Dimple Publication

Dimple Publication Dimple Publication is one of the oldest Publisher of Marathi books serving the industry for more than 48 years with its contribution of more than 1000 books

Dimple Publication carries passionate pride and deep love for Marathi language and expresses it as said by Saint Dnyaneshwar:
Mazhya Marathachi bol kautuke
Pari amrutatehi paija jinke
Aisi akshare rasike. Melveen
Dimple Publication is based in Mumbai and has spread its roots throughout the Maharashtra giving the readers a joy of reading. Marathi literature has a glorious history that can be traced back to ancient times and Dimple Publication with its continuous efforts is trying to maintain that glory by publishing books in categories like Dalit Literature, Biography/Autobiography, Cinema, Cooking/Recipe, Deformed Stories, Discussions/Debates, Dramas/Play, Educational, Literature Discussions, Poetry Compilation, Story Compilation, Novels, Magazines, Comic Books, Health books, Science etc. Dimple Publication has also made a successful footprint in the translational literature. Dimple Publication has diversified itself into English and Bengali literature also. Maharashtra Literature Academy has selected and referred above 200 books of Dimple Publications. Dimple Publication has published books of well known Marathi Authors like Bal Thackeray, Keshav Meshram, Priya Tnedulkar, Narayan Surve, Vijay Tendulkar, Vijaya Rajadhyaksha, Shirish Pai, etc.

समुद्रा.... तुला या कवितासंग्रहाचे ज्येष्ठ साहित्यिक विकास भावे यांनी लिहिलेले परीक्षण मंगळवारच्या साप्ताहिक वृत्त प्रका...
10/09/2026

समुद्रा.... तुला या कवितासंग्रहाचे ज्येष्ठ साहित्यिक विकास भावे यांनी लिहिलेले परीक्षण मंगळवारच्या साप्ताहिक वृत्त प्रकाश मध्ये प्रकाशित झाले आहे.

कवितासंग्रहाची दखल घेऊन अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील परीक्षण लिहिल्याबद्दल विकास भावे यांचे मनःपूर्वक आभार. तसेच या परीक्षणाला आपल्या साप्ताहिकातून स्थान दिल्याबद्दल साप्ताहिक वृत्त प्रकाशचे संपादक यांचेही मनःपूर्वक धन्यवाद!

*निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या कविता - "समुद्रा.... तुला"*

"एक आभाळ झुकलेलं", "अनुबंधाच्या प्रार्थना", "ब्रह्मसोपान", "मातृधरा", "सूर्यसंज्ञेत मी", "शिशिर येण्यापूर्वी", "मनघराच्या खिडकीतून" असे सात कवितासंग्रह, "रानाच्या वेली गाती" - ललितबंध तसेच "ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे" हा समीक्षा ग्रंथ अशी साहित्य संपदा स्वतःच्या नावावर असलेल्या डॉ रेषा आकोटकर यांचा "समुद्रा.... तुला" हा सुंदर कवितासंग्रह माझ्या वाचनात आला. या कवितासंग्रहात वैविध्यपूर्ण अशा एकूण ७८ कविता असून बऱ्याच कवितांमधून डॉ रेषा यांची परमेश्वरवरची अढळ श्रद्धा आणि निसर्गाशी तादात्म्यता दिसून येते. त्यापैकी काही कवितांचा घेतलेला हा परामर्ष!

आनंद शोधत माणूस दाही दिशांना फिरत राहतो पण कवयित्री रेषा यांना सापडला आहे "नित्यानंद, या आनंदाची शुचिता .... या आनंदाचा बिंदू" या नित्यानंदाची अनुभूती घेत "मी अनुभूतीच्या अथांगतेत थांबले आहे" ईश्वरस्वरूपाशी कवयित्री इतकी तल्लीन झाली आहे की "ईश्वराचं नादब्रह्म मला ऐकू येत आहे" असं त्या कवितेच्या शेवटी लिहितात. "मी नामाची वाहिनी आहे" या वाक्याने नामजपाचं महत्व त्यांनी पटवून दिलं आहे. (नामाची वाहिनी पान नं ११)

