Aamhi Parlekar

Aamhi Parlekar 'Aamhi Parlekar' is the first ever suburban newsletter published from Vileparle since last 30 years. It mainly covers socio-cultural events from the area.

आपल्या पार्ल्याला दिग्गज कलाकारांची समृद्ध परंपरा लाभली आहे. आज आपली तरूण पिढी सुद्धा त्याच आत्मविश्वासाने मराठी सिनेविश...
22/08/2025

आपल्या पार्ल्याला दिग्गज कलाकारांची समृद्ध परंपरा लाभली आहे. आज आपली तरूण पिढी सुद्धा त्याच आत्मविश्वासाने मराठी सिनेविश्वात वाटचाल करत आहे. काय आहेत त्यांची स्वप्ने ? कसा असेल उद्याचा मराठी सिनेमा ? जाणून घेऊया या दिलखुलास गप्पांमधून !

सोमवार दि. २५ ऑगस्ट, रात्री ८ वाजता

नमस्कार,पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा...
19/08/2025

नमस्कार,

पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा 'आम्ही पार्लेकर'चा ऑगस्ट २०२५ महिन्याचा अंक खालील लिंक वर उपलब्ध आहे.

हा अंक 'आम्ही पार्लेकर' च्या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे. त्याची लिंक खालील प्रमाणे
https://www.parlekar.com/aamhi-parlekar-august-2025

आपला,

ज्ञानेश चांदेकर
संपादक

शिक्षणाचे बोर्ड कुठले असावे? – SSC, ICSE, CBSE, IB की इतर काही?काही वर्षांपूर्वी दहावीसाठी एकच बोर्ड होते, पण आज असे अने...
29/07/2025

शिक्षणाचे बोर्ड कुठले असावे? – SSC, ICSE, CBSE, IB की इतर काही?

काही वर्षांपूर्वी दहावीसाठी एकच बोर्ड होते, पण आज असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच आजचा पालक गोंधळून गेला आहे. काय आहेत या वेगवेगळ्या बोर्डांची वैशिष्ठ्ये ? आपल्या पाल्यासाठी कुठले बोर्ड योग्य आहे ? ह्या विषयाच्या विविध पैलूंवरील विस्तृत चर्चेसाठी 'आम्ही पार्लेकर'तर्फे नुकतेच एका Facebook Live चे आयोजन केले होते त्याला पार्लेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

काही कारणाने आपण हा कार्यक्रम बघू शकला नसाल तर खालील लिंकवर तो उपलब्ध आहे.

https://youtu.be/T1BD_zibvjE

अशा उपयुक्त व मनोरंजक videos साठी 'आम्ही पार्लेकर'च्या YouTube Channel ला जरूर subscribe करा.

आपला
ज्ञानेश चांदेकर

शिक्षणाचे बोर्ड कुठले असावे? – SSC, ICSE, CBSE, IB की इतर काही?शिक्षण, बोर्डांची वैशिष्ट्ये, पालकांची भूमिका आणि विद्यार्थ्य.....

24/07/2025

काही वर्षांपूर्वी दहावीसाठी एकच बोर्ड होते, SSC. पण आज ICSE, CBSE, IB असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच आजचा पालक गोंधळून गेला आहे. काय आहेत या वेगवेगळ्या बोर्डांची वैशिष्ठ्ये ?

काही वर्षांपूर्वी दहावीसाठी एकच बोर्ड होते, SSC. पण आज ICSE, CBSE, IB असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच आजचा पालक गोंध...
22/07/2025

काही वर्षांपूर्वी दहावीसाठी एकच बोर्ड होते, SSC. पण आज ICSE, CBSE, IB असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच आजचा पालक गोंधळून गेला आहे. काय आहेत या वेगवेगळ्या बोर्डांची वैशिष्ठ्ये ? आपल्या पाल्यासाठी कुठले बोर्ड योग्य आहे ? चला, चर्चा करुया शिक्षण तज्ञांशी !

या लिंकवरुन तूम्ही चर्चेत सहभागी होऊ शकता :
https://www.facebook.com/share/1HTmZbsadt/

नमस्कार,पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा...
17/07/2025

नमस्कार,
पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा 'आम्ही पार्लेकर' जुलै २०२५ महिन्याचा अंक खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://www.parlekar.com/aamhi-parlekar-july-2025/

आपला,
ज्ञानेश चांदेकर
(संपादक)
([email protected])

शिक्षणाचे माध्यम - मातृभाषा की इंग्रजी ?  शिक्षणाचे माध्यम काय असावे ? हा एक बहुचर्चित पण अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे....
04/07/2025

शिक्षणाचे माध्यम - मातृभाषा की इंग्रजी ?

