Across States News7

Across States News7 Sanjay M. Bhaire

Chief Editor,Printer , Publisher n owner of Across States n Across Mumbai newsapa

Follow us on
Youtube:-ACROSS STATE NEWS7
Instagram:-across_state_news7
Twitter:-Across_state_news7

28/08/2026

प्रति,
मा. आयुक्त,
श्रीमती अश्विनी भिडे,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
मुंबई.
विषय: पाम कोर्ट कॉम्प्लेक्स, मालाड पश्चिम येथील अनधिकृत मॅलोर्का स्पा आणि निवडक कारवाईचा गंभीर आरोप — पी/नाॅर्थ मलाड पश्चिम अधिकाऱ्यांकडून आयुक्त कार्यालयाच्या आदेशाची केराची टोपली
संदर्भ:
१. तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी दि. २६.०३.२०२६ आणि २७.०७.२०२६
२. सहाय्यक आयुक्त, पी/पश्चिम वॉर्ड यांचे पत्र क्र. DIS/URDM/MUMS/2026/339, COM/HOUS/2026/658, TAL/URDM/BORI/2026/1359, 1360 दि. २५.०८.२०२६
३. एमआरटीपी कायदा कलम ५३(१) अन्वये नोटीस क्र. २०८६९१
मा. आयुक्त महोदया,
मार्च २०२६ पासून मी मुंबई ४०० ०६४, मालाड पश्चिम, लिंक रोड, डी-मार्ट जवळ, पाम कोर्ट कॉम्प्लेक्स, अकॉर्ड निधी (ऑर्चर्ड निधी) च्या दुसऱ्या मजल्यावरील अनधिकृत मॅलोर्का स्पाबाबत वारंवार तक्रार केली आहे. बारा ते पंधरा खोली अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. तक्रार निवारण पोर्टलवर दोनदा नोंद झाली. पाच महिन्यांनंतर, काल २७ ऑगस्ट २०२६ रोजी पी/पश्चिम वॉर्ड कार्यालयाने एम.आर.टीपी कायद्याच्या कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावल्याचे कळविले.
ही नोटीस दिली म्हणजे कारवाई झाली असे नाही. ही नोटीस म्हणजे केवळ कागदावरची औपचारिकता आहे. जिथे अधिकाऱ्यांना मलाई मिळते, तिथे कारवाई थांबते. जिथे सामान्य नागरिकाचा छोटासा पत्र्याचा शेड असतो, तिथे दुसऱ्या दिवशी नोटीस आणि सतत पाठपुरावा.
माझ्याकडे असे आणखी दोन ठळक उदाहरणे आहेत. एका नागरिकाच्या बाराव्या मजल्यावरील ओपन टेरेसवर पत्रे टाकण्यात आली होती. तक्रार मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नोटीस काढण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठलाग करून ती पत्रे काढून टाकली. इथे मात्र बारा-पंधरा अनधिकृत खोल्या बांधून स्पा चालू आहे, तरीही आजतागायत प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. सातत्याने तक्रार करूनही विभागाने डोळेझाक केली.
हा निवडक अंमलबजावणीचा स्पष्ट नमुना आहे. एका ठिकाणी एका दिवसात कारवाई, दुसऱ्या ठिकाणी पाच महिने उशिरा कागदी नोटीस आणि त्यानंतर मौन. अशा लाचखोर आणि निवडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे महानगरपालिकेची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. आयुक्त कार्यालयाचे आदेश पी/नाॅर्थ मलाड पश्चिम विभागात केराची टोपली दाखवली जाते आहेत, असेच चित्र आहे.
मा. आयुक्त, आपण या प्रकरणी स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कराल का? अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यात येईल का? निवडक कारवाई आणि भ्रष्टाचाराची चौकशी होईल का?
या विभागाचे सहाय्यक आयुक्त एवढे हुशार आहेत की त्याने नोटीस काढली परंतु ती फक्त तक्रारदाराची दिशाभूल करणारी आहे त्या नोटीस मध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की पी/ दक्षिण असा उल्लेख केलेला आहे परंतु हे अनधिकृत बांधकाम पी/ नॉर्थ या या विभागात येते परंतु हे अधिकारी एवढे मुजूर आहेत की ज्या विभागात हे काम करतात त्यांना आपला विभाग कोणता आहे हे सुद्धा माहिती नसावे हे दुर्दैव आहे.
या पत्राची प्रत मी जनतेसमोरही ठेवत आहे, कारण ही केवळ एका नागरिकाची तक्रार नाही, तर महानगरपालिकेच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह आहे.
आपला विश्वासू,
संपादक: संजय मंगेश भैरे
अक्राॅस मुंबई व अक्रॉस स्टेट वृत्तपत्र
महाराष्ट्र उपाध्यक्ष: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य

