07/08/2026
⚠️नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा! ⚠️
आज बेरोजगारीचा फायदा घेत अनेक ठग - काही कंपनी चे नावाने, Marketing Company, Work From Home, DSA, MLM (Multi-Level Marketing), Network Marketing, Data Entry Company, Part Time Job, Online Job
अशा विविध नावाखाली युवक-युवतींची आर्थिक फसवणूक करत आहेत. विशेषतः विद्यार्थी, महिला वर्ग, रिटायर्ड लोकं, बेरोजगार युवक - युवती आणि आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना मोठ्या कमाईचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात आहे.
"100% Job Guarantee", "मुलाखती शिवाय नोकरी", "घरबसल्या मोठी कमाई", "पहिल्याच महिन्यात मोठा पगार", "Part Time मध्ये हजारो रुपये कमवा" अशा खोट्या आश्वासनांना बळी पडू नका.
आमच्याकडे ₹2,000 पासून ते ₹50,000, अगदी ₹1 लाखांपर्यंत आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
⚠️ फसवणूक कशी होते ? ⚠️
🔴 पैसे घेऊन नोकरी दिली जात नाही.
Registration, Training, Joining किंवा Security Deposit च्या नावाखाली पैसे उकळले जातात.
🔴 भरलेले पैसे परत केले जात नाहीत.
🔴 बनावट Offer Letter, Appointment Letter किंवा ID Card देऊन विश्वास संपादन केला जातो.
🔴 इतरांना जोडल्यास मोठ्या कमाईचे आमिष दाखवून MLM (Multi-Level Marketing), Network Marketing किंवा Referral Program च्या साखळीत अडकवले जाते.
🔴 स्वतःला मोठ्या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक केली जाते.
🔴 नोकरीच्या नावाखाली कंपनीची उत्पादने खरेदी करण्यास किंवा इतरांना विकण्यास भाग पाडले जाते.
🔴 "Target पूर्ण करा, मग पगार मिळेल" किंवा "आधी पैसे भरा, मग नोकरी मिळेल" अशा खोट्या आश्वासनांनी आर्थिक शोषण केले जाते.
🔴 सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती, Telegram, WhatsApp Group किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून मोठ्या कमाईचे आमिष दाखवले जाते.
🔴 "Part Time Job", "Online Job", "Data Entry", "Captcha Filling", "Back Office Executive", "Work From Home" अशा नावाखाली पैसे उकळले जातात.
🔴 "₹500 गुंतवा आणि ₹5,000 कमवा", "दररोज ₹2,000 ते ₹10,000 कमवा" अशा खोट्या योजनांचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जाते.
🔴 काही ठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बँक खाते, ATM Card किंवा KYC कागदपत्रांचा गैरवापर केला जातो.
अश्या जाहिरातीपासून सावध रहा, कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका 🙏🏼
माहिती शेअर करा जेणेकरून इतरांनाही अशा प्रकारच्या फसवणूक होण्यापासून वाचवता येईल 🙏🏼
Digital Guru