
27/02/2025
स्वर लता 🎙️✨
एक सुरीला सफर
लतादीदींच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम , काल गोकुळ हॉल सायन, येथे संपन्न झाला.
आदित्य कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी,
लतादीदींच्या अजरामर गीतांच , सुरेख सादरीकरण केलं.
आपकी नजरोने समझा, लग जा गले, ये जिंदगी उसी की है, आयेगा आनेवाला, तर द्वंद्व गीतांमध्ये, दिल तडप तडप, जो वादा किया वो निभाना पडेगा, तुझे देखा तो ये जाना सनम, मेरे प्यार की उमर, अशी एकापेक्षा एक सुरेख गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. या कार्यक्रमात काही पाहुणे कलाकार आदित्य कला अकादमीने आमंत्रित केले होते. मीनाक्षी वाडेकर, गीता राणे, विना दीक्षित यांनी लतादीदींची गाणी गावून , कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन
नंदू केरकर काका यांनी केलं. तर निवेदनाची जबाबदारी अंकुश यादव यांनी सांभाळली. तर ध्वनी संयोजनाची उत्तम जबाबदारी साऊंड इंजिनियर महेश सावंत यांनी यशस्वीपणे सांभाळली.
या कार्यक्रमाचे निमित्ताने, आदित्य कला अकादमी ने
लतादीदींना एक मानवंदना दिली 🙏
या कार्यक्रमाचे काही छायाचित्र आपणासाठी😊