CineflagMarathi

CineflagMarathi मराठी मानाचा मराठी झेंडा.

मराठी मानाचा मराठी झेंडा.

Cineflag Marathi – Marathi Manacha Marathi Zenda

is an online platform for the promotion of Marathi entertainment content. The site is updated daily on a real time basis with news snippets, celebrity interviews, special features, movie reviews, music reviews and a lot of desktop downloadable's.

महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडकेकर याने नुकतीच दिवाळीच्या मुह...
18/10/2025

महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडकेकर याने नुकतीच दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवी कोरी एसयूव्ही खरेदी केली आहे. प्रसादने त्याची ड्रीम कार असलेली 'टाटा सफारी' घेतली असून, ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

'दिसला गं बाई दिसला २.०' जुन्या ठेक्याला नव्या झंकाराची भेट!गौतमी पाटीलच्या ठेक्याला ललित प्रभाकरची साथएव्हरेस्ट एंटरटेन...
14/10/2025

'दिसला गं बाई दिसला २.०' जुन्या ठेक्याला नव्या झंकाराची भेट!

गौतमी पाटीलच्या ठेक्याला ललित प्रभाकरची साथ

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, या चित्रपटातील तिसरं गाणं ‘दिसला गं बाई दिसला २.०’ सध्या प्रचंड गाजतंय. आधीच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणंही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये झळकू लागलं आहे. ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या नव्या आवृत्तीने जुन्या आठवणींना नवा झगमगाट दिला आहे. गौतमी पाटीलच्या अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीनं या गाण्याला एक वेगळंच रूप मिळालं आहे. राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या जोशपूर्ण संगीतासह जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांचे बोल लाभलेलं हे गाणं अधिकच श्रवणीय बनलं आहे. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजात हे गाणं आणखीनच रंगतदार झालं आहे. पॉल मार्शलच्या चैतन्यपूर्ण नृत्यदिग्दर्शनाने यात अधिकच रंगत आली आहे.

हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीस येण्याचं कारण म्हणजे, गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा सुंदर संगम. पारंपरिक तालात आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणं तरुणाईचं नवीन फेव्हरेट ठरतंय.

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, '' हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, '' 'प्रेमाची गोष्ट २' मधली पहिली दोन गाणी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली आणि त्या प्रतिसादानं आम्ही उत्साहित झालो आहोत. आता ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या गाण्याने तो उत्साह आणखी वाढवलाय. जुना ठेका आणि नव्या तालाची सांगड हाच या गाण्याचा आत्मा आहे.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ‘प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास’ २१ ऑक्टोबरला चित्रपटगृहात उलगडणार आहे.

' संगीत देवबाभळी' च्या 'न भूतो न भविष्यति' यशानंतर....भद्रकाली " ची ५९ वी नाट्यकृतीप्रसाद कांबळी सादर करीत आहे' करुणाष्ट...
12/10/2025

' संगीत देवबाभळी' च्या 'न भूतो न भविष्यति' यशानंतर....

भद्रकाली " ची ५९ वी नाट्यकृती

प्रसाद कांबळी सादर करीत आहे

' करुणाष्टके '

उंबरठ्या पलीकडची गोष्ट....

~ शुभारंभाचे प्रयोग ~

बुधवार २२ ऑक्टोबर दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.

रविवार २६ ऑक्टोबर दु. ४.०० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.

रविवार २ नोव्हेंबर दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे.

शनिवार ८ नोव्हेंबर दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.

रविवार ९ नोव्हेंबर दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.



11/10/2025

नक्की पहा

11/10/2025

सखाराम बाइंडर

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’येत्या १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शितसध्या ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झाले...
10/10/2025

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’

येत्या १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

सध्या ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टिझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे.

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘गोंधळ’ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात ‘कांतारा’मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठे स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे.

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. ‘गोंधळ’ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.

आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यांचा सुंदर संगम यात दिसत आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी वेगळंच रहस्य घेऊन येते, असं टिझरमधून दिसते. काही सेकंदांची ही झलक पाहून या चित्रपटाची स्केल, टेक्निकल क्वालिटी आणि सिनेमॅटिक भव्यता स्पष्ट दिसते.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ‘ ‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि श्रद्धेचं दर्शन आहे. ‘कांतारा’ने जसं आपल्या लोककलेला नवा आयाम दिला, तसाच ‘गोंधळ’ महाराष्ट्रातील श्रद्धा, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची.”

डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखर असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

10/10/2025
08/10/2025

तबला वाजवताना अशोक सराफ सर 😍♥️
Follow

Rock star  ❤️💫       PC
07/10/2025

Rock star ❤️💫


PC

‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्टआधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा सांगणारे धमाकेदार ट्रेलर प्रदर्शि...
07/10/2025

‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट

आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा सांगणारे धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असून नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. या धमाल सोहळ्यात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ व ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केले.

