MPSC English Grammar

MPSC English Grammar Welcome all to this page !! This page has been specially designed to enhance grammatic knowledge among MPSC/UPSC aspirants. Thank you for your !

07/08/2020

Hi,
is there anyone, who is interested to run this page as an admin?
interested can send DM to page Inbox..

22/07/2017
18/09/2016
05/08/2016

FIVE ways to invite someone over for a cup of coffee in English:
1. Hey, would you like to come with me for a cup of coffee?
(अगं, तुला माझ्यासोबत एक कप कॉफी पिण्यासाठी यायला आवडेल का?)
2. I owe you a cup of coffee for this. How about today evening?
(या गोष्टीबद्दल माझ्याकडून एक कप कॉफी होऊन जाऊ दे. आज संध्याकाळबद्दल काय विचार आहे?)
3. Are you free tomorrow? I know this new place, they serve amazing coffee there.
(तुला उद्या मोकळा वेळ आहे का? मला एक नवीन ठिकाण ठाऊक आहे, जिथे खूप चांगल्या चवीची कॉफी मिळते.)
4. Let's have this meeting over a cup of coffee. What do you say?
(Yah meeting ek cup coffee peete huye karte hain. Kya khayal hai?)
(ही मिटिंग एक कप कॉफी पीत-पीत करूयात. तुम्हाला काय वाटते?)
5. We could go for some coffee after work. I have something important to discuss with you.
(आपण काम झाल्यावर कॉफी प्यायला जाऊ शकतो. मला तुझ्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत.)

02/07/2016

Tense(काळ)

काळ तीन प्रकारचे असतात : (1)present tence(वर्तमान काळ)
(2) past tence(भुतकाळ)
(3)future tence(भविष्यकाळ)

आणि वरील प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत
1)simple tense ( साधा काळ ) 2) continous tense (चालु काळ) 3)perfect tense ( पुर्ण काळ) 4)perfect continous tense (पुर्ण चालु काळ)

आता आपण प्रत्येक काळाची माहिती पाहू

Simple tense (साधा काळ)

1) simple present tense(साधा वर्तमान काळ)
मराठीच्या वाक्याच्या शेवटी तो ते ता तोस तं. हे अक्षरे असल्सास हा काळ वापरावा
या काळाची रचना : कर्ता +क्रियापदाचे पहिले रुप(s)+.........
उदा.1) I go there. मी तिथे जातो I म्हणजे कर्ता go म्हणजे क्रियापदाचे पहिले रुप आणि मग उरलेल वाक्य
2) They work all day ते दिवसभर काम करतात
3) You look happy तु अानंदी दिसतोस
4)She looks happy ती आनंदी दिसते
इथे 4 थ्या वाक्यात क्रियापदाला s लागले आहे .क्रियापदाला s केव्हा लावतात
कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला s लावतात आणि कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला s लागत नाही. पण I आणि You एकवचनी असले तरी क्रियापदाला s लागत नाही.
5) He thinks त्याला वाटतं
6)He comes तो येतो
7) This road goes to Mumbai. - हा रस्ता मुंबईला जातो.
8) I go to school by car. - मी शाळेत कारने जातो.
9) He lives in India - तो भारतात राहतो.
10) I know this - मला हे माहित आहे.

2) Simple past tense(साधा भुतकाळ)
वाक्याच्या शेवटी ला ली लो लं ल्या ल्यास ले हे अक्षरे असल्यास हा काळ वापरावे.
रचना : कर्ता + क्रियापदाचे दुसरे रुप+ ..........
1) The bell rang घंटा वाजली.
2) He got angry तो रागात आला.
3) I said yes मी हो म्हटलो.
4) He asked me त्याने मला विचारलं.
5) I got this job by chance मला ही नोकरी योगायोगाने मिळाली.
6) He came first in the race तो शर्यतीत पहिला आला.
7) The class finished . क्लास संपला.
8) He said no. त्याने नाही म्हटल.
9) He made good use of time. त्याने वेळेचा चांगला उपयोग केला.
10) The sun rose. सुर्य मावळला.

3) Simple feture tense ( साधा भविष्यकाळ)
साध्या भविष्यकाळाची ओळख : वाक्याच्या शेवटी ल ( तो जाईल) - न ( मी जाइन) -णार /-ऊ (आम्ही जाणार / जाऊ)
रचना : कर्ता + will+ क्रियापदाचे पहिले रुप...........
उदा: 1) I will come मी येईन.
2) I will meet him tommorrow. मी त्याला उद्या भेटेन.
3) I will eat. मी खाईन.
4) He will be at hom now. तो आता घरी असेल.
5)He will be ten years old tommorrow तो उद्या दहा वर्षाचा होईल.
6) I will go मी उद्या जाईन.
7) He will newer listen to me. तो माझ कधी ऐकत नाही.
8) Accidents will happen. अपघात घडतातच.
9) We will win the match. आम्ही सामना जिंकू.
10) This summer will be very hot. हा उन्हाळा खूप गरम असेल.

