29/08/2023
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर रायगड पोलीसांकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या सर्च ऑपरेशन दरम्यान श्रीवर्धन व दिघी या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची पाकीटे आढळून आली. सदर घटनेबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात NDPS ACT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर व अंमली पदार्थांच्या पाकीटांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रायगड श्री सोमनाथ घार्गे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारची पाकीटे वा वस्तू आढळून आल्यास ती नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करावीत वा या बाबत पोलीसांशी संपर्क साधावा.
अंमली पदार्थ जवळ बाळगणे, दुसर्यास देणे वा विकणे हा NDPS ACT अंतर्गत गंभीर गुन्हा असल्यामुळे अशी अंमली पदार्थांची पाकीटे नागरिकांनी जवळ बाळगू नयेत.
#अंमलीपदार्थ