भोवतालच्या परिसराकडे डोळसपणे पाहायला शिकाल तर "कधी कधी सत्यही गुरु होऊ शकतं" तर "जीवनमूल्यांची बेरीज कुणाची वहिवाट होऊ शकते" अंधार पाहिला की रात्रीच्या अंधारात जायला मन घाबरतं, पहाटेचा अंधार मात्र "काही क्षणांनी उजाडणार आहे" असा सकारात्मक संदेश देतो. त्या संदेशाबरोबर आलेली "वाऱ्याची हलकी झुळूकही मग मन प्रसन्न करून जाते." (भावजग पान नं १२)

सकाळ झाली की आपण झोपेतून जागे होतो पण पहाट आणि सकाळ यांच्यामध्ये येणारा झुंजुमुंजुचा प्रहर! या प्रहरी "अनंताला पक्षी साद घालत होते" आणि सांगत होते "हा प्रहर आमचा होता". झुंजुमुंजुची ही वेळा अनुभवताना रेवाजी लिहितात "हा ऋतू, हा प्रहर माझ्या बंद डोळ्यात आहे, तसा माझ्या ह्रदयात आहे, या भावसमाधीत मी गच्च भरलेली आहे." असाधारण असा हा अनुभव या कवितेतून आपल्याही प्रत्ययास येतो. (फुटवे पान नं १३)

चंद्र आणि पृथ्वी यांचं नातं बहिण भावाचं आहे अशी एक कविकल्पना आहे हे खरं असलं तरी रेवाजी मात्र या कवितेत वेगळंच काही सांगू पहातायत. "पृथ्वीवरची आल्हाददायकता (म्हणजे) तुझंच रुप होतं" असं चंद्राला सांगून "तुझ्या अस्तित्वाने तिच्या (पृथ्वीच्या) रात्री आश्वस्थ झाल्यात.... तुझ्या या संजीवक सामर्थ्याने पृथ्वी विपुला झाली ‌.... तिच्या या स्वातंत्र्याचा आणि सहिष्णुतेचा तूच दाता आहे" असं त्या चंद्राला सांगतायत. एक वेगळ्या ढंगाची कविता वाचल्याचा आनंद आपल्याला या कवितेतून मिळतो. (कैवल्याची गोष्ट पान नं १५)

रेवाजींनी भक्तीभावाची नवी व्याख्या "माझ्या आयुष्याची दु:ख वगळून उरलेली मिळकत" अशी केली आहे (आईच्या गावातून पान नं १४) याच भक्तीभावामुळे त्यांना येणारा अनुभव शब्दांत मांडताना "ही मुक्त खेळी तू खेळतोस (आणि) कमालीचे साहस आणि कमालीचा धीर" या दोन्ही गोष्टींबरोबरच तू "माझ्यात चेतनत्व पेरत जातो" या शब्दांत त्यांनी त्या जगन्नियंत्याचे आभार मानले आहेत. (मुक्त खेळी पान नं १७)

चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील वेगळ्या संबंधांची कविता जशी आपण पाहिली तशीच समुद्र आणि चंद्र यांचं नातं उलगडणाऱ्या या कवितेत रेवाजी लिहितात "समुद्राचा व चंद्राचा प्रवास मी पाहत होते.... तेथे चंद्राने समुद्राला व .... समुद्राने चंद्राला दिलेली आश्वासने होती.... व त्यांचा जगावेगळा न्यास" त्या रात्रीचं वर्णन "ओली वाळू व समुद्र.... ती भरती ती ओहोटी.... आणि तो चंद्र..... त्याच्या साक्षीत चमचमणाऱ्या चांदण्या" या शब्दांत व्यक्त झालं आहे. रेवाजींची निरीक्षण शक्तीच या ओळींमधून प्रत्ययाला येते. (चंद्रकोर हसत होती पान २१)

