Max Marathi News

Max Marathi News अग्रेसर लोकप्रिय मराठी बातमी वेब पोर्टल नमस्कार मंडळी. PLEASE SHARE THIS PAGE ON YOUR WALL AND INVITE YOUR FRIENDS.

Mxn मराठीच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर तुम्हाला आमच्या टीमने तयार केलेले अभिरुचीपूर्ण आशय आणि अभिनव संकल्पना असलेल्या वेबसिरीज, शॉर्टफिल्म, विनोदी कार्यक्रमाचा आस्वाद अनुभवता येतील.
आपल्या प्रेक्षकांना सतत काहीतरी अभिनव आणि सर्जनशील मनोरंजन सादर करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल. आमचे कार्यक्रम नक्कीच तुम्हाला प्रेरणा आणि वेगळा दृष्टिकोन देतील.काहीतरी नवीन करण्याचा तुमच्या चेहऱ्याव

र हास्य फुलवण्यासाठी.
आपणा सर्व रसिकांना काय आवडत ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे इथं नक्कीच कमेंट करा,Mxn मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा,आमचे कार्यक्रम आवडल्यास जरूर शेअर करा.

भारतातील लोक मोठ्या संख्येने आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाडीला टायर घेण्यासाठी MRF टायरला प्राधान्य देतात. MRF देखील त्या...
27/09/2023

भारतातील लोक मोठ्या संख्येने आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाडीला टायर घेण्यासाठी MRF टायरला प्राधान्य देतात. MRF देखील त्याच्या शेअरच्या किमतीमुळे चर्चेत आहे. एमआरएफचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. एमआरएफची सुरुवात फारशी चमकदार नव्हती. ही कंपनी अस्तित्वात येण्याची कहाणी खूप मनोरंजक आहे. एका फुगे विक्रेत्याने ही कंपनी स्थापन केली आहे.
१९४६ मध्ये केरळमध्ये जन्मलेले के.एम. मम्मन मॅप्पिलाई चेन्नईच्या रस्त्यावर फुगे विकायचे. मम्मन यांना १० भाऊ आणि बहिणी होत्या. मम्मन फुगे घेऊन गल्लीबोळात जाऊन विकायचे. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की एके दिवशी ते ४६,३४१ कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली कंपनी उभारतील. १९५२ हे वर्ष त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. एक विदेशी कंपनी टायर रिट्रेडिंग प्लांटला ट्रेड रबर पुरवत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा एक गोष्ट त्यांना खटकली. आपल्या देशातच ट्रेड रबर बनवण्यासाठी कारखाना का उभारता येत नाही, असा विचार त्यांच्या मनात आला.
मम्मन यांना ही एक चांगली संधी वाटली. त्यांनी आपल्या सर्व बचतीतून रबर बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफचा जन्म झाला. ट्रेड रबर बनवणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. उच्च गुणवत्तेमुळे काही वेळातच त्यांचा व्यवसाय लोकप्रिय झाला.
१९६० मध्ये मम्मन यांच्या व्यवसायात आणखी एक टर्निंग पॉइंट आला. त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. पण त्यांना फक्त रबरच्या व्यापारापुरते मर्यादित राहायचे नव्हते. मम्मन यांची नजर टायरच्या मार्केटवर होती. MRF हा एक चांगला ब्रँड बनला होता आणि कंपनीला आता टायर मार्केटमध्ये उतरायचे होते. MRF कंपनीने अमेरिकेच्या मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीकडून तांत्रिक मदत घेतली आणि टायर उत्पादन युनिट स्थापन केले. १९६१ मध्ये एमआरएफ कारखान्यातून पहिले टायर तयार होऊन बाहेर आले.
MRF कंपनीने ग्राहकाचा विश्वास संपादन करून टायर मार्केटमध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. १९६७ मध्ये अमेरिकेत टायर निर्यात करणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली. यानंतर, १९७३ मध्ये, MRF ही भारतातील पहिली कंपनी बनली जी व्यावसायिकरित्या नायलॉन ट्रॅव्हल कार टायरचे उत्पादन आणि मार्केटिंग करते.

MRF ने १९७३ मध्ये पहिले रेडियल टायर तयार केले. २००७ मध्ये प्रथमच MRF ने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल करून विक्रम केला होता. पुढील ४ वर्षात व्यवसाय चारपट वाढला. एमआरएफ कंपनी सध्या दुचाकी पासून ते विमान तसेच लढाऊ विमान सुखोईसाठी टायर बनवत आहे. एकेकाळी मद्रासच्या रस्त्यांवर फुगे विकून,काळाची गरज ओळखून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मम्मन यांनी मोठं उद्योग साम्राज्य तयार केले आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला..🙏

भारताने ऑस्ट्रेलियाला 99 धावांनी हरवले:शुभमन गिल-श्रेयस अय्यरची शानदार शतके, राहुल-सूर्याकुमारनेही झळकावली अर्धशतके; अश्...
24/09/2023

भारताने ऑस्ट्रेलियाला 99 धावांनी हरवले:शुभमन गिल-श्रेयस अय्यरची शानदार शतके, राहुल-सूर्याकुमारनेही झळकावली अर्धशतके; अश्विन-जडेजाचे प्रत्येकी 3 बळी
भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. एवढेच नाही तर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर संघाने आपला विजयाचा विक्रम कायम ठेवला आहे. या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 7 वा विजय आहे.

भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. देशात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णां...
04/06/2021

भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. देशात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. या महासंकटाच्या काळात देशाला मदतीचा ओघ मोठ्या संख्येने सुरु आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्स अशा अनेक देशांनी भारताला वैद्यकीय उपकरणांची मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलींडर्स, मेडीसीन्स आणि निदान करणारी उपकरणांचा समावेश आहे. अनेक देशांनी भारताला मदत केली आहे. यातच आता आणखी एका देशाची भर पडली आहे. पूर्व अफ्रिकन देश केनिया या देशाने देखील भारताला कोरोना संकटाच्या काळात मदत म्हणून 12 टन खाद्य उत्पादने पाठवली आहेत. गेल्या 28 मेला ही मदत भारतात पोहोचली आहे. मात्र, केनियाने केलेल्या या मदतीची थट्टा उडवण्यात येत असल्याचं दिसून येत आहे, जी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सोशल मीडियात यासंदर्भातील अनेक खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट्स तसेच ट्विट्स दिसून आल्या. हे करताना केनियाचा उल्लेख 'गरीब देश', 'कंगाल देश' असाही केला गेला. खर तर केनिया देशाकडून मदत घेण्याची वेळ मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या देशावर आणली आहे,भारतावरील कोरोना संकटामागे दोष कुणाचा हे आपल्याला नंतर चर्चा करता येईलच मात्र, या सगळ्यात मोठ्या मनाने मदत केलेल्या केनियाची आपण का करत आहोत...
केनियाने शुक्रवारी म्हटलंय त्यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीला 12 टन चहा, कॉफी आणि शेंगदाणे दिले आहेत, ज्याचं उत्पादन स्थानिक पातळीवर केलं जातं. या सगळ्या मदतीतून आलेल्या खाद्य उत्पादनांना महाराष्ट्रात वाटप केलं जाणार आहे. केनियाचे भारतातील उच्च आयुक्त विली बेट यांनी म्हटलंय की, केन्या सरकार खाद्य पदार्थ दान देऊन कोरोना महासंकटाच्या काळात भारत सरकार आणि भारतीय लोकांसोबत उभं राहू इच्छितो. मदतीचे साहित्य देण्यासाठी नवी दिल्लीहून मुंबईला आलेल्या ब्रेटने म्हटलंय की, ही मदत फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जाणार आहे, जे लोक जीव वाचवण्यासाठी तासनतास काम करत आहेत.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला 9/11 चा हल्ला भीषण होता. या हल्ल्याने अमेरिकेसहित संपूर्ण जगाला हादरा बसला होता. 2001 साली झालेल्या या हल्ल्यात सुमारे तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी अमेरिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक देशांनी अमेरिकेला मदत केली होती. यातीलच एक देश होता तो म्हणजे हा दर्यादिल केनिया. अमेरिकेवरील या हल्ल्याची खूप महिन्यांनी केनियातील मसाई या आदिवासी समूहात पोहोचली. तेंव्हा तिथल्या मसाई आदीवाशांनी अमेरिकेला मदत करण्याचे ठरवलं. त्यावेळी या मसाई लोकांनी केनियातील अमेरिकन दुतावासातील डेप्यूटी हेड विल्यम ब्रॅंगिक यांना आपल्याकडून मदत देऊ केली. ती मदत होती 14 गायी. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल पण हे खरंय. मसाई आदिवासी गुरेढोरे पवित्र मानतात आणि ते सहसा लग्न किंवा घरी परतताना भेट देतात.
पण प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधनांचा! त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतून एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला. जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोचली, तर मग काय घडले हे तुम्हाला माहिती आहे? त्यांनी आभूषणांच्या जागी गायी स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या, मात्र आभूषणे ठेवू नयेत. मग अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.
म्हणूनच आपणही केनियाचे मोठ्या मनाने या आभार मानले पाहिजे...

लाख लाख धन्यवाद...🙏🙏 पोरी कंगना तुझे किती आभार मानावे...कोलमडलेली अर्थव्यवस्था,कोरोना महामारी,बेरोजगारी,महागाई यावरून लो...
10/09/2020

लाख लाख धन्यवाद...🙏🙏 पोरी कंगना तुझे किती आभार मानावे...कोलमडलेली अर्थव्यवस्था,कोरोना महामारी,बेरोजगारी,महागाई यावरून लोकांचे लक्ष हटवून दिल्याबद्दल लय लय आभार...

