Aawaj Majha

Aawaj Majha आवाज माझा news
महाराष्ट्राचा खरा आवाज

19/02/2025

https://youtu.be/MeriuprwyQU?si=AxsFVRZMRPx56gJF 💐 *शिवरायांची आरती..." 💐 आठवावे "रूप" आठवावा "प्रताप"
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत "श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांची आज ३९५ वी शिव जयंती 🙏🏼💐🚩
|| श्री श्री श्री छत्रपती यांना मानाचा मुजरा ||
🙏🏼💐🚩👨‍👩‍👦‍👦 || जगदंब || 🏡🚩💐🙏🏼

18/02/2025

छत्रपती शिवाजीराजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

Sambhaji nagar
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt I
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

⛳विनंती: पुढे पाठवा
शिवगर्जना

18/02/2025
परम पूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज वेल्हाळ यांच्या शुभ आशीर्वादानं... रसिका थिएटर्स निर्मित, अर्चना थिएटर्स प्रकाशित, प्र...
18/02/2025

परम पूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज वेल्हाळ यांच्या शुभ आशीर्वादानं... रसिका थिएटर्स निर्मित, अर्चना थिएटर्स प्रकाशित, प्रियंका दत्तात्रय सादर करत आहे *बा* अर्थात *रयतेचा राजा शिवबा*
महाराष्ट्राची ख्याती जगभर पसरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये सांगणारा संगीत-नृत्य-नाट्यात्मक उत्सव अर्थातच
*रयतेचा राजा शिवबा*
शिवाजी महाराजांचा इतिहास जर कोळून प्याल तर जगावर राज्य कराल हे केवळ एक वाक्य नाही शाश्वत सत्य आहे. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्नं अंकुरायला लागलं त्या राजमाता जिजाऊ, ज्यां महापुरुषाच्या संकल्पनेतून मातीशी घट्ट नाळ जोडून स्वप्नं वाढू लागलं ते राजे शहाजी राजे, ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्नं सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती अणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्नं आपल्या खांद्यावर पेललं ते राजे शंभू छत्रपती या महापुरुषांना आम्हा कलाकारांकडून वंदन.
तरुण पिढी आज नशेच्या आहारी का जातेय, वाईट संगतीत बरबाद का होतेय, निर्णय का चुकतात
त्यांना दिशा दाखवणारा शिवबा का जन्मास येत नाही, ह्या अशा अनेक प्रश्नांचा मागोवा म्हणजेच *रयतेचा राजा शिवबा*

17/02/2025

https://youtu.be/rMTXXLz9l4k?si=T2ts00SSZ6jmRGku * जय महाराष्ट्र , जय शिवराय , जय शंभूराजे... जय जिजाऊ...! श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीची भव्य निर्मिती*

*‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर*

महाराष्ट्राचा गौरवशाली 'शिवइतिहास' घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने ! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी! ‘स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या *रणरागिणी ताराराणी* यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती *शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट)* यांच्या सहयोगाने *सरस्वती एज्युकेशन सोसायटीने* पुढाकार घेतला आहे.
युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित *रणरागिणी ताराराणी* या नाटकाचा शुभारंभ येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे होणार आहे. चंद्रकांत सावंत हे या नाटकाचे मार्गदर्शक तर ब्रिगेडियर सुधीर सावंत हे *रणरागिणी ताराराणी* नाट्यनिर्मितीचे संकल्पक आहेत.

“ताराराणींचा इतिहास हा जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला देदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा; या उद्देशाने आम्ही या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे," असे सरस्वती एज्युकेशन सोसायटी व श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या *रणरागिणी ताराराणी* या नाटकात ५० कलाकारांची फ़ौज असणार आहे.

https://youtu.be/iTKin6lpmvI?si=TZM7nMRdPtEct5N9

“नाटकात काम करायचं, या डेडिकेशनने नाटकातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. रंगमंचावर या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळा देखणा प्रयोग पहायला मिळणार आहे. जो रसिकांना वेगळा आनंद देईल," असा विश्वास दिग्दर्शक विजय राणे यांनी व्यक्त केला.

“ऐतिहासिक संदर्भ घेत हा प्रेरणादायी लढा रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल," असा विश्वास लेखक युवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

तनीषा वर्दे (ताराराणी), कृष्णा राजशेखर (येसूबाई), सिद्धी घैसास (जानकी), चेतन म्हस्के (शंभूराजे), अरुण पंदरकर (राजाराम), उमेश ठाकूर (संताजी/रामाजी/ मिरखान), ऋषिकेश जोशी (धनाजी), सुनील गोडसे (औरंगजेब), मोहिका गद्रे (चेन्नमा/झीनत), मुकुल देशमुख (जुल्फीकार) आदि कलाकारांच्या *रणरागिणी ताराराणी* या नाटकात भूमिका आहेत. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटी निर्मित,अद्वैत थिएटर्स प्रकाशित *रणरागिणी ताराराणी* नाटकाचे व्यवस्थापन हरी पाटणकर सांभाळत आहेत.