पावसाची जोरदार सर आली की छत्री नसेल तर आपण आडोशाला उभे राहतो पण निसर्गाकडे बारकाईने पाहणाऱ्या रेवाजींच्या मात्र लक्षात येतं ते म्हणजे "ती (सर) गेल्यावर.... पक्ष्यांनी, कवितेने पळवाटा काढल्या ‌.... सारं रान बोडखं झालंय हिरवळीशिवाय" आणि म्हणून तर "उघड न दार सरी .... येऊ दे ना तुझ्यात.... तुझी ओली दरवळ मला चिंब करते .... तेंव्हा हा श्रावण..... परत परत यावा वाटतो ग" अशी त्यांनी तिला आर्त साद घातली आहे. (हो ना सरी पान २३)

निसर्गाशी संवाद साधू पहाणाऱ्या रेवाजींनी आकाशाशी संवाद साधला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं "सृष्टीची चित्रे तयार होत होती" पण त्याला स्पर्श होता अज्ञाताच्या कुंचल्याचा म्हणूनच ती "सृष्टीचित्रे संवादापलीकडची होती" असं त्या लिहितात. सृष्टीच्या सृजनाशी रेवाजी एवढ्या एकरुप झाल्यात की "ही सारी आवर्तने माझ्या अंगांगातून प्रवाहित होताना कळत जातं.... मी नदी आहे.... सारी तत्वे एकाचवेळी माझ्यात फुटून येताना वाटतं मी हवा आहे" (ती अंगभर खेळून घेते पान नं २४)

काही काही विधानं रेवाजी अगदी सहजपणे लिहून जातात. आता याच ओळी पहा ना "जीवन बदललं की स्वप्नं बदलतात.... जसा वयाबरोबर विचार" हे आपल्याही आयुष्यात घडतं पण लक्षात येतं ते अशा छोट्याशा ओळींमधून. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल "मेघ गर्जत होता.... तो वसंताचे गाणे गायला...व सरींवर सरी धरणीवर कोसळायला तो तत्पर होता....." निसर्गाशी जन्मजात नातं असल्यामुळे पुढे त्या लिहितात "ढग बोलत असतात... रान हसत असते.... वारे आल्हाद घेऊन वाहत असतात.... नावीन्यातील नवीनता पृथ्वीला झोके देत असते." वसंताच्या आगमनाचं इतकं सुंदर रुप म्हणजेच "माझं जग असतं" जे मला खुणावून सांगतं "वसंत आला अंगणी" (वसंत आला अंगणी पान नं २५-२६)

आपल्या डोळ्यांना बाहेरच्या जगात पाहिल्यावर समजतं "वारा वाहत असतो.... नद्या झुळझुळत असतात.... निसर्ग फुलला असतो" पण इथे रेवाजींना वेगळंच काही सांगायचं आहे. त्या सांगतायत आपल्या आत (अंतर्मनात) डोकावून पहा जिथे "मनाच्या आंदोलनाची एक बाग असते" आणि आपण "डोळ्यांनी आपल्या मनाचा तळ पहायचा असतो.... आतला आवाज ऐकायचा असतो" (आजचा दिवस पान नं २८)

प्रत्येक कवी कधी ना कधीतरी पहाट या विषयावर कविता करतोच करतो. पण पहाटे उठून बाहेर पडलं तर आपल्याला काय बदल जाणवतो? रेषाजी लिहितात "प्रसन्न पहाटे सुलभ श्वासांची लय जपताना.... किती मोठा परीघ आपला होऊन जातो (कारण) हा परीघ आपला असतो .... केवळ आपला... तेथे श्वासांचं अधिराज्य असतं....तेथे आपण गर्भश्रीमंत ठरतो." आणि या प्रसन्न समयाच्या साक्षीने "निश्चयाच्या उन्नयनात आम्ही आमचे स्वतंत्र पीठ उभे करतो.... आणि आमचा झुला अधिक उंच जातो " (प्रसन्न पहाटे पान नं ३२-३३)

