21/11/2023
अप्रतिम लेख by Kalpesh Sudhakar
लंडनला स्पर्धा असल्या की फायनलची मॅच ही नेहमी लॉर्ड्सलाच असते. ऑस्ट्रेलिया स्पर्धा भरवते तेंव्हा फायनल MCG लाच असते.
हे देश आपलं वैभव, इतिहास आणि वारसा सांभाळत असतांना अचानक आपण हे स्टेडियम का निवडलं फायनल साठी?
आपल्याकडे वानखेडे, इडन गार्डन, या दोन्ही स्टेडियम कडे प्रचंड मोठा इतिहास आहे परंपरा आहे. इथले खेळपट्टी तज्ज्ञ अनुभवी आहेत. मोठे सामने असतांना घ्यायची काळजी याबद्दल त्यांना जाण आहे. ग्राउंड वर गवत किती असावं इथपासून ते ऋतू कुठला आहे आणि संध्याकाळ नंतर हवामानातले बदल कसे असतात याचाही त्यांचा अभ्यास असतो.
अहमदाबादला यापूर्वी अश्या कितीश्या आंतरराष्ट्रीय मॅचेस व्हायच्या? आपल्याकडे BCCI चं असं काहीच धोरण नाही का? की फक्त एका माणसाच्या इच्छेखातीर संपूर्ण देशाची पत पणाला लावायची? आंतरराष्ट्रीय स्तरावर माती खायची ही काही आताची पहिली वेळ नाही, आत्ताच एका स्पर्धेत भारतीय खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही असा निर्णय घेतला गेला.
ऑस्ट्रेलियन स्किपर रिकी पॉंटिंग ज्याच्या नेतृत्वात त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेत तो तिकडे ऑस्ट्रेलीयन ड्रेसिंग रूम मध्ये आत्ताच्या टीमला प्रोत्साहन देत होता, मॉरल बूस्ट करत करत होता.
आपल्याकडे पहिला वर्ल्डकप जिंकलेला कॅप्टन कपिल देव कुठे होता? दोन वर्ल्ड कप जिंकलेला, डोक्यावर बर्फ ठेऊन वर्ल्ड कप फायनलला षटकार ठोकणारा कॅप्टन कूल कुठे होता?
प्रेशर मॅच मध्ये अश्या लोकांचा सहवास देखील स्फूर्तीदायी असतो. त्यांनी हे आव्हान पूर्वी यशस्वीरित्या पेलून दाखवलेलं असतं. त्यांचा अनुभव प्रचंड मार्गदर्शक ठरतो.
भारतात फायनल होतेय आणि या दोन माजी कॅप्टन्स ला आमंत्रण नाही आणि आमंत्रित मध्ये आहेत कोण?
तर बॉलीवूड तारे आणि जग्गी वासुदेव सारखी लोकं! काय योगदान आहे यांचं! खेळाडू राहिले बाजूला बाकीच्या वऱ्हाडालाच गाढवाची पूजा करायची इतकी घाई झालेली की कित्येकांचे लिहून झालेले लेख डिलीट मारावे लागले असतील. जर जिंकलोच असतो ही फायनल तर नंतरच्या उन्मादाची कल्पना करा फक्त.
सोशल मीडिया, एलक्ट्रॉनिक मिडीया चोवीस तास एकच जयजयकार करत राहिला असता. एक मास हिस्टेरिया निर्माण झाला असता आणि सगळ्यात भयंकर नुकसान झालं असतं ते असला चुकीचा पायंडा पडला असता त्याचा. आपली लीगसी नं जपणे, माजी दिग्गज खेळाडूंचा उपमर्द करणे, चुकीच्या खेळपट्या निवडणे, चुकीचे निर्णय घेणे या सगळ्या गोष्टी त्या उन्मादामध्ये झाकल्या गेल्या असत्या. त्यामुळे असं ही वाटतं की जो भी हुआ, ठिक ही है ।