
07/10/2025
सिंधू नदी! जगातल्या सर्वात मोठ्या नद्यांमधील एक अशी नदी आहे, जी तिबेट मधील पहाडात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाताना, उत्तर हिंदुस्तानातून पाकिस्तानात शिरते आणि कराची जवळ समुद्राला मिळते। हजारो वर्षांपासून तिची पूजा केली जात आहे। वासहतवाद्यांनी शेकडो वर्षांपासून साम्राज्ये वाढवणे आणि टिकवण्यासाठी ह्याच सिंधुचा उपयोग केला आहे। आणि आज सिंधूच्याच आधाराने पाकिस्तान देश कसाबसा टिकून आहे। पाच हजार वर्षांपूर्वी सिंधूच्या काठावर पाच समृद्ध शहर नांदत होती।याच नदीतून त्या शहरांतील व्यापारी जगभर जात येत होते। याच नदीच्या काठावर आणि त्या नष्ट झालेल्या शहरांच्या उध्वस्त अवशेषांमार्फत संस्कृत बोलणारे, संस्कृतात ऋग्वेदासारखे ग्रंथ रचणारे भटके पंडित हिंडत होते। सदर पुस्तकाचे बोट धरून वाचक, सिंधूच्या पात्रातून, काराचीपासून ते तिबेटपर्यंत दोन हजार मैल प्रवास करतीलच। त्याचबरोबर त्यांना सिंधूच्या खोऱ्यात घडलेल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासाचाही मागोवा घेत येईल। तसेच इतिहासात घडलेल्या घटनांचे धागेदोरे,सिंधूच्या काठावरील वर्तमानातल्या परिस्थितीत कसे पोहोचले आहे हेही पाहता येईल।
One of the largest rivers in the world, the Indus rises in the Tibetan mountains and flows west across northern India and south through Pakistan. It has been worshipped as a god, used as a tool of imperial expansion, and today is the cement of Pakistan’s fractious union. Alice Albinia follows the river upstream, through two thousand miles of geography and back to a time five thousand years ago when a string of sophisticated cities grew on its banks. Sindhutil Samraye or Empires of the Indus is an engrossing personal journey and a deeply moving portrait of a river and its people.
Buy your copy now from
https://www.indussource.com/product/sindhutil-samrajye/
=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=