Khamkya India खमक्या इंडिया

Khamkya India खमक्या इंडिया We are Leading Media company in India who update viewers about current updates, breaking & happening

पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळाराज्यातील डिजिटल...
04/11/2025

पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा

राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने राजा माने यांनी पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा!

कोल्हापूर, दि. ४:- आक्रमक पत्रकारितेला विकासाची जोड देत मराठी पत्रकारितेत वैभवशाली इतिहास घडविणाऱ्या "पुढारीकर" पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांचा उद्या कोल्हापुरात दि. ५ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होत आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पुढारी कार्यालयात पद्मश्री डॉ. जाधव यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत तेजस राऊत, उद्योजक उन्मेश साठे हेही उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या समवेत गप्पाही झाल्या.राजा माने यांनी पुढारीच्या पुणे आणि अहिल्यांनगर (अहमदनगर)आवृत्यांचे कार्यकारी संपादकपद सांभाळले होते. तसेच त्यांच्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतले.." या पुस्तकातही राज्यातील एक महनीय व्यक्तिमत्व म्हणून समावेश होता. यामुळे पुढारी परिवाराशी राजा माने यांचे विशेष ऋणानुबंध आहेत. सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असलेल्या पुढारी मध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेशदादा जाधव यांचीही राजा माने यांनी सदिच्छा भेट घेतली.

*निर्मळ मन, स्वच्छ हृदय...**अँजिओग्राफीचा रिपोर्ट!* *धन्यवाद डॉ. संजय अंधारे व डॉ. विकास खामकर.**पुढील किमान दहा वर्षांस...
04/11/2025

*निर्मळ मन, स्वच्छ हृदय...*
*अँजिओग्राफीचा रिपोर्ट!*

*धन्यवाद डॉ. संजय अंधारे व डॉ. विकास खामकर.*

*पुढील किमान दहा वर्षांसाठी सक्षम कार्यासाठी सिद्ध!*
सप्रेम नमस्कार,
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हाती घेतलेल्या कामात आपण पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्याएवढे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलो पाहिजे, ही प्रत्येकाची धडपड असते. माझे वडिल स्वर्गीय बापू,आई स्वर्गीय अक्का व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला त्या धडपडीत सदैव यश मिळत आले आहे.मागील आठवड्यात मला धाप लागणे,अस्वस्थ होणे अशा स्वरूपाचा थोडा त्रास जाणवला म्हणून मी आमच्या बार्शीच्या सुश्रुत हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संजय अंधारे यांच्याशी संपर्क साधला. चर्चेअंती बार्शीला जावून त्यांच्या देखरेखीखाली सर्व तपासण्या करण्याचा निर्णय झाला.माझे जावई तेजस राऊत,मावस भाऊ अमित इंगोले,मावस बहीण माधुरीचे पती दिनू घोलप, मुरलीधर चव्हाण, सूर्यकांतदादा वायकर, सोमेश्वर घाणेगावकर, संतोष ठोंबरे काका, रोहन नलावडे,अभय चव्हाण यांनी नियोजन केले.सर्व तपासण्या झाल्या आणि डॉ.संजय अंधारे व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विकास खामकर यांनी अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. भावनिकदृष्ट्या आपले मन कितीही निर्मळ असले तरी वैद्यकीयदृष्ट्या मन..दिल...हृदय मजबूत आणि स्वच्छ ठेवणे आपल्या हाती नसते. त्यामुळे धाक-धुक वाढली.. डॉ. विकास खामकर यांनी अँजिओग्राफी केली आणि माझे हृदय वैद्यकीयदृष्ट्या शंभर टक्के स्वच्छ आणि सक्षम असल्याचे सिद्ध झाले. धन्यवाद डॉ. संजय अंधारे, डॉ. विकास खामकर आणि सुश्रुत हॉस्पिटलची टीम!..या आनंदात माझी पत्नी सौ.मंदा, कन्या शिल्पा तेजस राऊत, नात सारा, नातू अर्जून व मेहुणे दिनेश घोलप सहभागी झाले.
*-राजा माने.*

