26/01/2026
डिंपल पब्लिकेशनतर्फे ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या🇮🇳 खूप,खूप हार्दिक शुभेच्छा.....🌹
डिंपल पब्लिकेशन २६जानेवारी २०२६ रोजी,
५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
त्यानिमित्ताने ज्येष्ठ संपादक संपादक कुमार केतकर यांची थांग,अथांगतेचा आणि मोनालिसाचे स्मित हि दोन पुस्तकें, डॉ.शुभा थत्ते यांची अवघाची संसार या गाजलेल्या पुस्तकाची दोन महिन्यातच दुसरी आवृत्ती आणि memoirs of millennium या इंग्लिश पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित करीत आहे.
त्याप्रमाणे ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांची द्रौपदी काल आज आणि उद्या* , डॉ.निधी निवांत राक्षीकर यांची बुद्धिभाव,
अरविंद सावंत यांची एका सामान्याची असामान्य यात्रा,
मेघना साने यांची तिला काय हवंय! ,
डॉ.चंद्रशेखर फणसळकर यांची दत्तक कविता आणि सुनील मंगेश जाधव यांची मर्म हि पुस्तकें केली आहेत.
#थांगअथांगतेचा #मराठीपुस्तक #कुमारकेतकर #मराठीकादंबरी