निसर्गात जी पंचमहाभूत तत्वं आहेत त्याच तत्वांनी आपलं शरीरही बनलं आहे पण निसर्गाच्या सान्निध्यात राहूनही निसर्गापासून दूर जाणाऱ्या समाजाविषयी विधान करताना रेषाजी लिहितात "उत्कटता, प्रफुल्लता, तेजस्विता.... आतल्या आत दडवून.... नुसतंच फुगतात माणसे.... चैतन्याचा परिचय.... त्यांना करून घ्यायचा नसतो" माणसाला "हिरवळीचं माहात्म्य नाही" असं जरी असलं तरीही "अवकाश व झाडे.... हेच पाथेय होऊन जाते .... जीवनाला अमर करण्याचे" असा स्पष्ट उल्लेख रेषाजींनी कवितेच्या शेवटी केला आहे. (अवकाश व झाडे पान नं ३४-३५)

आजच्या समाजाचं प्रतिबिंब अधोरेखित करताना रेषाजी लिहितात "उद्योग, विकासवाढीचा वेग सरकत गेला.... माणूस यंत्रासारखा, मनही यंत्र बनलेले.... चक्क्या फिरत राहिल्या, वाण पडत गेले..... प्रत्येकालाच जेता व्हायचे होते.... विश्वविजेता" पण विश्वविजेता होण्यासाठी "येथे नव्हता तो विचार, नव्हती ती प्रणाली.... कमतरता होती वचनांची.... गरज होती चैतन्यप्रवाहाची....." पण रेषाजींच्या मते खरी "गरज होती विवेकानंदांची, गरज होती गांधींची" आजच्या घडीला समाज कुठे चालला आहे याचं उत्कृष्ट चित्रण या कवितेत केलं आहे. (गरज होती गांधींची पान नं ३६-३७)

संग्रहातील कविता वाचल्यावर लक्षात येतं की रेषाजींची परमेश्वरावर नितांत श्रध्दा आहे त्यामुळे या कवितांना एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं आहे तसंच "निसर्गाशी माझं जन्मजात नातं" असंही त्यांनी एका ठिकाणी म्हंटलं आहे. निसर्गाची विविध रूपं आणि परमेश्वराविषयीचा भक्तिभाव, कृतज्ञता, समाज चित्र, समुद्राचं दान, सर्व काही या कवितांमधून विशेषत्वाने प्रगट झालंय त्यामुळे या कविता आपोआपच आपल्या मनात उतरत जातात.

पद्मश्री गिरीश प्रभुणे सरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहाला लाभली असून कवितासंग्रहाची पाठराखण (blurb) करताना ते लिहितात "रेषा आकोटकर यांची कविता.... आपलीच आपल्यात सामावून जाणारी.... गवताचा सृजनकोंब जसा सहज खडकाचा अस्तर चिरून बाहेर मुक्त अवकाशात डोकावतो तशी ही कविता मनाच्या अवकाशात लाटांवर लाटा.... रेषांवर रेषा अंकित करते. एकामागोमाग एक कवितेच्या वाटेनं आपण पुढे जातो.... तरंगत काही आभाळाला गवसणी घालत तर कधी खोल खोल अर्थाच्या सतत निसटणाऱ्या नव्या संकल्पनेचा तळ कवटाळत.... स्वप्नांच्या तरंगातून वास्तवाच्या वाटा शोधत 'रेषा' यांची कविता आपल्याला जीवनदर्शन घडवते. रेषा आकोटकर यांच्या इतर काव्यसंग्रहांप्रमाणेच 'समुद्रा.... तुला' हा काव्यसंग्रह एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो."

काहीतरी वेगळं वाचण्याची अनुभूती घ्यायची असेल तर चित्रकार सतीश घोंगडे यांचं सुंदर मुखपृष्ठ असलेला आणि डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेला हा आगळावेगळा कवितासंग्रह तुम्ही जरूर वाचायला हवा.