शिक्षणाचे माध्यम काय असावे ? हा एक बहुचर्चित पण अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर प्रत्येकासाठी जरी वेगवेगळे असले तरी चर्चेच्या निमित्ताने अनेक मुद्दे समोर येतात व त्यांचा आपल्या निर्णय प्रक्रियेत निश्चितच फायदा होतो. ह्या विषयाच्या विविध पैलूंवरील विस्तृत चर्चेसाठी 'आम्ही पार्लेकर'तर्फे नुकतेच एका Facebook Live चे आयोजन केले होते त्याला पार्लेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

काही कारणाने आपण हा कार्यक्रम बघू शकला नसाल तर खालील लिंकवर तो उपलब्ध आहे.

https://youtu.be/a4YxSqUlAKo

अशा उपयुक्त व मनोरंजक videos साठी 'आम्ही पार्लेकर'च्या YouTube Channel ला जरूर subscribe करा.

आपला
ज्ञानेश चांदेकर

शिक्षणाचे माध्यम – मातृभाषा की इंग्रजी?मुलांना शिक्षण देताना भाषा निवड महत्त्वाची ठरते. मातृभाषा समजायला सोपी अ....

30/06/2025

शिक्षणाचे माध्यम काय असावे ? हा एक बहुचर्चित पण अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर प्रत्येकासाठी जरी वेगवेगळे असले तरी चर्चेच्या निमित्ताने अनेक मुद्दे समोर येतात.

शिक्षणाचे माध्यम काय असावे ? हा एक बहुचर्चित पण अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर प्रत्येकासाठी जरी वेगवेगळे अ...
30/06/2025

शिक्षणाचे माध्यम काय असावे ? हा एक बहुचर्चित पण अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर प्रत्येकासाठी जरी वेगवेगळे असले तरी चर्चेच्या निमित्ताने अनेक मुद्दे समोर येतात व त्यांचा आपल्या निर्णय प्रक्रियेत निश्चितच फायदा होतो. त्या दृष्टीने हा संवाद ऊद्बोधक ठरावा. जरूर वेळ काढा !

ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत श्री अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे निधनप्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे व सावरकर विचारांचे खंदे ...
16/06/2025

ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत श्री अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे निधन

प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे व सावरकर विचारांचे खंदे पुरस्कर्ते ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे काल १५ जून रोजी निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी पत्रकारितेला मराठा दैनिकातून सुरुवात केली. सा. विवेकचे काही काळ ते संपादक होते. 'मिड डे'मध्ये राजकीय संपादक म्हणून राज्याच्या राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले. त्या काळातील त्यांचे लेख, त्यांनी घेतलेल्या मुलाखती यांची चर्चा आजही होते. ‘धर्मभास्कर’, ‘हिंदुस्थान समाचार’सारख्या संस्थांमधून आणि अलीकडे 'अधोरेखित' या युट्युब वाहिनीच्या माध्यमातून ते राष्ट्रीय विचारांचा प्रसार सातत्याने करत राहिले.
अनेक वर्षे ते 'आम्ही पार्लेकर'शी संपादकीय सल्लागार म्हणून जोडले गेले होते.
कुळकर्णी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

नमस्कार,पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा...
11/06/2025

नमस्कार,
पार्ल्यातील सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, महत्वाची माहिती व इतरही अनेक गोष्टींचा वेध घेणारा 'आम्ही पार्लेकर' जून २०२५ महिन्याचा अंक खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://www.parlekar.com/aamhi-parlekar-june-2025/

आपला,
ज्ञानेश चांदेकर
(संपादक)
([email protected])

'आम्ही पार्लेकर'च्या निमित्ताने अनेक कलाकारांशी, कला प्रवाहांशी संबंध येतो. त्यांच्याविषयी लिहिताना कधीकधी त्या कला प्रव...
02/06/2025

'आम्ही पार्लेकर'च्या निमित्ताने अनेक कलाकारांशी, कला प्रवाहांशी संबंध येतो. त्यांच्याविषयी लिहिताना कधीकधी त्या कला प्रवाहातील एखादा सूर स्वत: छेडून बघायचा मोह आवरत नाही. 'हात हाती ठेव तू .....' ह्या गाण्याची निर्मिती हा असाच एक स्वानंदासाठी केलेला प्रयोग. संगीतकार म्हणून माझा हा पहिलाच प्रयत्न आहे व गायलेय मी आणि माझी पत्नी अनिता हिने. Hope you like it !

https://www.youtube.com/watch?v=owhbTUUYJ5I

आपला,
ज्ञानेश चांदेकर

#आम्हीपार्लेकर #हातहातीतठेवतू #मराठीगाणं #नवीनगाणं #मराठीसंगीत #नवीनप्रयत्न #संगीतप्रेमी #मराठीकलाकार #स्वरांच्यासाथी

Address

1, Alpha, M. G. Road, Vile Parle East
Mumbai
400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Parlekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamhi Parlekar:

Share