ईश्वरपूर (इस्लामपूर) च्या अशोक पाटील यांची सद्भावना भेट.
सांगली जिल्ह्यातील डॅशिंग पत्रकार, लोकमतच्या वाळवा - शिराळा कार्यालयाचे प्रमुख अशोक पाटील यांच्याशी माझा गेल्या २७वर्षाचा दोस्तांना आहे. प्रत्येकाच्या सुख -दुःखाला धावून जाणारा हा फाटक्या तोंडाचा हा दिलदार माणूस! माझ्या अँजिओग्राफी टेस्ट बद्दल समजताच बार्शीकडे धावला.बार्शीत येवून मला कडकडून मिठी मारायची एवढाच उद्देश! लोकमतच्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकण आवृत्त्यांचा मी संपादक असताना अशोक पाटलांच्या साथीने आम्ही अनेक विक्रम नोंदविले , काम एन्जॉय केले. अशोक पाटलांच्या मिठीत त्या आठवणी दडल्या होत्या. असो. बार्शीत माझ्या भेटी नंतर लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी शहाजी फुरडे, माझे मावस भाऊ आर्किटेक्ट व अभियंता अमित इंगोले यांनी पाटील व त्यांच्या सोबत असलेले पैलवान मानसिंह यांचा मुरलीधर चव्हाण परिवार आणि सौरभ यांच्या मिसळ कट्ट्यावर बाजार आमटी व बाजरी भाकरीच्या मेजवानीने पाहुणचार केला. यावेळी मुंबईस्थित आमचे बार्शीकर एबीपी माझाचे मयूर गलांडे, धनंजयराव मुंडे यांचे जनसंपर्क प्रमुख सौरभ खराडे व दिनेश मेटकरी हे पत्रकार मित्र आवर्जून उपस्थित होते.
भूतान टूर "K5 Group सर्व सदस्य मित्रांनी देखील त्याच दिवशी माझी भेट घेऊन रंगतदार गप्पांची मैफील भरविली!

30/10/2025

Arjun 's birthday celebration at Solapur.

आमचा नातू अर्जूनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा -आशीर्वाद!
30/10/2025

आमचा नातू अर्जूनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा -आशीर्वाद!

18/10/2025

*डॉ.रविंद्र चिंचोलकर यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती अमेझॉनवर*

३० नोव्हेंबरला सोलापुरात प्रकाशन सोहळा.*
---------------------------------------------
*दीपावलीच्या कोटी कोटी शुभेच्छा!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*-राजा माने,*
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
-संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.
-संस्थापक संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी.

08/10/2025
*डॉ. तारा भवाळकर यांची मंत्रमुग्ध करणारी वाणी अन् डॉ. सुनिलकुमार  लवटे सरांनी "मधुशाला"त लिलया गुंफलेला त्यांचा जीवनपट.....
08/10/2025

*डॉ. तारा भवाळकर यांची मंत्रमुग्ध करणारी वाणी अन् डॉ. सुनिलकुमार लवटे सरांनी "मधुशाला"त लिलया गुंफलेला त्यांचा जीवनपट..*

*सांगलीकरांची ताराबाईच्या सन्मानार्थ दिला साहित्य - मैफीलतृप्तीचा आनंद!*
- राजा माने

