25/11/2025
⭐️ भूमिपुत्रांना साथ – कवी संमेलन २०२५ ⭐️
(सर्व भूमिपुत्रांसाठी खुला कार्यक्रम)
आपले भूमिपुत्र बांधव गेल्या अनेक महिन्यांपासून सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे शांततामय धरणे आंदोलन करत न्यायाची मागणी करत आहेत.
याच आंदोलनाला कलेची, शब्दांची आणि आवाजाची साथ देण्यासाठी —
एक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
📍 *ठिकाण:* सिडको भवन, सीबीडी बेलापूर
🗓️ *दिनांक:* शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५
⏰ *वेळ:* दुपारी ३.०० वाजता
🎤 संमेलनाचा विषय:
✊सिडको प्रशासनाकडून भूमिपुत्रांवर होणारे अन्याय व आपल्या प्रमुख मागण्या
✊वाढीव गावठाण हक्क
✊बांधलेली घरे नियमित करणे
✊जमीन संपादनाचा न्याय्य मोबदला
✊मैदाने, बगीचे व मूलभूत सुविधा
✊सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता
✊स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य
➡️ हे प्रश्न फक्त एखाद्या गावाचे नाहीत… तर आपणा सर्व भूमिपुत्रांच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत.
➡️ त्या मुळे प्रत्येक भूमिपुत्राने या ठिकाणी हक्काचा आवाज नोंदवण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
---
✍️ कवींसाठी सूचना:
कविता १५–२० ओळी, आगरी/मराठी भाषेत
कोणतेही अर्वाच्य, राजकीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे शब्द नाहीत
संपूर्ण कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पाडला जाईल
📞 नोंदणी (फक्त एका नंबरवर)
1. कवी जयंत पाटील – 9421674215
2. कवी अरुण पाटील – 9967018484
3. कवी हरिश्चंद्र माळी – 8108930750
(स्थळीही नावे नोंदवली जातील)
🌟 विशेष उपस्थिती:
कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे व संजय ठाकूर (किसान सभा – अध्यक्ष/सरचिटणीस)
कॉम्रेड हेमलता पाटील (उपाध्यक्ष – जनवादी महिला सभा महाराष्ट्र)
मा. महादेव घरत (अध्यक्ष – द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन)
मा. काशिनाथ मढवी (कवी/साहित्यिक)
मा. जयंत पाटील (कवी/साहित्यिक)
मा. भ. पो. म्हात्रे गुरुजी (कवी)
--🎙️ *प्रमुख मार्गदर्शक / संयोजक:*
कॉम्रेड भूषण पाटील
(विश्वस्त JNPA, भूमिपुत्र, समाजहितचिंतक)
🎼 *संमेलन प्रमुख:
मा. कवी/गायक अरुण द. म्हात्रे (राष्ट्रीय भारत भूषण)
---
🙏 भूमिपुत्र बांधवांना आवाहन:
आपण कवी असाल, लेखक असाल किंवा नसलात तरी —
👉 फक्त उपस्थित राहणे हीच मोठी साथ आहे.
इच्छेनुसार दोन शब्द बोलण्याची संधीही दिली जाईल.
✊ या आंदोलनात शब्दही लढतील… भावना बोलतील… आणि भूमिपुत्रांचा आवाज अधिक बुलंद होईल!
आपण नक्की या.
bhumiputra navimumbai andolan
agari koli
#आगरी
#आगरसागर