😊 विकास मधुसूदन भावे

पुस्तकाचे नाव - समुद्रा.... तुला - डॉ रेषा आकोटकर
पृष्ठे - १२२ मूल्य - रू ३००/-
प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन

#समुद्रातुला #कवितासंग्रह #विकासभावे #वृत्तप्रकाश #मराठीकविता #मराठीसाहित्य #पुस्तकपरीक्षण #डिंपलपब्लिकेशन

22/08/2026
दैनिक सकाळ, रविवार, १६ ऑगस्ट २०२६तिला काय हवंय !!मेघना साने₹३००डिंपल पब्लिकेशन
19/08/2026

दैनिक सकाळ,
रविवार, १६ ऑगस्ट २०२६

तिला काय हवंय !!
मेघना साने
₹३००
डिंपल पब्लिकेशन

महाराष्ट्र टाइम्स, रविवार, १६ ऑगस्ट २०१६प्रसन्नतेचा पुष्पगुच्छ : “प्राजक्त आणि तगर”         सौ. दीपाली केळकर सूत्र संचाल...
17/08/2026

महाराष्ट्र टाइम्स, रविवार, १६ ऑगस्ट २०१६

प्रसन्नतेचा पुष्पगुच्छ : “प्राजक्त आणि तगर”

सौ. दीपाली केळकर सूत्र संचालक, निवेदक, व्याख्यात्या, मुलाखतकर्त्या आणि लेखिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत. मुंबई दूरदर्शनवर वृत्त निवेदन देखील त्या करतात. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकात त्यांचे साहित्य प्रसिद्ध होत असते. अनेक ठिकाणी सदरलेखन देखील त्यांनी केलेले आहे. स्त्रीधन, शब्दांच्या गावा जावे ,गम्मत म्हणी आणि वाक्प्रचारांची, पसायदान आणि व्यक्तिमत्वविकास या आणि अशा अनेक एकटीच्या संवादात्मक कार्यक्रमांचे प्रयोग मुंबई,महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात देखील त्यांनी केलेले आहेत. आता हजाराव्या प्रयोगाकडे या कार्यक्रमांची घोडदौड सुरु आहे. निवेदन,सूत्रसंचालन,संवादकौशल्य या विषयांवर स्वतंत्र कार्यशाळा सुद्धा त्यांनी घेतल्या आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. आणखी थोडी हटके ओळख म्हणजे मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा त्यांनी दहा वर्षे स्वतंत्र व्यवसाय केला आहे. आणि काही जाहिरातींसाठी मॉडेलिंग पण केले आहे. त्यांचे " खेळ मांडीयेला" हे पुस्तक २०२१ मध्ये प्रसिद्ध झाले असून त्याची तिसरी आवृत्ती लवकरच येत आहे. (हुश्श ! ही थोडक्यात ओळख!)
तर अशा या बहुपेडी आणि हरहुन्नरी लेखिकेच्या ललित लेखांचा "प्राजक्त आणि तगर" हा दुसरा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या लेखात याच पुस्तकाविषयी थोडंसं
दीपाली केळकर यांचा मूळ पिंड अध्यात्माचा आहे. आणि आध्यात्मिक प्रेरणेतून जन्माला आलेले वाङ्मय हे प्रासादिक,प्रवाही , पावित्र्याचा संदेश देणारे आणि आशावादी,सकारात्मक दृष्टिकोन वर्धिष्णू करणारे असणार हे ओघाने आलेच. तसेच यातील लेख आहेत. त्यांची शैली अतिशय साधी,सोपी पण परिणामकारक आहे. मूलतः भारतीय परंपरेवर आधारलेली त्यांची वैचारिक बैठक सकारात्मक आहे. त्यामुळे वाचताना वाचाकाभोवती प्रसन्नतेचा आणि सकारात्मकतेचा सडा पसरलेला आहे असं वाटतं. या पुस्तकात पसरलेले प्रसन्नता प्रसवणारे विविध लेखांचे मळे वाचून होणाऱ्या मनस्थितीला पाहून "तुमचे