05/11/2025
मराठी रंगभूमीच्या तीस रात्री – एक सामाजिक-राजकीय इतिहास (तीन खंड) : मकरंद साठे #मराठीरंगभूमीदिन #मकरंद_साठे
आधुनिक मराठी रंगभूमीला गेल्या दीडशे पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील आणि भारतातीलही – सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षात झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत तिने काही सक्रिय भूमिकाही निभावली. हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोखाही आहे.
मांडणीत इतिहास अभ्यासाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केलेली नसली तरीही, अशा स्वरूपामुळे हा ग्रंथ, या विषयाचा काही खास अभ्यास नसणाऱ्या सामान्य वाचकासही एखाद्या कादंबरीप्रमाणे ‘सहज’ गुंतवून ठेवेल.
तीन खंडांचा संच (पृष्ठसंख्या - १७७८ ) विशेष सवलतीच्या किमतीत खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://tinyurl.com/rdenpjrm
मूळ किंमत - ₹३,७७५/-
सवलतीच्या किमतीत - ₹३,०२०/-
https://popularprakashan.com/mr/
fans Papyrus - The Book Store Majestic book house Rajhans Pustak Peth Nashik