Dr. Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar Dr. Babasaheb Ambedkar was a veritable phenomenon of the 20th century. There may scarcely be a paral

30/06/2025

धक्कादायक तरी अपेक्षित..

काल मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने जी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेदरम्यान घडलेली एक अतिमहत्त्वाची पण सिक्रेट गोष्ट जी फारशी कुणाला माहीत नाही. ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. कदाचित या पोस्टमुळे माझे काही मित्र नाराज देखील होतील.

कालच्या जाहीर सभेत शासनाच्या हिंदी भाषा सक्तीचा जीआर जाहीरपणे जाळल्यानंतर मी सहजपणे माझ्या एका पत्रकार मित्राला विचारलं. खरंच काही फरक पडेल का? तो इतकंच म्हणाला. फरक कशाला पडतोय, या लोकांना दिल्लीचेच आदेश पाळायचेत. काही होत नाही. आधिवेषन आहे उद्यापासून. याला मागे टाकायला दुसरं काहीतरी घडवून आणतील. मी ही म्हटलं शक्य आहे. मग आम्ही सगळे वर गेलो दुसऱ्या माळ्यावर.

डॉ. दीपक पवार सरांचं भाषण सुरू झालं साधारण तीन वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास. आणि संपलं साधारण चार वाजून १० मिनिटांच्या आसपास. तेव्हा मी माझ्या त्याच पत्रकार मित्रांसोबत हॉलमध्येच उपस्थित होतो. तितक्यात भाजपच्या जवळ असणाऱ्या एका पत्रकाराने सांगितलं.. की भाषण ऐकलंय त्यांनी. अपेक्षा नव्हती त्यांन अश्या प्रकारच्या भाषणाची. प्लस ऑनलाईन मिडीया बॅकफायर करतोय. मी निघतो आता. पुढची प्रेस कवर करायला जातोय. ही जाहीर सभा संपताच जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करतील सीएम आणि दोन्ही डीसीएम.

खरंच खूप तुफान भाषण झालं होतं.. या लिंकवर तुम्हाला ते ऐकायला, पहायला मिळेल. एकदा पहा. ऐका. आणि स्वतःची जबाबदारी समजून हे भाषण प्रत्येकाला फॉरवर्ड करा. ही पहा लिंक आहे. https://youtu.be/qZ3VXPCMybU

वैभव छाया यांच्या वॉलवरून..

https://youtu.be/4jUSRsNJ0Is fans
12/06/2025

https://youtu.be/4jUSRsNJ0Is

fans

चरण जाधव या गुणी कलाकाराने नेहमीच नामदेव ढसाळांच्या कवितेला नव्या फॉम मध्ये आणण्याचा धाडसी पयत्न केलेला आहे. याव...

06/06/2025

संपूर्ण व्हिडीओ या लिंकवर उपलब्ध आहे.
link: https://youtu.be/BnbmYk6oYkQ

भाषण पूर्ण ऐका. या लिंकवर उपलब्ध आहे.link: https://youtu.be/BnbmYk6oYkQ
02/06/2025

भाषण पूर्ण ऐका. या लिंकवर उपलब्ध आहे.
link: https://youtu.be/BnbmYk6oYkQ

ही सविताबाई बामनीन होती. तीनंच बाबासाहेबांचा जीव घेतला. ती विषकन्याच होती. आमच्या लहानपणी असे एक ना अनेक वाक्य ऐकत आम्ही...
29/05/2025

ही सविताबाई बामनीन होती. तीनंच बाबासाहेबांचा जीव घेतला. ती विषकन्याच होती. आमच्या लहानपणी असे एक ना अनेक वाक्य ऐकत आम्ही माईसाहेबांबद्दलचं प्रतिकूल मत बनवत होतो. ही मतं अगदी तेव्हापर्यंत कायम राहीली जोपर्यंत नीटसं वाचायला सुरूवात केली नव्हती तोपर्यंत.. बरं का.. आणि जेव्हा कळालं खरं काय नी खोटं काय.. तेव्हा मात्र स्वतःचीच स्वतःला लाज वाटून गेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य महान बनलं ते सहजासहजी नाही. त्यामागे कितीतरी ज्ञात अज्ञात लोकांचा संघर्ष आणि त्याग होता. जसा रमाईंचा होता.. अगदी तसाच त्याग आणि समर्पण होतं ते डॉ. शारदा कबीर यांचंही होतं. पण, आपण ते कधी मान्य केलंय का.

आज त्यांच्याच आयुष्यावर ही साधक बाधक चर्चा. ज्यातून उलगडून पहायचंय आपल्याला डॉ. सविता आंबेडकरांचं आयुष्य. ज्यात एकाच वेळेस असीम त्याग आणि टोकाचा अपमान या दोन्ही गोष्टी आहेत. टोकाचा अपमान हा शब्द तरी खूप सोबर आहे. आपण टॉर्चर हाच शब्द वापरला पाहीजे. माईसाहेबांवर इन्क्वायरी लावल्या गेल्या होत्या. तहहयात त्यांना विषकन्या म्हणूनच एका गटानं हिणवलं, त्यांची अशक्य तितकी बदनामी केली. आणि यासारख्या अनेक गोष्टी ज्यांचा आपण विचारच करू शकत नाही.