राष्ट्रीय पातळीवर एखाद्या क्षेत्रात अतुल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व हे त्या गावाचे केवळ भूषण नसते तर ती त्या गावाची संपत्ती असते.सांगली जिल्हा तर अशा व्यक्तिमत्त्वाच्या हिऱ्यांची खाणच !त्याच संपत्तीच्या वैभवाची अनुभूती मागील आठवड्यात आली.साधी राहणी,प्रत्येक शब्दात आपलेपणा ओसंडून वाहत ठेवणारी निर्मळ वक्तृत्वशैली आणि आपल्या थेट विचारांनी अखिल भारतीय शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ऐतिहासिक बनवून दिल्ली गाजविणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांचा नागरी सत्कार आयोजिला होता.योगायोगाने माझे मित्र प्रा.पद्माकर जगदाळे, त्यांच्या पत्नी व लेखिका प्रतिभा जगदाळे आणि सोहळ्याच्या यजमानांपैकी एक माझे मित्र कवी महेश कराडकर यांच्या मुळे या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला व माझी पत्नी सौ. मंदाला मिळाली.या नेटक्या आणि अप्रतिम सोहळ्याची उंची प्रत्येक वक्त्याने उंचावत ठेवली.माझे मित्र प्रा. अविनाश सप्रे असो,संयोजक चौगुले असो,की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी अशोक काकडे असोत प्रत्येकाने उत्तम भाषण केले.७ जून १९६७ रोजी सांगलीत पहिले पाऊल राजवाड्यात कसे पडले इथं पासून जीवनात आलेल्या प्रत्येक वळणावर काय घडले, हे ताराबाईंनी मनमोकळेपणाने त्यांच्या शैलीत सांगितला.त्यांच्याच "नाबाद ८७"या कार्यक्रमात त्यांच्या मिश्कीलपणाची साक्ष मिळत होती.तंजावर संस्थानशी असलेल्या त्यांच्या आठवणींना उजळा देताना दक्षिण भारतात मराठी भाषा संस्थानने मराठी भाषा कशी जतन केली याचे "उदंड" किस्से त्यांनी सांगितले.या बहारदार मैफिलीच्या कोंदणात हिरा बसविण्याची कामगिरी साहित्यिक,विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केली.राणी ताराराणी आणि ताराबाईंच्या पराक्रमाची तुलना केली.त्याहून महत्त्वाचे म्हणजे ताराबाईच्या साहित्य सेवा प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या "मधुशाला" या काव्य संग्रहाचा ताराबाईंनी केलेला अनुवाद या बद्दल बोलताना "१९३५ नंतर उत्तर भारताला हरिवंशराय यांच्या"मधुशाला " प्रेम करायला शिकविले", हे भाष्य उपस्थिताना विशेष भावले. ताराबाईची साहित्या सेवा आणि "मधुशाला" चे जीवन तत्त्वज्ञान यांची अप्रतिम मांडणी त्यांनी केली.

"मधुशाला " प्रत्यक्ष मद्य किंवा दारूच्या ठिकाणाविषयी नाही, तर ती जीवन, तत्त्वज्ञान, आणि मानवी अनुभूतीचे प्रतीकात्मक चित्रण करते.

“मदिरा” म्हणजे जीवनाचे आनंद, प्रेरणा, आत्मिक अनुभूती.

“साकी” म्हणजे गुरु, प्रेमिका किंवा देव, जो जीवनाचे सौंदर्य दाखवतो.

“प्याला” म्हणजे हृदय किंवा मन, जे अनुभव घेते.

आणि “मधुशाला” म्हणजे हे संपूर्ण जग — जीवनाची रंगलेली मैफील!.
*“मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला*
*प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,*
*प्रथम तुम्हें अर्पित है मैंने मदिरालय का प्याला,*
*फिर सबको मदहोश कर दे ऐसी मेरी मधुशाला॥*
आदरणीय डॉ. ताराबाईं भवाळकर यांना कोटी कोटी शुभेच्छा. त्यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, ही प्रार्थना!
*राजा माने,*
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.
अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.

05/10/2025

शिर्डी - मुंबई समृद्धी मार्गाने आजचा प्रवास...

04/10/2025
04/10/2025

श्री. साई दरबारात दाखल... सौ.मंदासह उद्या सकाळी दर्शन!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khamkya India खमक्या इंडिया posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khamkya India खमक्या इंडिया:

Share