05/06/2021
अस्सल जातिवंत सुतार आपले वंशपरंपरागत कौशल्य वापरत जगन्नाथाचा रथ बनवत आहेत.
त्यांचे संपूर्ण आयुष्य जगन्नाथाच्या सेवेत जाते आहे. त्यांचा योगक्षेम उत्तम चालतो आहे.
लौकिक जगातील शिक्षण घेतातच ते. परंतु हे पारंपारिक कौशल्य लहान असल्यापासून शिकतात आणि संपूर्ण आयुष्य आपला परंपरागत व्यवसाय करतात...
भरपूर पैसे कमावतात..
त्यांना प्रचंड सन्मान पण मिळतो कारण जगन्नाथाची सेवा करण्याचे भाग्य त्यांना मिळते आहे...
आणि
सगळ्यात महत्वाची गोष्ट...
ओरिसा मधील सुतार लाकडात खिळा मारत नाही...
कारण जगन्नाथाची मूर्ती लाकडाची आहे.. ते लाकडाला ईश्वर मानतात..
ते बांबू ला हाताने तासून चौकोनी पिन्स बनवतात आणि त्यांचा वापर करून ते लाकूड जोडतात...
१०० % पारंपारिक पद्धतीने काम करतात... सकाळी ५ ते संध्याकाळी ५.
त्यांचे हात अक्षरशः जादू केल्यासारखे चालतात...
आज सुद्धा सुतारांनी आपला पारंपारिक व्यवसाय सुरु केला तर ते अधिक पैसे कमावू शकतात.. सन्मानाने जगू शकतात.
पण आपण सगळे आरक्षणाच्या स्पर्धेत पळतो आहोत..
पळा ...
पण सकाळी सकाळी हे आनंदी सुखी चेहरे बघून घ्या.. आपण काय गमावले आहे आणि त्यांच्या कडे काय आहे याचा विचार करा...