11/06/2025
मुंबईत पकडलेल्या ड्रगचे तारापूरात उत्पादन...
३ आरोपींसह लाखोंचे ड्रग, कच्चा माल व मुद्देमाल जप्त.

तारापूर: दिनांक - ११, मुंबई पोलीसांनी
दि. ०७/०६/२०२५ रोजीचे २३:४५ वा. सुमारास एमआयडीसी अंधेरी पोलीस ठाणे हद्दीत एक लाल रंगाची स्कोडा कार ही पंप हाऊस सब वे कडुन कनोसा जंक्शन कडे संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जात असताना संवशय बळावल्याने ही कार व कार चालक फरहान गुलजार खान, वय ३६ वर्षे, रा.ठी. जोगेश्वरी पूर्व, मुंबई यास ताब्यात घेऊन, गस्तीवरील पोउपनि महेंद्र खांगळ व पोलीस पथक यांनी वाहनासह पोलीस ठाण्यात आणून, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एकूण २,८०,०००/- रु. किंमतीचा ७१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम. डी) हा अंमली पदार्थ तसेच त्याची रुपये ८,००,०००/- किंमतीची स्कोडा कार क्रमांक एम एच ४३ ए एन ३७६२ ही जप्त करण्यात आली आहे.
अटक आरोपीत हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत विविध पोलीस ठाणेस शरीराविरुध्दचे तसेच मालमत्तेविषयक एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.
या गुन्हयाचा पुढील तपासात या अटक आरोपीतास मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ पुरवणारा व्यक्ती प्रतिक सुदर्शन जाधव, वय-२४ २४ वर्षे, धंदा-वाहन चालक, रा. ठि. पालघर येथील असल्याचे व त्यांच्याकडे मारुती स्विप्ट डीझायर एम. एच.४८ एस ७२५८ असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून पालघर परिसरात शोध घेवून कौशल्यपूर्ण तपास करुन त्यास ताब्यात घेण्यात आले असता , त्यास दिनांक १०/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली असून त्याचेकडून २१५ ग्रॅम वजनाचा व रुपये ८,६०,०००/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच त्याची रुपये ४,६०,०००/- किंमतीची मारुती स्विप्ट डीझायर एम. एच.४८ एस ७२५८ जप्त करण्यात आली.
गुन्हयाच्या तपासात सातत्य ठेवुन व अटक आरोपीताकडे केलेली सखोल चौकशी करून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे वेगवेगळी पथके बनवून नमुद या आरोपीतांना विक्रीकरीता मेफेड्रॉन (एम.डी.) उत्पादन करुन त्याचा पुरवठा करणारा व्यक्ती विजय राजाराम खटके, वय-४३ वर्षे, व्यवसाय नोकरी, शिक्षण एम. एस्सी (रसायनशास्त्र), रा. ठि.- बोईसर, ता.व जि. पालघर, याने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मीना इलेक्ट्रिकल्स, जे/११४, तारापूर एम. आय.डी.सी., जि. पालघर येथे भाड्याने गाळा घेऊन 'प्रोकेम फार्मास्युटीकल लॅब' या नावे चालवत असलेल्या कंपनीवर छापा टाकून विक्री