Love Latur Jeev Latur - लव लातूर जीव लातूर

  • Home
  • Love Latur Jeev Latur - लव लातूर जीव लातूर

Love Latur Jeev Latur - लव लातूर जीव लातूर लातूरकराच्या हक्काच पेज आणि व्यासपीठ LOVE LATUR JEEV LATUR

18/07/2025

सरकारी रुग्णालयात 'बोगस औषध रॅकेट ! खुद्द आरोग्यमंत्र्यांची कबुली...

शासकीय रुग्णालयात बोगस औषध प्रकरणाचं मोठं उघड झालंय...

आणि याबाबत दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर स्वतः राज्याच्या आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनीच अधिवेशनात कबुली दिलीय. राज्यातल्या काही रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बोगस औषध प्रकरणी चक्राऊन टाकणारी माहिती समोर आलीय...
धाराशिव, नांदेड आणि लातूरच्या सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्याच अस्तित्वात नसल्याची कबुली आरोग्य मंत्र्यांनी दिलीय...


18/07/2025

अहो सरकार तुम्ही मन लावून लातूर जिल्हा रुग्णालय करा...

18/07/2025
18/07/2025

Unedited vidos...
विधीमंडळ परिसरातल्या राड्यानंतरही रात्रभर राडा सुरूच...

लबाड लांडग ढोंग करतय...लातूर जिल्हा रुग्णालय होणार म्हणून सोंग करतय...
17/07/2025

लबाड लांडग ढोंग करतय...
लातूर जिल्हा रुग्णालय होणार म्हणून सोंग करतय...

17/07/2025

लबाड लांडग ढोंग करतय...
लातूर जिल्हा रुग्णालय होणार म्हणून सोंग करतय...

16/07/2025

माय लेकीची औत जोडी...
जळकोट इथ हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत माय लेकी स्वतःला औताला जुंपून घेत शेती करतायत...
सोसायटीचे 60 हजारांचे कर्ज, पतीच्या दवाखान्यासाठी केलेली आठ लाखांची उसनवारी , मुलीचे शिक्षण आणि लग्न ह्या सगळ्यांचा भार सोसवेना झालाय...
मुक्ताबाई कळसे या विधवा महिला शेतकऱ्याचे कष्ट सरकार आणि समाज जाणून घेईल का...

#विधानमंडळ #कर्जमुक्ती #शेतकरी #महाराष्ट्र #जळकोट #उदगीर #लातूर #महिलाशेतकरी #भाजपा #काँग्रेस #राष्ट्रवादी #शिवसेना #शेतकरीसंघटना #गंगाधरचामलवाड #हडोळती #अहमदपूर

16/07/2025

लातूर | आ.अमित देशमुखांच्या कंपनीत 9 कोटी 28 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार...
सत्यजित देशमुख, मल्लिकार्जुन माकने, सुप्रिया बिराजदार या तिघांवर गुन्हा दाखल...
संचालकांची फसवणूक करून 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत आर्थिक गैरव्यवहार...

15/07/2025

राज्याला चिंतेत टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील बाहत्तर प्रशासकीय अधिकारी, क्लास वन अधिकारी, सनदी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती उघड झाली आहे. या संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही तक्रारींची सध्या पोलिसांकडून गोपनीय चौकशी सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्या आहेत. या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या संदर्भात उच्चस्तरीय गोपनीय चौकशी केली जात आहे, मात्र अद्याप या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. राज्यातील जवळपास बाहत्तरहून अधिक प्रशासकीय अधिकारी, क्लास वन ऑफिसर आणि आजी-माजी मंत्री या हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी गोपनीय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे...

एकूर्का येथील विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश जिल्हा परिषदेच्या वतीने रात्री 10 वाजता इयत्ता आठवी वर्ग मंजुरीचे दिले प...
15/07/2025

एकूर्का येथील विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश जिल्हा परिषदेच्या वतीने रात्री 10 वाजता इयत्ता आठवी वर्ग मंजुरीचे दिले पत्र...

15/07/2025

गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या खोलीतच भर सकाळी दारू पिताना पालकांनी रंगेहात पकडले...

 #जिद्द जगण्याची.पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंग...
15/07/2025

#जिद्द जगण्याची.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं.

सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले... रवींद्रनाथही.

पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता, तर साथी होता. त्याने हार मानली नाही.
तो पोहत राहिला... पोहत राहिला... वर फक्त आकाश, खाली अथांग पाणी. तास निघून गेले, दिवस सरले.

5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला, ना खाणं, ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट. जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा. प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिम्मत त्यापेक्षा जास्त मजबूत होती.

5व्या दिवशी... सुमारे 600 किलोमीटर दूर, बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, 'एमव्ही जवाद' नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं. नीट पाहिलं... कोणीतरी माणूस पोहत होता!

कॅप्टनने तात्काळ लाइफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही. तरीही कॅप्टन थांबले नाहीत... त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली --- माणूस.

काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला, आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं. लाइफ जॅकेट पुन्हा फेकलं, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं.

क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं.

त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला, आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो.

❤️ धन्यवाद, त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला.

तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे.

कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा, संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते.

(टीप:- ही Forworded पोस्ट आहे.)

#माणुसकी

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Love Latur Jeev Latur - लव लातूर जीव लातूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share