वामी समर्थ॥

02/03/2026

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा! (मिडल क्लासची 'भिकार' लक्षणं)

आजकालच्या पोरांना एक नवीन रोग जडलाय. खिशात गाडीत पेट्रोल टाकायला १०० रुपये नसतात, पण हातात १ लाखाचा 'आयफोन' घेऊन आरशासमोर सेल्फी काढायची हौस मात्र जबरदस्त असते.

मित्रांनो, ही श्रीमंती नाही, ही 'भिकार' लक्षणं आहेत.

ज्या बापाचा शर्ट फाटलाय आणि आईच्या साडीला दोन ठिगळ आहेत, त्यांच्या कष्टाचे पैसे किवा स्वतःच्या पगाराचा अर्धा हिस्सा 'ईएमआय' भरण्यात घालवणं, याला 'स्टेटस' नाही, याला 'निर्लज्जपणा' म्हणतात. तुम्ही घेतलेला तो १ लाखाचा फोन पुढच्या वर्षी २० हजाराला सुद्धा कोणी घेणार नाही. पण तेच पैसे जर सोन्यात किवा एखाद्या चांगल्या स्कीममध्ये 'इन्व्हेस्ट' केले असते, तर ५ वर्षांनी त्याची किमत दुप्पट झाली असती.

स्टारबक्समध्ये ३०० रुपयांची कॉफी पिऊन स्टोरी टाकण्यापेक्षा, टपरीवर १० रुपयाचा चहा पिऊन उरलेले २९० रुपये वाचवणारा माणूस खरा 'स्मार्ट' असतो.

लक्षात ठेवा, 'ईएमआय' वर केलेली हवा आणि फिल्टर लावून आलेलं रूप, हे दोन्ही पण पहिल्याच संकटाच्या पावसात धुवून निघतं. ज्याची स्वतःची कमाई आणि वडिलांची इज्जत शाबूत आहे, तोच खरा ब्रँड ! बाकी सगळे चायनीज आयटम आहेत."

लोकांना तुमची आयफोन 'रिगटोन' ऐकायची नसते, त्यांना तुमची 'यशाची कहाणी' ऐकायची असते. त्यामुळे गॅझेट्स अपग्रेड करण्यापेक्षा स्वतःची 'औकात' अपग्रेड करा

हा लेख वाचून तुम्हाला राग येईल पण हे सत्य आहे या वर एकदा नक्की विचार करा कुणाचा मन दुखावण्याचा हेतू नाही माझा 🙏
अज्ञात ✍️

होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🙏
02/03/2026

होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🙏

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi Chavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share