ज्योती पासवान या पोरीची डोनाल्ड ट्रम्पच्या पोरीने दखल घेतली. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून गुरुग्राम ते बिहार 1200 ...
24/05/2020

ज्योती पासवान या पोरीची डोनाल्ड ट्रम्पच्या पोरीने दखल घेतली. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून गुरुग्राम ते बिहार 1200 किमी प्रवास तिने केला एकीकडे अमेरिका तिचं कौतुक करतंय. आणि आपल्या देशात देशभक्त, मोदीभक्त,अंधभक्त तिला ट्रोल करत आहेत.
ज्योतीचा सायकल प्रवास कौतुकाची गोष्टच नाही. तिला हे करावं लागलं, यासाठी आपण एक देश म्हणून, एक समाज,एक व्यवस्था म्हणून दोषी आहोत.
भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली तरी हे जीवघेणे अनुभव लोक घेतायत. अशा लाखो ज्योती पासवान मनाने खचून गेल्या असतील. या देशात आपण असुरक्षित असल्याची भावना प्रबळ झाली तर त्याला जबाबदार कोण? ज्योतीकुमारी पासवानचं तिच्या जिगरबाज साहसाबद्दल कौतुक करण्याऐवजी संपूर्ण देशानं खरंतर तिची माफी मागायला हवी. आपण हे करायला तयार आहोत...?

कोरोनाच्या संकटाला तोंड देणाऱ्या महाराष्ट्राला साथ देण्याची जास्त गरज आहे की काळे दाखवण्याची ?मित्रांनो ज्या  कोरोनाच्या...
22/05/2020

कोरोनाच्या संकटाला तोंड देणाऱ्या महाराष्ट्राला साथ देण्याची जास्त गरज आहे की काळे दाखवण्याची ?

मित्रांनो ज्या कोरोनाच्या संकटापुढे अमेरिका, रशिया, इटली, इंग्लंड, स्पेन, चीन आणि कित्येक प्रगत आणि विकसित देशांनी हात टेकले हार मानली त्या तुलनेत आपण यशस्वीपणे लढा देत आहोत. हा सगळा संघर्ष या स्वार्थी नेत्यांसाठी मोडीत काढणार आहात का ? याचा नीट विचार करा.

राजकारण होत राहील, सत्ता येईल जाईल पुन्हा येईल. परंतु जागतिक संकटाच्या विरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचे आणि बदनाम करण्याचे पाप करणाऱ्या पाताळयंत्री व सत्तेसाठी वैफल्यग्रस्त झालेल्या भाजप नेत्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही 👎

महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा
संकटकाळी महाराष्ट्रासोबत उभे राहा🙏
सत्तेचे राजकारण सोडा भाजपावाल्यांनो👎
महाराष्ट्राच्या मातीसोबत उभे राहा 🚩

जय महाराष्ट्र 🙏🚩

संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोनाच्या भयंकर वादळात देखील एक माणूस खंबीरपणे आणि गंभीरपणे ठाम ऊभे आहेत... ते म्हणजे आपले पंतप्...
12/05/2020

संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोनाच्या भयंकर वादळात देखील एक माणूस खंबीरपणे आणि गंभीरपणे ठाम ऊभे आहेत... ते म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्रशेठ मोदी...🙏फरक फक्त एवढाच आहे की कोरोनाच्या वादळात त्याची आश्वासने उडून कुठे दूर गेली आहे...😉😆😁

#आत्मनिर्भर #स्वदेशी #20लाखकरोड #15लाख

शिवसेनेचे सरकार आले रे...सोमवार पासुन कामावर जाताना टिफीन घेऊन जाण्याची गरज नाही.  आता चौका चौकात मिळणार १० रुपयात पोटभर...
30/11/2019

शिवसेनेचे सरकार आले रे...सोमवार पासुन कामावर जाताना टिफीन घेऊन जाण्याची गरज नाही. आता चौका चौकात मिळणार १० रुपयात पोटभर जेवण...🍛🥛

महाराष्ट्रात विरोधीपक्षच उरणार नाही,अशी वल्गना केलेल्या देवेंद्र फडणवीसाची विरोधी पक्षनेतापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अ...
29/11/2019

महाराष्ट्रात विरोधीपक्षच उरणार नाही,अशी वल्गना केलेल्या देवेंद्र फडणवीसाची विरोधी पक्षनेतापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐

100% सत्य एका चहावाल्याचा धंदा साखरवाला आणि दूधवालाच बंद करू शकतो...😜
27/11/2019

100% सत्य एका चहावाल्याचा धंदा साखरवाला आणि दूधवालाच बंद करू शकतो...😜

मी पुन्हा येईल....मी पुन्हा जाईल...होय मी पुन्हा येईल तुम्हाला नवीन ताजी गाजरे घेवून येईल...😃
26/11/2019

मी पुन्हा येईल....मी पुन्हा जाईल...
होय मी पुन्हा येईल तुम्हाला नवीन ताजी गाजरे घेवून येईल...😃

Address

Prabhadevi
Mumbai
400025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Max Marathi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Max Marathi News:

Share