10/07/2023
SOLAPUR | ऑन आमदार अपात्रता नोटीस
- मला आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसी बाबत संपूर्ण माहिती नाही, पण मी नक्की सांगेन की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला त्याला कायद्याच्या चौकाटीत बसवून विधानसभा अध्यक्ष कारवाई करत आहेत.उशीर लागण्याचा विषयच नाही आहे.
- न्याय, न्यायपालिका,निवाडा आणि नियमित खूप स्पष्ट आहेत.
- त्यामुळं खोटं बोलणारे कदाचित यासगळ्यातून ते उघडे पडतील, कारवाईला समोर जातील, अशी परिस्थिती होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे.
ऑन उद्धव ठाकरे
- जे स्वतःच्या वडिलांचा विचार सोडू लागले, जे स्वतःच्या वडिलांनी घेतलेल्या भूमिकेला पायदळी तुडवू लागले, जे स्वतःच्या वडिलांनी दिलेल्या कार्यक्रमाला टोचून बाहेर काढायला लागले त्या लोकांना वडिलांच्या पक्षाच नाव मागण्याचा अधिकारच कुठ उरतो ?
- या देशामध्ये कायदा नावाची काही गोष्ट आहे, या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, या देशामध्ये आयोग आहेत. ते कायदा नियमाप्रमाणे चालतात.
- मात्र काही लोक अहंकारातच जन्माला आल्यामुळे,अहंकारातच वावरतात आणि मग असे स्टेटमेंट उद्धवजी करतात.
- त्यामुळे अहंकारातून बोलणाऱ्या माणसाचा आपण किती सिरियसली मत घेतलं पाहिजे?
- जे कायद्यांतर्गत आहे तेच होईल.
- मुळामध्ये मी आणि माझं कुटुंब यापेक्षा उद्धव ठाकरेंचा दुसरा विचार नाही. मी आणि माझा मुलगा यापेक्षा सामान्य शिवसैनिकाबद्दल त्यांनी कधी विचार केला होता का हा प्रश्न आता लोकांना पडायला लागला आहे.
- आणि म्हणून बाळासाहेबांबरोबर असलेले सैनिक,ज्यांनी शिवसेना उभी केली त्यांच्या सगळ्यांबरोबर उद्धव ठाकरेंनी काय व्यवहार केला?
- मनोहर जोशी, लीलाधर ढाके, वामनराव परबांचे कुटुंबीय, वामनराव महाडिकांचे कुटुंबीय, दत्ता नलावडेंचे कुटुंबीय या सगळ्यांबद्दल उद्धव ठाकरेंची कशी वर्तवणूक राहिली आहे, हे चित्र स्पष्ट करत की, खऱ्या शिवसैनिकांच्या मनात विचार काय आहे.
- 'मर्दांची अवलाद' हा शब्द न मागत, न विचारता ते स्वतःबद्दल वारंवार का उच्चारतात हा प्रश्न आहे.
- कुठल्याही सभेत गेलं की,"आम्ही मर्दांचा पक्ष आहोत" असा उल्लेख केला जातो,- कोणी विचारलं होत का बाबा, कोणाच्या मनात शंका आहे का बाबा?
असं म्हणत मारला उपरोधक टोला
- तुम्ही स्वतःहून हे सांगण्याची गरज का पडत आहे ?
- उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमचा पक्ष मर्दांची अवलाद असेल, तर तुमच्या सुपुत्राला वरळीचा राजीनामा द्यायला सांगा
- त्या वरळीला आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलात,आणि मर्दांचा उबाठा पक्ष असेल तर त्यांनी वरळीत आदित्य ठाकरेंना राजीनामा द्यायला लावावा, निवडणूकींना सामोर जावं आणि मग अशी भाषा करावी
त्यांचा अभ्यास कच्चा आहे.
- त्यांचा पक्ष ज्यावेळेला निर्माण झाला त्याआधीपासून मुंबई महापालिकेत जनसंघ आणि भाजपचे नगरसेवक आहेत.
- त्यांच्या पक्षाच्या निर्मितीच्या आधीपासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसंघ आणि भाजपचे आमदार निवडून आले आहेत.
- त्यांचा पक्ष निर्माण होऊन विधानसभेत प्रवेश करण्याआधी ज्या शरद पवार यांच्या बरोबर आजकाल ते गुळबीट करून वागत आहेत त्यांच्या सरकारमध्ये जनसंघाचे मंत्री सुद्धा होते.
- या महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष येण्यापूर्वी जनसेवेचा काम जनसंघ म्हणजेच भाजप करत होती.
- तुमचं घर तुम्हाला का टिकवता आलं नाही याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे.
- महाराष्ट्रात सर्वात अपयशी नेता ही उद्धव ठाकरेंची ओळख आहे.
- याच कारण म्हणजे स्वतःच्या कुटुंबातील सख्ख्या भाऊ-भावजयेला ते एकत्र ठेवू शकले नाहीत.
- स्वतःच्या कुटुंबातील असलेला प्रॉपर्टीचा वाद ते घरातल्या घरात सामोपचाराने सोडवू शकले नाहीत, न्यायालयापर्यंत न्यावं लागलं.
- स्वतःच्या चुलत भावाशी सौख्य आणि प्रेम त्यांना ठेवता आले नाही.
- स्वतःच्या पक्षातील बाळासाहेबांच्या काळापासून असलेले नारायण राणेंसारखे नेते, त्यांच्याशी ते मैत्री ठेवू शकले नाहीत.
- ते स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या पक्षातील मंत्री - आमदार एकत्र ठेवू शकले नाहीत.
- सर्व फ्रंट वरती अपयशी ठरले आहेत, त्यामुळे एक अपयशी महाराष्ट्रातला नेता अशी त्यांची ओळख झाली आहे.
- ऑन काँग्रेस आमदार संपर्कात
- सगळ्या प्रश्नांना आजच पूर्ण विराम देऊन उपयोग नाही. काही स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह ठेवले पाहिजे.
- याबाबत आज भाष्य करणार नाही पण योग्य वेळेला आमचे नेतृत्व त्याबाबत भूमिका तुमच्यासमोर मांडेल.
- ऑन एक फुल दोन हाफ या ठाकरेच्या टिकेला उत्तर
- मग हे वाक्य माझे आहे. उद्धव ठाकरेंना, त्याची ही रॉयल्टी स्वतःची करता आली नाही.
- त्यांच्या टीकेआधी तीन दिवस आधी मी ते ट्विट केलेले आहे.
- स्वतःच्या अहंकारापोटी नॅनो गाडीमध्ये स्वतःचा पक्ष बसवावा लागतो आहे.
- पिता, पुत्र आणि एक शापित दरबारी असा तिघांचा मिळून झालेला हा नॅनोमधला पक्ष अशी टीका मी त्यांच्यावर केली होती.
- ऑन संजय राऊत बिनखात्याचे मंत्री टीका
- बिनकामाच्या संपादकापेक्षा बरे आहे की, त्या संपादकाला कामही नाही आणि कामाचे बोलतही नाही.
- त्यापेक्षा अजित पवार पहिल्या दिवसापासून उपमुख्यमंत्री म्हणून कामाला लागले याचा अभिमान आणि आंनद आहे.