या दिठी वेयाचिये ओले/सासिन्नले प्रसन्नतेचे मळे/साउली देखोनि लोळे/श्रांतु जी मी/" (ज्ञानेश्वरी:०९/०४) असे माऊलीच्या शब्दात वेगळ्या अर्थाने काही अंशी म्हणावेसे वाटते. आपण शांतावतो. अधोरेखित करण्यासारखे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे भरपूर संदर्भांनी भरलेले असे हे लेख आहेत. यावरून त्यांच्या सखोल स्मरणशक्तीची आणि चौफेर वाचनाची प्रचिती येते. जुन्या संतांपासून ते आधुनिक साहित्यिकांपर्यंत त्यांच्या संदर्भांचा परीघ पसरलेला आहे.अगदी तुकोबा,माउली, जनाबाईपासून वंदना विटणकर,गदिमा. सुधीर मोघे, शांताबाई, भा.रा. तांबे, अमीर खुसरोपर्यंत (किती नावं घेऊ?) अगदी हिंदी सिनेमातील गाण्यांपर्यंत, लेखालेखात किती संदर्भ ! हे सारे लेख म्हणजे संदर्भाच्या खाणी. लेखक बहुश्रुत असला की चिंतनाबरोबर संदर्भश्रीमंती पण त्याच्या निर्मितीत आपोपाप येते आणि त्याच्या वक्तव्यास वजन प्राप्त होते याचे हे लेख म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. त्यांचं लिखाण चिंतनशील आहे असं विधान जेव्हा मी करतो तेव्हा चिंतन हे त्यांचं शील आहे असं मला म्हणायचं असतं. म्हणून बीभत्स,अश्लील,सेन्सॉर करावा असा एकही शब्द वा विचार त्यांच्या लेखात औषधाला सुद्धा येत नाही.( जी हल्ली काही अंशी फॅशन झाले.)
हे पुस्तक वाचताना साध्याही विषयात मोठा आशय आढळतो असं कवी केशवसुत म्हणतात, त्याचा प्रत्यय येतो . 'पोहेपुराण"(पान ७१) हा खमंग लेख, “कृतज्ञता”,( पान ७९) “खेळ मांडीयेला” , वाटेला फुटलेल्या विविध वाटांचा “ प्रवास वाटेचा” (पान ७५) अशा साध्यासाध्या विषयातून त्यांनी एकेका लेखाचा बहारदार वृक्ष आपल्या मनोभूमीवर फुलवला आहे.ललित लेखक बौद्धिकदृष्ट्या जितका बहुआयामी व्यक्तिमत्वाचा तितका तो लेख रंजक,वाचनीय आणि परिणामकारक होतो,याचा प्रत्यय हे साध्यासाध्या विषयांवरील मनोरंजक लेख वाचून येतो.
"आनंदवारी सर्वांची"(पान ६३) या लेखात वारीचा काढलेला व्यापक अर्थ आणि "दीपज्योती नमोस्तुते" (६६) या लेखांत रुढार्थाला टाळून धनाची केलेली अर्थगर्भ व्याख्या लेखिकेच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवतात. "अभंगलावण्य" (५८) मधील अभंगांचे लावण्य वर्णन करताना "सुंदर ते ध्यान" या तुकोबांच्या अभंगाचा लावलेला वेगळा अर्थ लेखिकेच्या टोकदार आणि मळलेल्या वाटेवरून न जाणाऱ्या काही नवीन शोधणाऱ्या बुद्धिमत्तेची जाणीव करून देतो. ज्या लेखाचे या पुस्तकाला नाव दिले आहे तो "प्राजक्त आणि तगर" (पान १२) हा लेख लेखिकेच्या तत्वज्ञानात्मक आणि काव्यात्मक दृष्टिकोनाचा कळस आहे. प्राजक्ताची प्रसन्नता आणि तगरीचं तेज यांची पखरण एकाच वेळी घेऊन आलेला. आणखी काय लिहू? एकदा तरी वाचावा असा हा लेखसंग्रह.
संतोष धोंगडे यांच्या कुंचल्याने सजलेले मुखपृष्ठ आणि डिम्पल प्रकाशनाची निर्मिती ही या पुस्तकाला लाभलेली लेणीच.
लेखिकेच्या भविष्यकालीन वाटचालीस माझ्या शुभेच्छा.
थांबतो.