ट्रेलरमध्ये लालितच्या आयुष्यात आलेली वळणं ठळकपणे दिसत आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव, त्यातील बदलती नाती, डिजिटल युगातील संवादाचे रूप आणि व्हीएफएक्स यांचा सुंदर मिलाफ यात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भावनांनी भरलेली कथा आणि सतीश राजवाडेंची खास प्रेमकथेची मांडणी या सगळ्यांचा अनोखा संगम ‘प्रेमाची गोष्ट २’च्या ट्रेलरमधून दिसत आहे.

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘’ही एक फ्रेश आणि आजच्या काळाशी सुसंगत अशी प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचं तंत्रज्ञान केवळ दृश्यात्मक सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर कथा सांगण्याचा एक नवा मार्ग म्हणून वापरलं आहे. ही कथा जेन झी प्रेक्षक आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणारी आहे. म्हणजेच संपूर्ण कुटुंबासाठी योग्य असा हा चित्रपट आहे.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, ‘’सतीशसोबत माझा हा चौथा चित्रपट आहे. एकत्र आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्तम चित्रपट घेऊन आलो आहोत. आता प्रेक्षकांसाठी ‘प्रेमाची गोष्ट २’ घेऊन येत आहोत आणि प्रेक्षकांना ही प्रेमाची गोष्ट नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आम्ही नेहमी प्रेक्षकांसाठी मनाला भिडणाऱ्या आणि वेगळेपणा जपणाऱ्या कथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही त्याच परंपरेतली आणखी एक खास प्रेमकथा आहे, जी आजच्या पिढीच्या भावनांना आणि विचारांना अचूक स्पर्श करणारी आहे. सतीश राजवाडे यांनी ही कथा ज्या संवेदनशीलतेने उभी केली आहे, ती प्रेक्षकांना नक्की भावेल.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते

तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रेक्षकां...
01/10/2025

तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं ‘ये ना पुन्हा’ प्रदर्शित झालं आहे.

रोहित राऊतच्या युथफुल आणि फ्रेश आवाजात सादर झालेलं हे गाणं श्रोत्यांना प्रेमाच्या नव्या भावविश्वात घेऊन जाणारं आहे. अविनाश–विश्वजीत यांनी दिलेलं आकर्षक आणि मॉडर्न टच असलेलं संगीत, तसेच विश्वजीत जोशी यांनी लिहिलेले आजच्या पिढीच्या मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं तरुणाईला निश्चितच आवडेल. हे गाणं ऐकताच कोणालाही प्रेमात हरवल्यासारखं, आठवणींमध्ये रममाण झाल्याचं वाटेल.

दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, “प्रेमाच्या प्रवासातील काही क्षण आयुष्यभर लक्षात राहातात. ‘ये ना पुन्हा’ हे गाणं त्या क्षणांची जादू प्रामाणिकपणे पकडतं. पडद्यावर ही भावना आणताना आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये युथच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला आहे.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “हे गाणं ऐकल्यावर मनात पुन्हा प्रेम फुलल्यासारखं वाटतं. शब्द, संगीत आणि रोहितचा आवाज – या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन हे गाणं आजच्या तरुणाईला आणि संगीतप्रेमींना नक्की भावेल.”

गायक रोहित राऊत म्हणतो, “या गाण्याचा प्रत्येक सुर आणि शब्द खूप खास आहे. गाताना मला जबरदस्त मजा आली आणि खात्री आहे की, हे गाणं ऐकताना प्रत्येकजण आपल्या लव्हस्टोरीशी रिलेट करेल.”

संगीतकार अविनाश–विश्वजीत म्हणतात, “हे गाणं तयार करताना आमचं एकच ध्येय होतं ते म्हणजे आजच्या युथला एक शुद्ध, रोमँटिक आणि जादुई अनुभव देणे. आम्हाला विश्वास आहे की, हे गाणं सर्व संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून जागा मिळवेल.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया तर सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या नव्या प्रेमकथेत ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम हे कलाकार झळकणार आहेत. प्रेम आणि नशिबाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना एक नवा, ताजातवाना अनुभव देईल.

‘सैराट फेम’ अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच आषाढी वारीमध्ये सहभागी झाली. वारीचा भाग बनत तिने श्रद्धेने पालखी सोहळ्याचे दर...
03/07/2025

‘सैराट फेम’ अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच आषाढी वारीमध्ये सहभागी झाली. वारीचा भाग बनत तिने श्रद्धेने पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. तसेच वारकऱ्यांसोबत भजनगायनात, फुगडीतही सहभाग घेत, एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव घेतला. पारंपरिक पोशाखात, भक्तिभावाच्या वातावरणात रिंकूचा हा सहभाग सर्वांनाच भावला.

Address

Aarey Road Goregoan
Mumbai
400063

Alerts

Be the first to know and let us send you an email when CineflagMarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CineflagMarathi:

Share

Our Story

मराठी मानाचा मराठी झेंडा. @CineflagMarathi आत्ताच फॉलो करा.

@CineflagMarathi is an online platform for the promotion of Marathi entertainment content. The site is updated daily on a real time basis with news snippets, celebrity interviews, special features, movie reviews, music reviews and a lot of desktop downloadable's.