सविस्तर व्हिडीओ पहिल्या कमेंट मध्ये

https://youtu.be/wmhZYlOQPw0?si=ShpHY-nM83rYYg3L

https://youtu.be/F06ecJiIL9Q
27/05/2025

https://youtu.be/F06ecJiIL9Q

"Do We Even Deserve to Take Ramai's Name?We've shaped Ramabai Ambedkar's identity to fit our emotions and convenience, never truly acknowledging her independ...

इथे संपूर्ण भाषण आहे. https://youtu.be/aPGGHbgs-2Qदिशा वाडेकर, आपण खऱ्या अर्थानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्...
25/04/2025

इथे संपूर्ण भाषण आहे.
https://youtu.be/aPGGHbgs-2Q

दिशा वाडेकर,
आपण खऱ्या अर्थानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चालणाऱ्या धाडसी आणि मानवतावादी स्त्री आहात. आपण सामाजिक न्यायासाठी आणि वंचित समुदायांच्या हक्कांसाठी केलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहेत. भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांमध्ये आपल्या प्रभावी वकिलीमुळे, अनेकांना न्याय मिळवून देण्यात आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.​

दलित-बहुजन महिलांच्या हक्कांसाठी तुम्ही जे कार्य केलंय त्यामुळे त्यांचा आवाजाला बळकटी मिळाली. स्त्रीवादाच्या मर्यादीत चौकटींपलीकडे जाऊन, आपण DAWNS या दलित महिलांच्या ऐक्यासाठी बनवलेल्या संघटनेच्या माध्यमातून सर्व महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. ​

उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाविरुद्ध आपल्या प्रयत्नांनी, शैक्षणिक क्षेत्रात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या नेतृत्वाखाली, अनेक संस्थांमध्ये समान संधी कक्ष स्थापन करण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.​

डॉ. आंबेडकरांनी मूकनायकमधून ज्याप्रमाणे ज्यांना स्वतःचा आवाज नव्हता, ज्यांना स्वतःवरच्या अन्यायाची जाणीव नव्हती, अन्यायाविरोधात संघर्षाची ताकद नव्हती त्या सगळ्यांना त्यांची अभिव्यक्ती, त्यांचा आवाज मिळवून दिला. अगदी तसेच कार्य तुम्ही या सत्त्योत्तर काळात करत आहात. आपण आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवत रहाल, आणि आंबेडकरी विचारधारेचा हा मार्ग असाच भारताला आणि भारताच्या लोकांना दाखवत राहाल याची आम्हाला खात्री आहे. ‘समष्टी फाउंडेशन’च्या वतीने ‘समष्टी मुकनायक पुरस्कार’ हा तुमच्या या कार्याला मानवंदना म्हणून आम्ही प्रदान करत आहोत.

त्यांच्या भाषणाची लिंक कमेंट मध्ये देत आहोत.

#समष्टी

23/04/2025

संदीप तामगाडगे सरांची मिडीयाच्या माध्यमातून देशाला असलेली ओळख म्हणजे दबंग पुलिस अधिकारी अशीच आहे. परंतू पोलिस अधिकारी असण्यापलीकडे त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय असंच आहे. त्यांनी स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उभं केलेलं काम हे अतिशय महत्त्वाचं आणि तितकंच क्रांतिकारी आहे. सिकल सेल सारख्या उपचार नसलेल्या आजारावर त्यांनी दिलेलं योगदान हे कोणत्याही क्रांतीपेक्षा कमी नाही. समष्टी पुरस्कार २०२५ ने त्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी केलेलं भाष्य हे प्रत्येकानं ऐकायलाच हवं असं आहे. आणि आपापल्या परीने शक्य होईल तसं त्यांनी उभ्या केलेल्या सिकल सेल विरोधातील लढ्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहीजे.
व्हिडीओची लिंक पहिल्या कमेंट मध्ये आहे.

21/04/2025

Harshal Jadhav Jay Bheem...

प्रेस नोटदिनांक: ५ एप्रिल २०२५समष्टी पुरस्कार जाहीर… ज्ञानासाठी, विचारासाठी, परिवर्तनासाठी — ‘समष्टी’चा नवा उजेडजावेद अख...
07/04/2025

प्रेस नोट
दिनांक: ५ एप्रिल २०२५

समष्टी पुरस्कार जाहीर…
ज्ञानासाठी, विचारासाठी, परिवर्तनासाठी — ‘समष्टी’चा नवा उजेड

जावेद अख्तर, संदिप तामगाडगे, राजू परुळेकर, डॉ. श्यामल गरूड, डॉ. अमोल देवळेकर, आणि एड. दिशा वाडेकर यांचा सन्मान

मुंबई | विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे.

समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवर व त्यांचे क्षेत्रनिष्ठ योगदान:

जावेद अख्तर – नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार
साहित्य आणि भाषाशास्त्रात त्यांनी दिलेले ५० वर्षांचे अमूल्य योगदान…

संदिप तामगाडगे, IPS, DIG Nagaland State Police – नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार
पोलीस सेवेतील प्रामाणिकता आणि सिकल सेल सारख्या आजाराशी लढा देण्यासाठी उभारलेले मूलभूत काम

राजू परुळेकर – समष्टी ऊलगुलान पुरस्कार
मराठी सार्वजनिक विचारविश्वात स्वतंत्र, निर्भीड आणि बिनधास्त मतप्रदर्शनाची परंपरा जोपासणारे

डॉ. श्यामल गरूड – समष्टी गोलपीठा पुरस्कार
‘कनातीच्या मागे’ या ग्रंथासाठी तसेच मराठी भाषा आणि आंबेडकरी साहित्यातील योगदानासाठी…

डॉ. अमोल देवळेकर – समष्टी निर्मिक पुरस्कार
आरोग्यसेवेत केलेले अमूल्य काम

एड. दिशा वाडेकर – समष्टी मूकनायक पुरस्कार
दोनशे वर्ष जुना जातीय कायदा मोडून काढत ऐतिहासिक लढ्याचं नवं पर्व रचणाऱ्या मूकनायक...

११ आणि १२ एप्रिल २०२५ | अण्णाभाऊ साठे सभागृह, मुंबई | संपूर्ण दिवस ‘समष्टी’मय

दोन दिवस, दोन दिशा — पण एकच ध्येय: समाज-परिवर्तनाची सर्जनशील यात्रा.

११ आणि १२ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत ‘सारं काही समष्ठीसाठी’ सोहळा रंगणार आहे. यंदा या सोहळ्याचं आठवं वर्ष.
या दोन दिवसांत कला, साहित्‍य, सिनेमा, सामाजिक चर्चा आणि जाणीवांचा आवाज असं सर्वकाही एकत्र येणार आहे.

कार्यक्रमाचे ठळक आकर्षण:
१. अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण
२. रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम
३. वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद
४. सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, एड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद
५. ‘तुही यत्ता कंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार
६. आणि विशेष सादरीकरण: सत्यशोधक जलसा
७. चित्र आणि शिल्प प्रदर्शन : मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण

समष्टी म्हणजे फक्त पुरस्कार नव्हे — तो एक वैचारिक सोहळा आहे.
समष्टी फाउंडेशनने गेली आठ वर्षं सतत प्रयत्न केले आहेत की समाजातल्या वास्तव प्रश्नांना भाषा, गीत संगीत आणि कलाकृतींचा वापर करून अभिव्यक्त करण्याची संधी तळागाळातील प्रत्येकाला उपलब्ध व्हावी. ही परंपरा जपताना समष्टी पुरस्कार म्हणजे संवेदनशीलतेच्या आणि जबाबदारीच्या गाठी बांधणाऱ्या लोकांचा सन्मान आहे. सर्व विचारप्रवण नागरिकांना आणि माध्यम प्रतिनिधींना या पर्वसोहळ्याला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण दलित पँथरचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्नील ढसाळ यांनी सर्वांना केले आहे.

संपर्क:
समष्टी फाउंडेशन व नामदेव ढसाळ फाऊंडेशन
[email protected]

प्री-हायलाईट्स' सेक्शन –
💡 समष्टी पुरस्कार २०२५: एका नजरेत
८वे वर्ष
७ मान्यवरांचा सन्मान
२ दिवसांचा वैचारिक कला व साहित्य महोत्सव
चर्चा, नाट्य, संगीत, सिनेमा, चित्रं, शिल्प प्रदर्शन
स्थळ: अण्णाभाऊ साठे सभागृह, मुंबई
वेळ: ११-१२ एप्रिल, १२ दुपारी ते १० रात्री

आधी नारा होता.. आरक्षण हटावचा. पण काही केल्या आरक्षण हटलं नाही. मग, व्यवस्थेनं चलाखी केली. आणि प्रत्येक जात समुहाला आरक्...
15/03/2025

आधी नारा होता.. आरक्षण हटावचा. पण काही केल्या आरक्षण हटलं नाही. मग, व्यवस्थेनं चलाखी केली. आणि प्रत्येक जात समुहाला आरक्षणाचं गाजर दाखवलं. प्रत्येकाला आरक्षणाच्या लढ्यात उतरवून सामाजिक न्यायाची खिल्लीच उडवायचं कुटील राजकारण जन्माला घातलं. आता या सगळ्या समुहांना वाटतंय की, बौद्धांना आरक्षण मिळालं म्हणून त्यांची प्रगती झाली. आम्हाला पण आरक्षण मिळालं की आम्हीही अशीच प्रगती करू. असं वाटण्यात काहीच गैर नाही. पण खरंच बौद्धांना फक्त आरक्षण मिळाल्यामुळेच प्रगती साधता आलेलीये का… तर उत्तर नाही असंच आहे.

त्यासंदर्भात सविस्तर... पहिल्या कमेंट मध्ये आहे...

https://www.youtube.com/watch?v=DRgXWDg60jw&t=254s

Address

Gauravgatha
Mumbai
4210501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category