दिनांक: २८ ऑगस्ट २०२६

10/08/2026
05/08/2026

अनधिकृत बांधकाम आणि अवैध मसाज पार्लर : मालाड (पश्चिम) येथील ‘अकॉर्ड निधी पाम कोर्ट’ प्रकरणात बीएमसी अधिकाऱ्यांकडून पाच महिन्यांपासून कारवाई नाही
मालाड (पश्चिम) येथील लिंक रोडवरील डी-मार्टजवळ असलेल्या ‘अकॉर्ड निधी पाम कोर्ट’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बेकायदेशीरपणे चालवले जाणारे ‘मलोर्का (स्पा) मसाज पार्लर’ आणि त्याच ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम याबाबत स्थानिक रहिवासी व तक्रारदार अयाज यासिन खान यांनी गेल्या पाच महिन्यांपासून वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-नॉर्थ कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
अयाज यासिन खान यांनी १६ मार्च २०२६ पासून पी-नॉर्थ कार्यालयात अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या मजल्यावर एकूण बारा अनधिकृत रूम बांधण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली, मात्र उत्तर मिळाले नाही. यानंतर अपीलही दाखल केले; अपीलाला दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला तरी अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
या प्रकरणात माझ्या कार्यालयात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज मी पत्रकार या नात्याने सहाय्यक आयुक्त कुंदन वडवी यांची भेट घेऊन विचारणा केली असता, त्यांनी “सेकंड अपीलमध्ये जा” असे सांगितले. या उत्तराने अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपालनाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तक्रारदार आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (ए.ई.) जाणीवपूर्वक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि पडद्यामागून अवैध मार्गाने लाभ घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अनधिकृत बांधकामे आढळल्यास तक्रार मिळताच तात्काळ डेमोलेशन करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र पी-नॉर्थ विभागातील सहाय्यक आयुक्त, ए.ई. आणि जे.ई. यांनी या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित अधिकारी आपल्या जबाबदाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणात अधिकृत कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये असंतोष आहे. तक्रारदार अयाज यासिन खान यांनी ही बाब माझ्याकडे मांडली असून, लोकशाही प्रक्रियेद्वारे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादक : संजय मंगेश भैरे
अक्रॉस मुंबई व अक्रॉस स्टेट वृत्तपत्र
महाराष्ट्र उपाध्यक्ष : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना

15/06/2026

Welcome to the official Across State News YouTube channel. Editor ...

11/05/2026

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी,
हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात आपण पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करण्याचे आव्हान जनतेला दिले आहे, हे पाऊल देशाच्या ऊर्जा संरक्षणासाठी स्वागतार्ह आहे. याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.
परंतु, आपल्या सोबत असलेला मोठा वाहन ताफा आणि चार्टर विमानांचा वारंवार वापर यामुळे देशात प्रचंड प्रमाणात इंधन खर्च होत आहे. हा ताफा आणि विमान प्रवास कमी केल्यास भारतासाठी फार मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होऊ शकते.
म्हणून आपण आपल्या मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांना आणि स्वतःला कठोर ताकीद द्यावी की, अनावश्यक वाहनांचा वापर आणि चार्टर विमान प्रवास टाळावा. फक्त सामान्य जनतेला वेठीस धरू नये, तर सरकार आणि नेते यांनी प्रथम उदाहरणे द्यावीत. जेव्हा नेते आणि जनता दोघेही एकत्रितपणे बचत करतील, तेव्हाच ‘अटल’ बचत शक्य होईल.
कृपया या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करून योग्य पावले उचलावीत, अशी नम्र विनंती.
आपला विश्वासू
पत्रकार:संजय मंगेश भैरे

Address

Mumbai
400064

Alerts

Be the first to know and let us send you an email when Across States News7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Across States News7:

Shortcuts

Share