अशोक गुप्ते
८२९११६२५७६

प्राजक्त आणि तगर
लेखिका:दीपाली केळकर
प्रकाशक: डिम्पल प्रकाशन
पाने; १२२ किंमत:रुपये २००/-

16/08/2026

शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ नाटककार आणि कादंबरीकार अशोक समेळ यांच्या मी अश्वत्थामा चिरंजीव या पुस्तकाची दहावी आवृत्ती डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाली.
आणि अशोक समेळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
#अश्वत्थामा #महाकादंबरी

03/08/2026

ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांच्या ७५ व्या वाढदिवस निमित्ताने त्यांचा सत्कार, प्रकट मुलाखत आणि त्यांनी गायलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम...

यासोबतच डॉ. प्रशांत दांडेकर यांनी शब्दबद्ध केलेल्या रवींद्र साठे यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा.

कार्यक्रम स्थळ व वेळ :
बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६,
रात्री ९.३० वा.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,
कोथरूड, पुणे

गायक कलाकार
मनिषा निश्चल
संजीव मेहेंदळे

निवेदन व मुलाखत
मिलिंद कुलकर्णी

संयोजन :

प्रसाद महाडकर
समीर हंपी
एस एच एन्टरप्राईजेस

प्रकाशक
डिपल पब्लिकेशन

सह प्रकाशक
मेराक इव्हेंट्स

विनामूल्य प्रवेशिका, सोमवार, दि. ३ ऑगस्ट पासून नाट्यगृहावर उपलब्ध...

रवींद्र साठे यांच्या 'कुणाच्या खांद्यावर' पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशनसुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या 'कुणाच्या खांद्...
02/08/2026

रवींद्र साठे यांच्या 'कुणाच्या खांद्यावर' पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या 'कुणाच्या खांद्यावर' या पुस्तकाचे प्रकाशन आमदार संजय उपाध्याय यांच्या शुभहस्ते शनिवारी, १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर, निर्माता-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, जीवनगाणीच्या पूजा महाडकर, शब्दांकनकार डॉ. प्रशांत दांडेकर, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे तसेच अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

रवींद्र साठे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वर रजनी या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन अभिजित सावंत आणि संतोष जोशी यांनी केले होते. प्रशांत लळित यांच्या संगीत नियोजनाखाली हा कार्यक्रम रंगला, तर स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.

'कुणाच्या खांद्यावर' हे पुस्तक मेराक इव्हेंट्स, जीवनगाणी आणि डिंपल पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आले आहे.

पुस्तक खरेदीसाठी डिंपल पब्लिकेशनच्या व्हॉट्सॲप स्टोअरला भेट द्या:
https://wa.me/p/27653943897590701/919226937924

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डिंपल पब्लिकेशन प्रकाशित तीन पुस्तकांचे प्रकाशन...
30/07/2026

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डिंपल पब्लिकेशन प्रकाशित तीन पुस्तकांचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, ॲड. हर्षल प्रधान, नितीन नांदगावकर, अखिलेश चित्रे, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, प्रशांत कुलकर्णी, संपादक मुकेश माचकर, विजय सामंत, प्रकाश सावंत, कौतुक मुळे आणि अशोक मुळे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी प्रभावीपणे केले.

Address

4/1, Kalyan Building, Opposite Chikitsak School, Khadilkar Road, Girgoan
Mumbai
400004

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919226937924

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dimple Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dimple Publication:

Shortcuts

Share

Category