28/07/2022
"जळगावचा-जाळ-आणि-धूर"
माझं मूळ गाव अमळनेर तालुक्यातील वावडे. आजोबा, वडील, काका सर्व बँकेत नोकरी करणारे, माझे वडील तर कारकून पासून ते जनरल मॅनेजर पदापर्यंत येवून रिटायर झाले. साहजिक, मी पण बँकेत नोकरीला लागावें अस घरच्यांचे स्वप्न. पण मला आधीपासून डिफेन्सकडे जास्त आवड होती.१ ली ते ४ थी किनगाव, ५ ते १० वी रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव, दरम्यान मी धुळे येथील राजे संभाजी मिलट्री स्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. NDA ची१ ली परीक्षा पास ही झालो. पण मी एकुलता एक दिवा असल्याने आईने मला घरी बोलावून घेतले.१२ वी सायन्स, नंतर बी. कॉम.असे वळण घेत घेत शैक्षणिक प्रवास पूर्ण केला.
थोडा खोडकर असा माझा स्वभाव, त्यामुळे माझे सारखं काहीतरी वेगळे विश्व असायचं. एक सामान्य मुलगा याचे आयुष्य बदलले ते डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या "कोण आहे रे तिकडे" या नाटकात मिळालेली भूमिका मुळे..... असाच मी नेहमीसारखा थोडा मस्तीखोर, सर म्हंटले"चल मला हे डायलॉग बोलून दाखव" मला त्या नाटकात एक छोटी भूमिका दिली गेली. त्या नाटकातील मुख्य पात्र "प्रधान" करणारा कलाकार ऐन वेळेवर नाटक सोडून गेला. मी एकपाठी असल्याने प्रधान पात्रची स्क्रिप्ट एका रात्रीत पाठ केली. आणि इथून सुरू झाला माझा रंगमंचावरील प्रवास....
सुरुवातीला माझे आई वडील यांना समजत नव्हते नेमक मी काय काम करतो, घरून रागवत,ओरडत,पण मी ते न जुमानता माझं काम सुरू ठेवले.
२००४ ला मुकुंद टकसाळे लिखित "कोसळे आज इथे देव्हरा" अस मेलोड्रामा यातील माझे काम बघायला माझे आई वडील आले होते. त्यातील माझी भूमिका पाहून भारावलेले माझे वडील "जी ले अपनी जिंदगी"अस म्हणून मी उंच उडावं यासाठी त्यांनी मला कायम पाठबळ दिले.माझे आई, वडील,पत्नी,गुरू डॉ.हेमंत कुलकर्णी ज्या हिमतीने माझ्या सोबत आहेत,त्यांच्या अपेक्षेला किमान पूर्तता देऊ शकेन..असा माझा प्रयत्न...!
"दास्तान" या नाटकाने मला आत्मविश्वास शिकवला. माननीय माधव खाडिलकर यांनी मला माझ्या दमदार आवाजाचा योग्य लय शिकवला. B.A नाट्यशास्त्र (जळगाव) आणि M.A(कोल्हापूर) अस शिक्षण घेतले.१ ,२,३ ......४१ नाटकात विविध पात्र रंगवले.वाचिक अभिनय ७ वेळा घेणारा एकमेव मुलगा,६ व्यवसायिक नाटके,५ मालिका,२५ " Best Actor" असे पुरस्कार प्राप्त झाले आहे.
मी, मराठी कलाकार प्रो .हेमंत प्रकाश पाटील ( ठाकरे) " महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम"माझे मित्र,सोबती ज्यांनी मला आर्थिक,मानसिक,भावनिक आधार दिला, अजूनही देत आहेत,त्यांच्या उपकरास उपकृत राहण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. जेव्हा मी रंगभूमी, दिग्गज, लोकांसोबत काम करतो तेव्हा एकच खंत असते.माझ्या जळगावकडून रंगभूमी गाजवायला येणारा वर्ग त्या मानाने कमी असतो.तरुण पिढीने अभ्यास सोबत वाचन आणि कला याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.रंगभूमी आणि अभिनय ही सामान्य लोकांची कला नाही...तेवढं असामान्य व्यक्तिमत्व असावं लागतं.
शीतल विसपुते
https://www.sh*talvispute.com/post/जळगावचा-जाळ-आणि-धूर
Hemant Patil Sunil Bhalerao Nihar Vispute