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) मुंबई ही संस्था गेली ८२ वर्ष शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य अशा विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या शिवजयंतीला *रणरागिणी ताराराणी* या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग दिनांक : १९ फेब्रुवारी २०२५ ला, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, येथे दुपारी ३.३० वा. रंगणार आहे. मराठी माणसाच्या मराठी वाहिनीला मोठे करा , मराठी माणसाला मोठे करा...! आवाज माझा news
महाराष्ट्राचा खरा आवाज
जाहिरतीसाठी व बातम्यांसाठी संपर्क :- 9224703181 - 9029319191.

👉 सब्रस्क्राय करा , 👉 कमेंट करा , 👉 लाईक करा , 👉 घंटी वाजवा ...👍

https://youtu.be/xHcRCOYDlDo?si=P9E6APoTVG69eoJp        रंगभूमीवर येतंय 'मि. 420' नाटक...  धमाल, विनोदी असे 'मि. 420' हे...
12/02/2025

https://youtu.be/xHcRCOYDlDo?si=P9E6APoTVG69eoJp रंगभूमीवर येतंय 'मि. 420' नाटक...

धमाल, विनोदी असे 'मि. 420' हे नवीन मराठी नाटक आता रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिरात होणार आहे.
'मि. 420' या नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. प्रदीप वेलोंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.
डॉ. संदीप वंजारी, भूषण घाडी, प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत, अक्षय पाटील, दक्षता जोईल हे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.
महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना व दत्ता भाटकर यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे.
या नाटकाची निर्मिती
'श्री दत्त विजय प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेने केली आहे.
डॉ. संदीप वंजारी व संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. आवाज माझा news , महाराष्ट्राचा खरा आवाज मराठी माणसाच्या चॅनल मोठे करा...!👍 बातम्या व जाहिरतीसाठी संपर्क :- 9224703181 / 9029319191. 👉 सब्रस्क्राय करा , 👉 कमेंट करा , 👉 लाईक करा , 👉 घंटी वाजवा ...👍

09/02/2025

https://youtu.be/Ar0AlZwBFtw?si=6G3ods6OMNa_plCZ हिंदू धर्म रक्षक श्रीमान भागोजी शेठ कीर
भागोजीशेठ कीर स्मृती समिती
सप्रेम नमस्कार
भागोजीशेठ कीर स्मृती समिती आयोजित हिंदू धर्म रक्षक श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळ्या निमित्त महाशिवरात्री दिनी भव्य शोभायात्रा आणि अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याला आपण सहकुटुंब, मित्र-परिवारासह उपस्थित राहून या संस्मरणीय सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी
सायंकाळी ५ वाजता
शोभायात्रा : बेंगाॅल केमिकल नाका, सेंच्युरी बाजार ते भागोजी शेठ कीर स्मृती स्थळ, दादर चौपाटी
प्रमुख पाहुणे -
मा. ना. श्रीपाद नाईक ( केंद्रीय उर्जा राज्यमंत्री)
विशेष अतिथी -
मा. ना. दीपक केसरकर ( माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र)
मा. श्री. अविनाश महाराज ( काडसिध्देश्वर करवीरपीठ)
मा. श्री. महेश सावंत (आमदार, माहिम विधानसभा)
मा. श्री. कालिदास कोळंबकर (आमदार, वडाळा विधानसभा)
मा. डाॅ. प्रा. प्रदिप ढवळ
(कार्याध्यक्ष : कोकण मराठी साहित्य परिषद)
मा. श्री. अंकुर कीर (वंशज, भागोजी कीर)
मा. श्री. विवेक कीर (वंशज, भागोजी कीर)
निमंत्रक : डाॅ. जयप्रकाश पेडणेकर
श्री. नविनचंद्र बांदिवडेकर (प्रमुख मार्गदर्शक)
श्री. विनोद चव्हाण (प्रमुख सल्लागार)
श्री. जगदिश आडविरकर (समन्वयक)
श्रीमती रिटा मिठबावकर (विश्वस्त, अभाभंस महासंघ)
श्री. किशोर केळुसकर (स्वागताध्यक्ष)
(इतर नावे समाविष्ट करणे)

https://youtu.be/MkWdUWeJU-M?si=cIkIgoUxg6RpM5kO                          *१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत...
09/02/2025

https://youtu.be/MkWdUWeJU-M?si=cIkIgoUxg6RpM5kO *१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन*

*भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी*

नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे , कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आदि मंडळी उपस्थित होती.

२० फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत मुंबईत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी या महोत्सवातील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

या महोत्सवा मागचा उद्देश सांगताना नाटयपरिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे म्हणाले की, या महोत्सवामुळे मुंबईतील कलाकारांना आणि नाट्यरसिकांना वेगवेगळ्या राज्यातील, प्रांतातील नाटकं, त्यांचं सादरीकरण, तिथल्या कलाकारांविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहे. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे.

या नाट्य महोत्सवाचे वेळापत्रक खाली जोडले आहे. आवाज माझा news महाराष्ट्राचा खरा आवाज - 9029319191 - 9224703181. मराठी माणसाच्या चॅनल ला मोठे करा...!👍 👉 सब्रस्काय करा 👉 लाईक करा 👉 कमेंट करा 👉 बेल वाजवा

Address

Mumbai
400016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aawaj Majha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aawaj Majha:

Share

Nearby media companies


Other Mumbai media companies

Show All