20/08/2026
जय शिवराय, जय शंभुराजे, हर हर महादेव
350 वर्षांपूर्वी ज्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली त्या छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे.
माझा कलेला विरोध नाही...परंतु कलेच्या नावाखाली जो बार डान्स सुरू आहे..त्याला विरोध होता, आहे आणि राहील.
#सचिन_गवळी हा कोणी हंगामी हिंदू किंवा तिकडून इकडं आलेला हिंदू नसून Full Time हिंदू आहे..छत्रपतींच्या विचारांचा कट्टर सेवक आहे..आणि छत्रपतीचं हिंदुत्व फॉलो करतो.. एका लेकीचा बाप आहे.
तसेच #नाथ_संप्रदाय खूप जवळून अनुभवला आहे..कारण मी गाथा नवनाथांची या मालिकेत #भरतरीनाथ यांच्या वडिलांची भूमिका केलेली आहे.. सर्व Episode युट्यूबवर उपलब्ध आहेत.
मी तोच सचिन गवळी आहे...ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी.
1) 2020 मध्ये ज्यावेळी मध्यप्रदेश राज्यात छिंदवाडा जिल्ह्यात सौंसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बुलडोझरने हटवली होती..त्यावेळी मी तिथल्या प्रशासनाला नडलो होतो..आणि पुन्हा त्याच मूर्तीची त्याच जागी स्थापना केली होती..त्याचे फोटो उपलब्ध आहेत.
2) ज्यावेळी सोनी चॅनेलवरील KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी
औरंगजेब, महाराणा प्रताप, राजा विजयसिंह आणि राणा सांगा यांचे नाव आदरार्थी घेतले होते, परंतु छत्रपतींचे नाव एकेरी घेतले होते..त्याविरुद्ध मीच स्टँड घेऊन सगळ्यांना चूक दाखवून दिली होती.
3) अक्षयकुमारने निरमा जाहिरातीत मावळे नाचवले होते...त्यावेळी मीच त्याविरुद्ध आवाज उठवून मावळ्यांची पगडी बदलायला भाग पाडलं होतं.
असे अनेक विषय आहेत.
त्यामुळे तुमच्या मतांचा आदर आहे पण इज्जतीत आणि आदरार्थी.
सद्ध्या महाराष्ट्रात 3 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत कोणतीच लेक सुरक्षित नाहीये...त्यामुळे एका लेकीचा बाप म्हणून हा स्टँड घेतला आहे..काही चुकत असेल तर गाईड करा.
जे बिघडत चाललंय ते बदलूया...आपला हिंदू धर्म जपूया.
सचिन गवळी (छत्रपतीसेवक)
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय शंभुराजे
हर हर महादेव