20/12/2021
-------------------------------------
Zoom meeting
-------------------------------------
अत्यंत महत्वाचे /बैठकीची नोटीस
बैठक : शनिवार दिनांक २५/१२/२०२१
प्रति,
राज्य कार्यकारिणी सर्व पदाधिकारी/ जिल्हा समन्वयक/ सक्रिय कार्यकर्ते/ हितचिंतक
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ,
विषय : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या राज्य कार्यकारिणी व प्रमुख कार्यकर्त्यांची Zoom app वर ऑनलाईन बैठक ...
महोदय,
सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणांची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे.
कोरोना काळात सर्वच संवर्गाच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता निष्पृहपणे जनतेची सेवा बजावली आहे.आता कोरोनाची तीव्रता क्षीण होत आहे. असे असतांनाही सरकारची धोरणं मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हतोत्साहीत करणारे सातत्याने दिसून येत आहे.कर्मचारी संघटनांना विचारात न घेताच एकतर्फी निर्णय घेत नवीन पायंडा सरकारने पाडला आहे.
किंबहुना कर्मचा-यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत , तसेच खालील विषयांवर चर्चा करणे व सरकारच्या कर्मचा-यांबाबतच्या उदासीन धोरणाच्या विरोधात एक ठोस कृती आंदोलनात्मक कार्यक्रम सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती महासंघाच्या राज्य कार्यकारिणी, जिल्हा समन्वयक, प्रमुख कार्यकर्ते, चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, हितचिंतक व अन्य सहयोगी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ऑनलाईन बैठक खालील विषयांवर चर्चा शनिवार दि. २५ डिसेंबर,२०२१ रोजी दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीत चर्चेसाठी विषय
१) सर्वच विभागांत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. अनेक वेळा रिक्त पदे भरण्याची मागणी करुनही केवळ काही कंत्राटी तत्वावर करार पध्दतीने भरली जातात.
२) सन २००५ नंतरच्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
३) तसेच अन्य अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांवर चर्चा करणे
४) अध्यक्षांच्या अनुमतीने ऐन वेळेवर उपस्थित होणा-या विषयांवर विचारविनिमय करणे.
आता सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांच्या विरोधात नव्याने एल्गार छेडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यावर विचार विनिमय करुन कालबध्द आंदोलनाची रुपरेषा निश्चित करण्यासाठी Zoom meeting app वर शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १३.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. बैठकीची लिंक ...Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/8094657474?pwd=Mi9PeDZVbGtURkI1L0ZiVWlnRzlPUT09
Meeting ID: 809 465 7474
Passcode: abc
तरी बैठकीस सर्वांनी वेळेवर सहभागी व्हावे ही विनंती
आपला विनित,
सुभाष गांगुर्डे,सरचिटणीस
म.रा.स.क.मध्यवर्ती महासंघ,मंत्रालय, मुंबई -३२
ई-मेल : [email protected]
Mobile : 9869322751
Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...