02/07/2016

same thing with different style : 1. Simple Present Tense
( साधा वर्तमान काळ )
मराठी वाक्याची ओळख - त ची बाराखडी आणि त नाही
जर कर्ता He,She,It,TPS येत असेल तर SPT मध्ये क्रियापदाला s,es प्रत्येय लागतो .
helping verb - do does
formation : s+v+o
2. Continues Present Tense ( चालू वर्तमान काळ )
मराठी वाक्याची ओळख - त आहे त नाही आहे
to be- am is are
verb - ing suffix
formation : s+am is are+v ing+o
3. Perfect Present Tense
( पूर्ण वर्तमान काळ )
मराठी वाक्याची ओळख - ल ची बाराखडी त नाही
helping verb: have has
verb - 3
formation : s+have has+v3+o
4. Perfect Continues Present Tense
( पूर्ण चालू वर्तमान काळ )
मराठी वाक्याची ओळख - त आहे त नाही आहे आणि वेळ
helping verb: have has
verb - 3
formation : s+have been has been +v ing+o+time
1. Simple Past Tense ( साधा भूतकाळ )
मराठी वाक्याची ओळख - ल ची बाराखडी ल नाही
affermative : v2
Negative,Interogative and negative Interogative:Did वापरावे did हे क्रियापदाचे दुसरे रुप आहे त्यामुळे वाक्यात क्रियापदाचे पहिले रुप येते
verb - v2
formation : s+v2+o
2. Countinues Past Tense ( चालू भूतकाळ )
मराठी वाक्याची ओळख - त होता / त नव्हता
Helping verb- was were
verb - ing suffix
formation : s+was were +v+ing+o
3. Perfect Past Tense ( पूर्ण भूतकाळ )
मराठी वाक्याची ओळख - ल होता / ल नव्हता
helping verb- had
verb - v3
formation : s+had+v3+o
4. Perfect Continues Past Tense ( पूर्ण चालू भूतकाळ )
मराठी वाक्याची ओळख - पासून त होता / पासून त नव्हता
helping verb- had been
verb - ing suffix
formation : s+had been + v ing+o+time

02/07/2016

Present Tense (वर्तमान काळ)
The tense in which action of the verb occurs is called as present tense.
ज्या काळात क्रिया घडत असते अशा काळास वर्तमानकाळ असे म्हणतात.

साध्या वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात.

Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)
Continuous Present Tense (चालू वर्तमान काळ)
Perfect Present Tense (पूर्ण वर्तमान काळ)
Continuous Perfect Present Tense (चालू पूर्ण वर्तमान काळ)
1. Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

The Present Tense in which action of the verb is only told or shown, such type of present tense is called as Simple Present Tense.

ज्या वर्तमानकाळात क्रिया ही सांगितलेली किंवा दर्शविलेली असते, त्या क्रियेचा नियमितपणा सांगितलेला असतो, अशा काळास साधा वर्तमानकाळ असे म्हणतात. या काळात मुख्य क्रियापदाचे मुळ रूप (first form of main verb, V1) असते.

e.g. I write a letter.

She writes a letter.

Mother washes the clothes.

In the examples above main verb is suffixed with ‘s’ or ‘es’ and it is governed by Rules of Suffixes.

खालील काळाच्या प्रकारांसाठी साह्यकारी क्रियापदांची (Helping Verbs) माहिती असणे गरजेचे आहे.

2. Continuous (Imperfect) Present Tense (चालू/अपूर्ण वर्तमान काळ)

The Present Tense in which action of a verb is going on continuously, such type of present tense is called as Continuous Present Tense.

ज्या वर्तमान काळात क्रिया ही सतत चालू असते किंवा अपूर्ण असते ती केंव्हा संपेल याचा उल्लेख नसतो अशा वर्तमान काळास चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. इंग्रजीत या काळात to be ची साह्यकारी क्रियापदे, am/is/are पैकी एक घेऊन मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.

[To be + -ing form]

e.g. We are crossing the bridge.

Gauri is making the mats.

3. Perfect Present Tense (पूर्ण वर्तमान काळ)

The Present Tense in which action of the verb is just completed; such type of present tense is called as Perfect Present Tense.

ज्या वर्तमान काळात क्रिया ही पूर्ण झालेली असते अशा वर्तमान काळास पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. इंग्रजीत या काळात have/has येउन मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (V3) येते.

[have/has + past participle of main verb]

e.g. I have cheated you.

She has broken the glass.

4. Continuous Perfect Present Tense (चालू पूर्ण वर्तमान काळ)

The Present Tense in which action of the verb in first part and in second part action of the verb is going on continuously, such type of present tense is called as Continuous Perfect Present Tense.

ज्या वर्तमान काळात क्रियेचा काही भाग संपलेला असतो व राहिलेल्या भागामध्ये क्रिया ही सतत चालू असते अशा वर्तमान काळास चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. इंग्रजीत या काळात have been/has been येउन मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय असतो.

[have been/has been + -ing form]

e.g. We have been working in the garden.

She has been singing the songs.

01/07/2016

Welcome all to this page !!

This page has been specially designed to enhance grammatic knowledge among MPSC/UPSC aspirants.

Thank you for your interest in us.
Stay in touch for more...

A complete Guide to competitive Exams
01/07/2016

A complete Guide to competitive Exams

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC English Grammar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share